vv28एखाद्या शब्दाचा नेमका उच्चार काय, याबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. आपल्या मातीतल्या शब्दाच्या बाबतीतही हे घडतं तर परकीय शब्दांबाबत विचारायलाच नको. मीटिंगमध्ये, कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा नवा कॉलम.. शब्दसखा!

लहानपणी कानगोष्टींचा खेळ आपण सारेच खेळलो आहोत. एका वाक्यापासून सुरू होत शेवटच्या मुलाच्या कानापर्यंत तेच वाक्य इतकं बदलत जायचं आणि अखेर काही भन्नाटच बाहेर पडायचं. कानगोष्टींचा तो खेळ आज आठवण्याचं कारण काय? काही शब्दांच्या बाबतीत असं होतं ना! की त्यांचा मूळ उच्चार काही तरी वेगळाच असतो आणि अनेकांच्या मुखातून बाहेर पडत तो उच्चार काही तरी वेगळाच होऊन जातो. या मातीतल्या शब्दांच्या बाबतीत तर हे होतंच; पण काही परकीय शब्द तर टोटल गोंधळात टाकतात. मग आपण काय करतो? तर त्या उच्चाराला आपल्या आदर्शाचा भाग बनवतो. शाळा-कॉलेजमध्ये आपले फेवरेट सर, मॅडम असतातच. ते जसा त्या शब्दाचा उच्चार करतात.. बस्स! आपण पण तसाच उच्चार करू लागतो. मित्रमत्रिणींच्या घोळक्यात एक महानुभाव असतोच, ‘असा उच्चार नाहीय या शब्दाचा’, असं सगळ्यांसमोर सांगून भाव खाणारा आणि आपल्या ज्ञानात भर घालणारा.
कॉलेजमध्ये माझीही एक मत्रीण होती. फ्रेंच शिकणारी. आमच्यापकी कोणीही रेस्टॉरंट हा शब्द उच्चारला की स्पायडरमॅनलापण लाजवील असं आठय़ांचं जाळं तिच्या कपाळावर पसरायचं. ‘काय गावठी आहात’, असाच भाव डायरेक्ट यायचा. मग ती अतिशय स्टायलिश पद्धतीने ‘रेस्तराँ’ असा उच्चार आमच्यावर फेकायची. कानाला जाम गोड वाटायचं. तोच उच्चार मात्र काका-काकू, आजी, मावशी, आत्या यांच्यासमोर करून बघा. रेस्टॉरंट (‘ट’ अगदी व्यवस्थित जमेल तितका खेचून) ऐवजी रेस्तराँ म्हटलं की, आता उडपी हॉटेलऐवजी थेट पॅरिसच गाठतोय की काय असे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटणार. शब्द एकच पण त्याचा उच्चार कुठे, कसा करायचा याची गणितं एकदम वेगळी.  
रेस्टॉरंट हा शब्द मूळचा फ्रेंच. त्यामुळे या शब्दाच्या उच्चाराचे जगभरातील अवतार खूपच वेगवेगळे. कारण फ्रेंच भाषेतील शब्दांचा त्यांच्या इंग्रजी स्पेिलगप्रमाणे उच्चार आणि फ्रेंच भाषेतला खराखुरा उच्चार यात आयफेल टॉवर ते कुतुबमिनार इतका फरक आहे. ळी्न असा शब्द वाचून त्याचा ‘तेज’ उच्चार करावा तर फ्रेंच माणूस ढुंकून बघणार नाही. कारण ते उच्चार ‘तेय’ असा करतात. त्यामुळेच रेस्टॉरंट, रेस्तराँ, रेस्टराँट अशी अनेकविध रूपे या उच्चारांशी जोडली आहेत. पण हा शब्द तुम्ही कुठे, कोणासोबत उच्चारताय यानुसार त्यात बदल यायला हवा. कॉलेज फ्रेंड्स, घरातले नातेवाईक यांच्यासोबत रेस्टॉरंट चालतं,पण खास ऑफिस क्लाएन्ट, हायफाय पार्टीत रेस्टॉरंट बाद. तिथे रेस्तराँच हवं. भारतीय डाळभाताकडून काँटिनेंटल जेवणाकडे तुमचा प्रवास रेस्तराँच्या सोबतीने होतो.
काही वेळा रेस्टराँट असा उच्चारही कानी पडतो. पण तो विशिष्ट क्राउडमध्येच योग्य ठरेल. असा उच्चार करणाऱ्या एकाने सॉलिड युक्तिवाद केला. आपण रिलॅक्स रेिस्टग मूडमध्ये जेवतो ना, म्हणून रेस्टराँट. पण मित्र हो.. हे सत्य नव्हे!  रेस्टॉरंट शब्दाचं मूळ १ी२३१ी  या शब्दात आहे. फ्रान्समध्ये काही मंडळी सूपची विक्री करीत आणि त्या वेळी त्यांचा दावा असे की आम्ही तुमचं आरोग्य १ी२३१ी करतोय. त्यातून हा रेस्तराँ शब्द आला. आणि इंग्रजांनी ‘पारी’चं जसं पॅरिस केलं. त्यांच्या सोयीने तसंच रेस्तराँचं रेस्टॉरंट झालं. आपण २०० वर्षे साहेबांचे गुलाम. साहेब म्हणतो, ते खरं मानून आपण पण रेस्टॉरंट जवळ केलं.
आता या ‘रेस्टॉरंट’चा छाप दूर करून ‘रेस्तराँ’ला रुजवणं तसं कठीण आहे. पण योग्य वेळ, काळ, व्यक्ती पाहून त्यांच्या सहवासात रेस्टॉरंट म्हणायचं का रेस्तराँ हे कळण्याइतपत हुश्शार तर आपण आहोतच की!