20 January 2021

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : मार्केटिंग माहात्म्य

एका व्यवसायासाठी जे योग्य आणि चांगले आहे ते दुस?ऱ्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरू शकते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अपूर्वा जोशी

तुमच्या व्यवसायाची कल्पना व्हॅलिडेट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही मार्केटिंग युक्ती आजमावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी किंवा त्या अवलंबण्यापूर्वी, तुमची स्वत:ची विशिष्ट व्यवसाय आणि ग्राहकांसाठी अनुकूल असलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि प्लॅन असणे महत्त्वाचे ठरते, हे ओळखणे आवश्यक आहे. या सर्व कल्पना तुमच्या विशिष्ट व्यवसायासाठी आदर्श किंवा इष्टतम असतील असे नाही. तुम्ही तुमचे प्रतिस्पर्धी किंवा इतर यशस्वी झालेली व्यक्तिमत्त्वे आणि कॉर्पोरेट्स यांनाही या कल्पना वापरताना पाहिले असले तरीही त्या तुमच्या व्यवसायाला लागू होतीलच असे नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रतिस्पध्र्याच्या वास्तविक अंतर्गत डेटा/ माहितीचा अंदाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या धंद्यासाठी कोणत्या गोष्टी पूरक आहेत आणि कोणत्या नाहीत हे लक्षात येणार नाही. एका व्यवसायासाठी जे योग्य आणि चांगले आहे ते दुस?ऱ्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरू शकते.

मार्केटिंग धोरणं योग्य ठेवून वाटचाल केल्याने यशस्वी झालेल्या स्टार्टअप्सपैकी काही उदाहरणं म्हणजे झोमॅटो, आयडी फ्रेश फूड, मेक माय ट्रिप, बँक बझार, इत्यादी.  उदाहरणार्थ, काही जण कदाचित यूटय़ूब आणि फेसबुकवर व्हायरल होत आहेत असे दिसून येईल, परंतु हीच माध्यमं  तुमच्यासाठी अजिबात कार्य करणार नाहीत असेही दिसून येईल. मार्के टिंगची ही धोरणं यशस्वीरीत्या राबवता नाही आली तर याचा परिणाम म्हणजे दिवाळखोरी जी इतर कोणत्याही प्रकारापेक्षा इथे अपयशी झाल्याने जलद होऊ शकते. म्हणून कोणतीही महत्त्वाची मार्केटिंग कॅम्पेन (विपणन मोहीम) सुरू करण्यापूर्वी, तुम्ही फॅक्ट्स (तथ्ये) आणि अनुभव दोन्हींची पडताळणी करून काम करत आहात याची खात्री करून घ्या आणि तुमच्या आयडियल कस्टमर्ससाठी आणि तुमच्या कंपनीसाठी या कॅम्पेन्स तुल्यबळ आहेत का याचा विचार करा.

व्यवसाय कल्पना व्हॅलिडेट करण्यासाठी मार्केटिंग टॅक्टिक्स

१) लॅण्डिंग पेजेस

व्यवसायाची कल्पना व्हॅलिडेट करण्यासाठी मार्केटिंग तंत्रातील ही एक कुशल युक्ती आहे. तुमची व्यवसाय कल्पना व्हॅलिडेट करण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण वेबसाइट किंवा शेल्फवर प्रत्यक्ष उत्पादनाची आवश्यकता नाही. तुम्हाला यासाठी एक साधे लॅण्डिंग पेज आणि त्या पेजवर येणारा ट्रॅफिक हवा. हे लॅण्डिंग पेज तुम्ही तयार असाल तेव्हा आणि ग्राहकांचा कल अभ्यास करण्यासाठी वापरता येतं. हे विनामूल्य वापरकर्ते आणि बीटा टेस्टर्सना साइन अप करण्यासाठी वापरले जाऊ शकते किंवा वास्तविक विक्री सेक्युर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. अशी बरीच लॅण्डिंग पेज टूल्स आहेत ज्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि ही टूल्स सुलभ ईमेल, लिस्टिंग बिल्डिंग आणि त्वरित पेमेंट इंटिग्रेशन यांसारख्या बऱ्याचशा सुविधा देतात.

