भाजपसोबत विधानसभा निवडणुका लढवून पुन्हा युतीची सत्ता आलेली असताना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पूर्ण व्हावे या मागणीसाठी आग्रह धरत आणि नंतर थेट भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याचे धाडस शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले तेव्हा सारे अचंबित झाले. शांत स्वभावाच्या उद्धव ठाकरे यांनी असे पाऊल कसे उचलले याची चर्चा सुरू झाली. पण मुळात शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्यापासूनचा त्यांचा प्रवास पाहिला तरी संयमी पण धाडसी हेच त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे सहज लक्षात येईल. पण बिनधास्त बोलणे, आवाज देणे, वागण्यात एकप्रकारची बेफिकिरी दाखवणे हीच आक्र मता असा समज आपल्याकडे असल्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे लोकांचेआणि खुद्द भाजपच्या धुरिणांचेही आडाखे चुकले. हे सारे होऊनही आपण मुख्यमंत्री उद्धव यांना सहज सांभाळून घेऊ असा समज झालेले सनदी-आयपीएस अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना बदल्यांपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत कोणत्याही बाबतीत चकवता येणार नाही, असा झटका उद्धव ठाकरे यांनी हलके च दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बिनधास्त आणि आक्र मक राजकारणाचे वलय आणि तेच व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवसेनेची धुरा कार्याध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. उद्धव ठाकरे हे मवाळ-संयमी स्वभावाचे असल्याने शिवसेनेला बाळासाहेबांप्रमाणे नेतृत्व देऊ शकणार नाहीत शिवसेना आता संपेल असे बोलले जाऊ लागले. पण मुळात बाळासाहेबांचे लाडके  अशी ख्याती असलेल्या राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे कार्याध्यक्षपदापर्यंत पोहोचतात यातच त्यांच्याकडे काहीतरी राजकीय कौशल्य आहे ही गोष्ट अंतर्भूत आहे याकडे दुर्लक्ष झाले. अत्यंत संयमाने आगेकू च करत योग्यवेळी स्पर्धकाला अंगावर घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. तेच कसब त्यांनी नारायण राणे यांच्यासारख्या कार्यक्षम व आक्र मक नेत्याला दूर सारताना दाखवले. राज व राणे एकत्र आले तर आपले कसे असले विचार करून त्यांनी आपले राजकारण थांबवले नाही. आधी राणे व नंतर राज ठाकरे शिवसेनेपासून पर्यायाने उद्धव यांच्या मार्गातून बाजूला सारले गेले. यानंतरचे सर्वात मोठे धाडस होते शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल या घोषणेचे. के ंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील असतानाही ठाकरे यांनी ते के ले. भाजपमधील एक गट निवडणुकीआधी युती नकोच या मताचा असतानाही ते धाडस ठाकरे यांनी के ले. ठाकरे हे ज्याला कॅ लक्युलेटड रिस्क घेणे म्हणतात त्या प्रकारातील राजकारण करतात. त्यासाठी आवश्यक राजकीय हिशेब चोख ठेवतात. अत्यंत संयमाने व चिवट वाटाघाटी करत शिवसेनेच्या अटीवर पुन्हा युती के ली. शिवसेनेचे त्यावेळचे संख्याबळ लक्षात घेता उद्धव ठाकरे यांचे ते मोठे यश होते.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on occasion of uddhav thackeray birthday zws
First published on: 26-07-2020 at 03:45 IST