भाजपसोबत विधानसभा निवडणुका लढवून पुन्हा युतीची सत्ता आलेली असताना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पूर्ण व्हावे या मागणीसाठी आग्रह धरत आणि नंतर थेट भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याचे धाडस शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले तेव्हा सारे अचंबित झाले. शांत स्वभावाच्या उद्धव ठाकरे यांनी असे पाऊल कसे उचलले याची चर्चा सुरू झाली. पण मुळात शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्यापासूनचा त्यांचा प्रवास पाहिला तरी संयमी पण धाडसी हेच त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे सहज लक्षात येईल. पण बिनधास्त बोलणे, आवाज देणे, वागण्यात एकप्रकारची बेफिकिरी दाखवणे हीच आक्र मता असा समज आपल्याकडे असल्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे लोकांचेआणि खुद्द भाजपच्या धुरिणांचेही आडाखे चुकले. हे सारे होऊनही आपण मुख्यमंत्री उद्धव यांना सहज सांभाळून घेऊ असा समज झालेले सनदी-आयपीएस अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना बदल्यांपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत कोणत्याही बाबतीत चकवता येणार नाही, असा झटका उद्धव ठाकरे यांनी हलके च दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बिनधास्त आणि आक्र मक राजकारणाचे वलय आणि तेच व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवसेनेची धुरा कार्याध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. उद्धव ठाकरे हे मवाळ-संयमी स्वभावाचे असल्याने शिवसेनेला बाळासाहेबांप्रमाणे नेतृत्व देऊ शकणार नाहीत शिवसेना आता संपेल असे बोलले जाऊ लागले. पण मुळात बाळासाहेबांचे लाडके  अशी ख्याती असलेल्या राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे कार्याध्यक्षपदापर्यंत पोहोचतात यातच त्यांच्याकडे काहीतरी राजकीय कौशल्य आहे ही गोष्ट अंतर्भूत आहे याकडे दुर्लक्ष झाले. अत्यंत संयमाने आगेकू च करत योग्यवेळी स्पर्धकाला अंगावर घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. तेच कसब त्यांनी नारायण राणे यांच्यासारख्या कार्यक्षम व आक्र मक नेत्याला दूर सारताना दाखवले. राज व राणे एकत्र आले तर आपले कसे असले विचार करून त्यांनी आपले राजकारण थांबवले नाही. आधी राणे व नंतर राज ठाकरे शिवसेनेपासून पर्यायाने उद्धव यांच्या मार्गातून बाजूला सारले गेले. यानंतरचे सर्वात मोठे धाडस होते शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल या घोषणेचे. के ंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील असतानाही ठाकरे यांनी ते के ले. भाजपमधील एक गट निवडणुकीआधी युती नकोच या मताचा असतानाही ते धाडस ठाकरे यांनी के ले. ठाकरे हे ज्याला कॅ लक्युलेटड रिस्क घेणे म्हणतात त्या प्रकारातील राजकारण करतात. त्यासाठी आवश्यक राजकीय हिशेब चोख ठेवतात. अत्यंत संयमाने व चिवट वाटाघाटी करत शिवसेनेच्या अटीवर पुन्हा युती के ली. शिवसेनेचे त्यावेळचे संख्याबळ लक्षात घेता उद्धव ठाकरे यांचे ते मोठे यश होते.

Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
satara, bjp leader udayanraje bhosale, sharad pawar
“पक्षात असताना चूक करणाऱ्यांच्या पाठिशी आणि पक्ष सोडल्यावर…”, उदयनराजेंची शरद पवारांवर टीका
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

या सर्व घटना लक्षात घेतल्या की जागांचे आकडे बघता उद्धव ठाकरे कोणतेही धाडस करणार नाहीत हा भाजपच्या धुरिणांचा समज किती चुकीचा होता हे स्पष्ट होते. आपल्या शिवाय देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही हा राजकीय हिशेब स्पष्ट होताच उद्धव ठाकरे यांच्या संयमाची जागा धाडसाने घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेसशी घरोबा करत त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. मुंबई महापालिके चे आयुक्त प्रवीण परदेशींसारख्या ज्येष्ठ व सर्वदूर संपर्क  असलेल्या अधिकाऱ्याची बदली, मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रोखणे, पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक परत आणणे अशा अनेक गोष्टींतून उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयमी पण धाडसी नेतृत्वाची शैली सत्तेतील साथीदारांना दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या नेतृत्वशैलीचा लाभ आतापर्यंत शिवसेनेला वेळोवेळी झाला आहे. करोनाशी लढताना व त्यानंतर प्रगती होण्यासाठी महाराष्ट्राच्या वाटय़ालाही त्यांच्या या नेतृत्वशैलीचा लाभ यावा हीच वाढदिवसाच्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा!