कन्नड मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’चा उपक्रम घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार कमालीचे उत्सुक होते. त्यांना शिंदे गटात सहभागी न झालेले आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात घ्यायचा होता. या मतदारसंघातून नितीन पाटील यांना प्रोत्साहन द्यायचे असल्याने त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आखला म्हणे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर फुले उधळली. गर्दी पाहून तेही खूश झाले. लाभाचा समारंभ उत्तम करताना मंत्री सत्तार अगदी घरच्या कार्यक्रमात जसे वावरतात तसे वावरले. ते सारे काही पार पाडत होते. कोणी किती वेळ बोलावे, कोणाला बोलताना थांबवावे, हेही त्यांनीच सांगितले. ते कधी सूत्रसंचालन करीत होते. कधी ते मार्गदर्शक होते तर मधूनच ते मंत्री म्हणूनही वावरत होते. ‘सब कुछ सत्तार’ असे कार्यक्रमाचे सूत्र असावे असे त्यांच्या वर्तणुकीचे सूत्र होते. त्याला प्रशासनाची अजोड साथ होती. अशाने शासन खरोखरीच आपल्या दारी पोहचणार कसे, असा प्रश्न पडतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोका आणि माकड..

‘काय झाडी. काय डोंगार. काय हाटील. समदं ओक्के’ या अफलातून संवादामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे आता मराठी चित्रपटसृष्टीत उतरणार आहे. ‘माकडाच्या हातात कोलीत’ नावाचा बिग बजेट मराठी चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सत्यात उतरणार की ती केवळ घोषणाच ठरणार, याची उत्सुकता आहे. शहाजीबापूंच्या अगोदर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही मराठी चित्रपटनिर्मितीची घोषणा केली होती. ‘दि महाराष्ट्रा डायरी ऑफ खोका’असे या नव्या चित्रपटाचे नावही राऊत यांनी देऊन टाकले आहे. तेव्हा त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन इकडे शहाजीबापूंनीही ‘माकडाच्या हातात कोलीत’ चित्रपटाची घोषणा केली आहे. दोन्ही चित्रपट अर्थातच महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणावर बेतलेले असतील, हे वेगळे सांगायला नको.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State agriculture minister abdul sattar is keen to take up the initiative of shasan aplya dari in kannada constituency amy
First published on: 30-05-2023 at 01:48 IST