29 March 2020

News Flash

साइजेबल कल्पना!

‘अ कव्‍‌र्ह स्टोरी’चं ब्रीदवाक्यच असं आहे की ग्राहकांना त्यांचा कमीपणा न दाखवता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

‘जेव्हा मी बॉलीवूड फॅशन इंडस्ट्रीमध्ये कामं करत होते तेव्हा मला खूप मोठी मार्केट गॅप जाणवली ती प्लस साइज असलेल्या किंवा अतिशय बारीक शरीरयष्टींच्या लोकांसाठीच्या कपडय़ांमध्ये.. केवळ आपल्या साइजमध्ये कपडे उपलब्ध नाहीत म्हणून इतरांसारखे हमखास उपलब्ध असणारे ट्रेण्डसेटर कपडे ते विकत घेऊ शकत नव्हते. जे प्लस साइज आणि मायनस साइजमध्ये मोडतात, शेवटी तेही ग्राहकच आहेत. मग ही तफावत का? आणि आपली बाजारपेठ एवढी मोठी असूनही हा तुटवडा का?, या विचाराने मला भंडावून सोडले. त्यामुळेच सामाजिकदृष्टय़ा बारीक-जाड या अवास्तव मानलेल्या रूढ कल्पना खोडून काढव्यात या उद्देशाने मी ‘अ कव्‍‌र्ह स्टोरी’ ब्रॅण्ड सुरू केला’, असं आकांक्षा सांगते.

प्रत्येकाचं व्हिजन आणि ते प्रत्यक्ष साकार करण्याच्या पद्धती निरनिराळ्या असतात. आकांक्षाने तिचं व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगळे प्रयत्न केले. तिला आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू कपडय़ांच्या स्वरूपात देताना कुणाला हात घट्ट होतोय, कमरेला फीट होत नाहीये किंवा कपडे लूझ होतायेत; अशा गोष्टी कानावर येत राहिल्या. त्या वेळी तिला हेदेखील जाणवलं की आपल्या घरातील तरुण पिढी आपल्या शरीराच्या अनुषंगाने कपडय़ांच्या बाबतीत फिट- लूझ या फरकामुळे नेटकेपणाने खरेदीही करू शकत नाही. तेव्हा जाणीवपूर्वक तिने या गोष्टीचा फक्त विचारच नाही तर अभ्यास केला. ‘‘आपल्या मार्केटमध्ये सध्या पाहिलं तर खूप गोष्टींमध्ये चढउतार आहेत. मी जेव्हा माझा ब्रॅण्ड ‘साइज’ या संकल्पनेवर आणायचा ठरवला तेव्हा मी माझे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या कामाचं आधी संशोधन केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की साइजप्रमाणे कपडे देणारे फॅ शन ब्रॅण्ड्स आपल्या भारतीय बाजारपेठेत कमी आहेत. सर्वप्रथम माझ्या ओळखीच्या लोकांना आणि मित्रमंडळींना मी तयार केलेल्या प्रोटोटाइपप्रमाणे डिझाइन केलेले कपडे परिधान करायला दिले. यातून प्लस साइज किंवा मायनस साइजमधील लोकांची गरज काय आहे, हे लक्षात आलं. दुसरं म्हणजे त्यांची आवड आणि तिसरं त्यांची जीवनशैली माझ्या लक्षात आली. त्यामुळे बरेच दिवस या तीन मुद्दय़ांवर काम करून मी माझ्या अंतिम ‘प्रॉडक्ट’पर्यंत पोहोचले, असं आकांक्षा सांगते. टॉप्स, जीन्स, जम्पसूट आणि विविध ड्रेसेसवर ती काम करते. मागच्या वर्षी एप्रिलमध्येच तिने आपला ब्रॅण्ड सुरू केला. तेव्हा फार कमी लोकांना घेऊन तिने हा ब्रॅण्ड सुरू के ला होता. उत्तमोत्तम टेक्स्टाइल आणि फॅब्रिकचा ती सतत अवलंब करते. विविध पॅटर्न्‍स हे तिच्या स्टाइल्समध्ये आहेत.

‘अ कव्‍‌र्ह स्टोरी’चं ब्रीदवाक्यच असं आहे की ग्राहकांना त्यांचा कमीपणा न दाखवता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. या वाक्यामागे आकांक्षाने सखोलपणे केलेला अभ्यास आहे. ‘‘कुठल्याही ब्रॅण्डची ओळख ही त्याची रचना किंवा लोकप्रियता नसून आपला ब्रॅण्ड कशाला महत्त्व देतोय आणि तसा तो ब्रॅण्ड किती जबाबदारीने लोकांशी एकनिष्ठ राहतो आहे, ही आहे. प्लस साइजसारख्या संकल्पना आजही ‘टॅबू’ मानल्या जातात, हे वास्तव आहे. पण आपण त्याचा विचार करत बसलो तर आपल्या ब्रॅण्डला लोक स्वीकारतील का?, असे नकारात्मक विचार आपोआपच निर्माण होतात. प्लस साइज ही बाब तशी गंभीर आहे. भारतात २३ टक्के महिला या प्लस साइजमध्ये मोडतात. त्या तुलनेत आतापर्यंत फक्त ९ ब्रॅण्डच असे आहेत जे प्लस साइज फॅ शन प्रमोट करतात. माझ्या मते, प्लस साइज फॅ शनपुढे यायला हवी आणि खासकरून त्यासाठी महिला उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा,’’ असं ती म्हणते. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करता येईल, असे सांगतानाच या माध्यमातून तिनेही बॉडी शेमिंग, मानसिक स्वास्थ आणि एलजीबीटी कम्युनिटीजकरता आपल्या ब्रॅण्डअंतर्गत सोशल मीडियाद्वारे कॅम्पेन्स सुरू केले असल्याची माहिती दिली. संपूर्ण देशभरात २३ ते ४५ या वयोगटातील ग्राहक तिच्याकडे येतात.

कोणत्याही व्यवसायात कल्पना महत्त्वाची असते. त्यावर स्वत:चा विश्वास असणं आवश्यक आहे तरच तो विश्वास पुढे आपण केलेल्या कामातून मिळवू शकतो. कधी काळी मीही जाड आहे म्हणून डाएटिंग वगैरे करायला सुरुवात केली होती, कारण समाजाच्या डोळ्यातील सुंदर दिसण्याच्या व्याख्येत आपण बसायला पाहिजे असा आग्रह मीही धरला होता. मला वाटतं तुम्ही जसजसं मोठं होत जाता तसं तुम्ही अधिक जागृत होता, तशी मी माझ्या शरीराविषयी जागृत झाले. हा ब्रॅण्ड सुरू केल्यानेच मला माझा नव्याने शोध घेता आला, असे आकांक्षा सांगते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 4:10 am

Web Title: article on a curve story brand abn 97
Next Stories
1 माध्यमी : कपडेपटाची कमांडर
2 ‘मी’लेनिअल उवाच : लव इज लव भाग  १
3 बुकटेल : ब्रिडा
Just Now!
X