मानवी शरीराची प्रथिनांची गरज भागविण्यासाठी कडधान्ये महत्त्वाची मानली जातात. या कडधान्यात हरभरा हे द्विदल कडधान्य महत्त्वाचे आहे. यंदा पावसाचा लहरीपणा असल्याने खरिपाचा पेरा वेळेत होऊ शकला नाही, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसाने मोकळ्या रानात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र, अद्याप सुरू असलेले ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. याचा बंदोबस्त शास्त्रशुद्ध केला आणि तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी केली तर निश्चितच उत्पादनात येणारी घट टाळता येऊ शकते.

बागायत आणि जिरायत दोन्ही ठिकाणी हरभरा पीक घेता येते. बागायती गहू, शाळू, करडई यामध्ये आंतर पीक म्हणून कधी उसात आंतर पीक म्हणून हरभरा लागवड करता येते, तर हस्त नक्षत्रातील पावसाच्या ओलीवर जिरायत रानात, तालीच्या रानात, सिंचन सुविधा नसतानाही चांगल्या पद्धतीने हरभरा लागवड करता येऊ शकते. हरभरा पिकाचा बेवड पुढील हंगामातील पिकासाठी पोषक तर ठरतो, पण आंतरपिक म्हणून लागवड केल्यास हरभऱ्याच्या मुळावर असलेल्या गाठीतून हवेतील नत्र जोडपिकाला उपयुक्त ठरते.

dairy farming news in marathi
लोकशिवार: गोपालनाचा जोडधंदा!
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Loksatta lokshivar Floriculture Crop Marigold Flower Farming
लोकशिवार: फुलशेतीचा सुगंध
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

हेही वाचा : लोकशिवार: फुलशेतीचा सुगंध

u

जिरायत हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना करता येते. हरभरा पेरणीनंतर पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी लागते तर बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० नोव्हेंबरपर्यंत केली तर चालते. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रतिहेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते.

बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडरमा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर १ किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.

सध्या हरभरा पीक फुलोऱ्याच्या स्थितीत, तर काही ठिकाणी घाटे धरण्याच्या स्थितीत आहे. मात्र, ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भावही वाढत आहे. घाटेअळीचा पतंग फिक्कट पिवळसर रंगाचा असतो. प्रौढ मादी अंडी पानाच्या देठावर तसेच कळ्या व फुलांवर एक एक या प्रमाणे ३०० ते ५०० अंडी देते. अंडी गोलाकार हिरवट पिवळी असतात. ५ ते ७ दिवसानंतर या अंड्यातून अळी बाहेर पडते. अळीची पूर्ण वाढ होण्यास १४ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो.

हेही वाचा : लोकशिवार: पेरूची फलदायी लागवड!

अळीचा रंग हिरवट असून तिच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ५० मिमी लांब असते. अळी जमिनीत झाडाच्या अवती भोवती वेष्टनात कोष अवस्थेत जाते. कोष अवस्था एक आठवड्यापासून ते महिनाभर असते. घाटेअळीची एक पिढी २५ ते ५२ दिवसात पूर्ण होते. घाटेअळी बहुभक्षी कीड असून (१८१ पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका) तूर, वाटाणा, करडई, टोमॅटो, भेंडी आदी. पिकावर उपजीविका करते.

ही बहुभक्षी कीड पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडून डोके आत खुपसून आतील दाणे खातात. साधारणत: एक अळी तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करू शकते.

कोळपणी किंवा निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे. घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.

हेही वाचा : लोकशिवार: कढीपत्त्याची पावडर !

औषध फवारणी

पिकाच्या सुरवातीच्या काळात झाडिरॅयिटन ( ३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही (५०० एल ई) १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम नीळ टाकून सायंकाळी फवारणी करावी. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा अधिक आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी इमामेयटीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मिली किंवा क्लोरन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मिली. फवारणी करावी. या पद्धतीने घाटेअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

digambarshinde64@gmail. com

Story img Loader