२) सर्वेक्षण (सव्‍‌र्हे)

बाजारपेठ चाचणी करण्याचा, तुमची व्यवसाय कल्पना व्हॅलिडेट करण्याचा आणि प्रारंभिक याद्या व विक्रीची चाचपणी  करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सर्वेक्षण. सर्वेक्षण खरोखर अचूक होण्यासाठी, नि:पक्षपाती परिणामांसाठी थर्ड पार्टी सव्‍‌र्हिस वापरणे शहाणपणाचे ठरू शकते. तथापि, बिझनेस कनेक्शन तयार करण्यासाठी आणि सॉफ्ट सेल्ससाठी तुम्ही तुमचे स्वत:चे इन-हाऊस मार्केटिंग सर्वेक्षण वापरू शकता.

सर्वेक्षणांसाठी विविध मार्ग आहेत, रेस्टॉरंट्समध्ये काम करत बसलेल्या लोकांपासून ते ई-मेल प्रश्नावली, ट्विटर पोल आणि आऊटबाऊंड फोन कॉल किंवा मजकूर आधारित अशा वेगवेगळ्या प्रकारे सर्वेक्षण करता येऊ शकते.

३) पीपीसी अ‍ॅड्स

‘पे- पर- क्लिक’ हा तुमचा व्यवसाय कल्पना तपासण्यासाठी जलद मार्ग आहे. याचा वापर करायला सुरुवात केल्यापासून काही तासांत तुमच्याकडे बऱ्याच स्प्लिट टेस्ट जाहिराती ऑनलाइन सुरू होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या ब्रॅण्डला हजारो व्ह्य़ूज मिळू शकतात. तुमच्या बजेटमध्ये लवचीकता असल्यास तुम्ही १०० रुपयांपेक्षा कमी ते लाखभर रुपये या रेंजमध्ये अ‍ॅड्स लावू शकता. असे केल्यानंतर काही महिन्यांची वाट न पाहाता तुमच्या व्यवसायाबद्दल मार्केटमधला अभिप्राय आणि डेटा काही तास अथवा दिवसांत तुम्हाला मिळू शकेल. पीपीसी तुमच्या दीर्घकालीन ब्रॅण्डिंग आणि विपणन धोरणाचा एक भाग असल्यास, याची चाचणी केल्यास ‘ग्राहक संपादनाचा (कस्टमर अ‍ॅक्विझिशन) तुमच्या स्टार्टअप कॉस्टवर काय परिणाम होतोय?’ अशाप्रकारचे इनसाइट्सही तुम्हाला मिळतील.

४) इन पर्सन सेल्स  (एखाद्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष विक्री)

आजच्या ब?ऱ्याच मोठय़ा नऊ आणि दहा आकडेवारीच्या व्यवसायातील यशोगाथा या ज्या वेळी संस्थापक विविध देशांत, शहरांत जाऊन प्रत्यक्ष विक्रीसाठी फिरून आले त्या मुद्दय़ापासून सरू झाल्या आहेत. दारोदारी जाऊन, एकावेळी एक संभाव्य ग्राहक ज्याच्याशी इन पर्सन/ प्रत्यक्ष व्यवसाय पीच करता आला अशा संधी संस्थापकांनी साधल्या; व्यवसाय कल्पना व्हॅलिडेट करण्यासाठी ही मार्केटिंग तंत्रामधली सर्वोच्च टच पॉइंट असलेली टॅक्टिक आहे.

५) फ्री डेमो

विनामूल्य सल्लामसलत, डेमो आणि टेस्ट ड्राइव्ह देणे हे सर्व लीड्स आणि विक्रीची संधी निर्माण करणे, बिझनेस कनेक्शन बनविणे आणि तुमचे उत्पादन वापरकर्त्यांच्या हातात देण्याचे मार्ग असू शकतात. फक्त विनामूल्य उत्पादनात ज्यांना रस आहे आणि जे खरंच उत्पादनासाठी पैसे मोजून ग्राहक बनतील यातला फरक तुमच्या लक्षात येतो आहे ना हे निश्चित करा.

६) विद्यमान प्लॅटफॉर्मवर पूर्व-विक्री

ग्राहक उत्पादनांसाठी तुमच्या अस्तित्वाची मालमत्ता तयार करण्यापूर्वी जलद आणि स्वस्त चाचणीसाठी तुम्ही वापरू शकता अशा अनेक विद्यमान बाजारपेठा (एक्झिस्टिंग मार्केटप्लेस) आहेत. यात अ‍ॅमेझॉन, ईबे, लेगो आणि ऑफरअप यासारख्यांचा समावेश असू शकतो.

क्रमश:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 12:31 am

Web Title: article on marketing majesty abn 97
Next Stories
1 मौज अनलॉक!
2 फिटनेससाठी धावाधाव
3 क्षितिजावरचे वारे : कोण आहे रे तिकडे?
Just Now!
X