News Flash

कथा : सत्यमेव जयते

‘पण आत्ताशी चारच वाजतायत. अजून दीड एक तास आहे.’

‘मोहिनी.. झाली का तयारी?’

‘कसली तयारी, ममा?’

‘म्हणजे काय, अगं, गडकऱ्यांची फॅमिली येणारे ना’.

‘पण आत्ताशी चारच वाजतायत. अजून दीड एक तास आहे.’

‘ नशीब माझं, तुझ्या लक्षात आहे म्हणजे. आणि हे बघ, जरा चांगले कपडे घाल’

‘ममा, खरं सांगू, मला ह्य पाहण्याच्या किंवा दाखविण्याच्या कार्यक्रमाचाही कंटाळा आला आहे.’

‘माहीत आहे, लग्नाआधी हल्लीच्या सगळ्याच मुली ही रेकॉर्ड लावतात. लग्न झालं की संसारात इतक्या रमतात की आई-वडिलांची आठवणही होत नाही.’

‘पण’..

‘पुढे नको बोलूस, मला माहीत आहे तुला काय म्हणायचे आहे..’

‘काय म्हणायचं आहे?’

‘हेच की तुलाही पुढे जाऊन माझीही आठवण येणार नाही.’

‘ते सिद्ध करून दाखविण्यासाठी अगोदर लग्न लागायला हवं तुझं’

‘हरदासाची कथा मूळ पदावर’

‘तुला नाही कळायचं. माझ्या पश्चात कोणी तरी हवं ना तुझी काळजी घ्यायला’

‘मी चांगली शिकली सवरली आहे. शिवाय माझ्या पायावर उभी आहे. तेवढं पुरेसं नाही का?’

‘नाही. तुझं लग्न लागलं की माझी चिंता मिटली. वय वाढलं की मग कोणी पत्करतही नाही.’

‘कोणत्या शतकात वावरतेस, ममा?’

‘एकविसाव्या शतकात. पण मुली, अजून चित्र एकोणिसाव्या शतकातीलच आहे. बेल वाजत्येय बघ. आलीच असतील मंडळी.’

‘या मंडळी, घर सहज सापडलं ना?’

‘हो, आल्ये होते ना तुझ्याकडे पूर्वी एकदा.’

‘खरंचं की, मी विसरलेच बघ.’

‘रोहिणी, तशी तू जरा विसरभोळीच आहेस.’

‘असेन, पण मला गंमत वाटते, उर्मिला की आपण गेली काही र्वष ओळखतोय पण आपल्या हे पोरांच्या लग्नाचं डोक्यात कसं नाही आलं..’

‘योगायोग, दुसरं काय. अगं बोलव ना मोहिनीला’

‘ती बघ आलीच.’

‘नमस्कार, काका, उर्मिला मावशी आणि राकेश..’

‘गडकरी काका, तुम्हाला काही विचारायचं असेल मोहिनीला तर जरूर विचारा.’

‘मला नाही वाटत. कारण तुझ्या मैत्रिणीनं अगोदरच सगळी माहिती गोळा केल्येय. आणि आजचा कार्यक्रम केवळ एक उपचार’

‘आणि, राकेश तुला काही विचारायचं असेल तर..’

‘हे बघ रोहिणी, मला वाटतं  एखादी रिकामी खोली असेल त्यात बसतील ते दोघं अनौपचारिक गप्पा मारत, नाही का?’

‘हो, चालेल ना. मोहिनीची स्टडीरूम आहे तिथे बसा दोघेजण.’

‘हाय, मोहिनी!’

‘हाय! मग, सुरू कर इंटरवू?’

‘मला वाटतं, लेडीज फर्स्ट’

‘इथं कुठायतं लेडीज! मी एकटीच तर आहे.’

‘तेच ते- तूच सुरुवात कर’

‘ओके. हे बघ राकेश आपण आणि आपली कुटुंबं एकमेकांना चांगली परिचित आहेत. आणि पुढे काही कटकटी नकोत म्हणून मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायचीय’

‘लव्ह अ‍ॅफेअर?’

‘छे, तसलं काही नाही..’

‘थांबलीस का? बोल ना पुढे.’

‘जरा कठीणच आहे. पण पुढे ती कळून उगाचच मनस्ताप आणि कटुता नको म्हणून- आत्ताच सगळं बोललेलं बरं’

‘आय अ‍ॅप्रिशेयेट युवर ऑनेस्टी आणि फ्रँकनेस.’

‘मी समलिंगी आहे.’

‘इटीज, ओके. पण हे तुझ्या आईला यापूर्वीच का नाही सांगितलंस?’

‘धीर होत नव्हता. तिला दुखवायचं जिवावर येत होतं. आय अ‍ॅम सॉरी इफ आय हॅव हर्ट युवर फििलगज.’

‘मग आज काय एकदम झालं?’

‘नुकतंच माझ्या एका मित्राचं लग्न याच कारणावरून मोडलं. घटस्फोटापर्यंत गोष्टी आल्या. मी चांगलाच धसका घेतला. परत एकदा सॉरी.’

‘खरं तर मी तुला थँक्स म्हणायला हवं’

‘ते का?’

‘तुझ्या शब्दांनी मला बळ दिलं आहे. आणि आय टू कनफेस, की मीही समलिंगी आहे. पण आई-बाबांना कसं सांगावं हे कळत नव्हतं.’

‘चल तर, आज आपण आपल्या पालकांना खरं काय ते सांगून टाकू. खरं तर माझ्या बाबांचे, आज ते हयात नाहीत तरी आभार मानायला हवे.’

‘का?’

‘त्यांचं एक वाक्य कायम माझ्या मनावर पक्कं ठासलं आहे. ‘‘प्रामाणिकपणा हे बऱ्याच समस्यांवर उत्तम प्रतिबंधक औषध आहे.’
अशोक करंदीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:09 am

Web Title: satyamev jayate story
टॅग : Satyamev Jayate,Story
Next Stories
1 कथा : सिरिअल अटॅक
2 दखल : कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेतील अनंत भावे यांची पुस्तकं
3 प्रतिक्रिया : आस्तिक नास्तिक
Just Now!
X