एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
v26दिवस परीक्षांचे आहेत. दहावीपाठोपाठ आता बाकीची मंडळी पण लागतील अभ्यासाला. ‘रात्र वैऱ्याची आहे’. अशा काळात बऱ्याच जणांना पाडगावकरांच्या ओळी आठवतात ना? ‘पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे ढोपर?’ पोटात दुखल्यासारखं वाटणं तर कॉमन! अशा वेळी आई डॉक्टरकडे नेते आणि डॉक्टर विचारतात ‘स्टमक एक?’.. पोटात दुखतंय?
लहानपणी हा स्टमक शब्द ऐकायचे तेव्हा वाटायचं, कुछ तो गडबड है! हे बोलणारे साफ म्हणजे साफ चुकताहेत! स्टोमॅच असा शब्द असणार. त्याला स्टमक काय म्हणतात उगीच? त्यात आपल्यासारखेच नाकासमोर चालणारे दोन-चार भेटतात. दिलेल्या स्पेलिंगवर उच्चार करणारे stomach यातल्या ‘स्टो’चा ‘स्ट’ का करायचा, हे न कळणारे आणि मग आपण एका चुकीच्या उच्चाराला सुधारण्याचे पवित्र कार्य केल्याच्या आनंदात रट्टावून स्टोमॅच म्हणणारे. पण पुढे पुढे जेव्हा डॉक्टरांच्या तोंडून किंवा जाणत्या व्यक्तींकडून स्टमक शब्द ऐकला तेव्हा वाटायला लागलं आपल्याचकडून काही तरी गडबड होतेय. ‘स्टमक’ हाच उच्चार आहे हे कन्फर्म कळल्यावर तर ‘पोटात एक आणि ओठात एक’ असं का करतात लोक? हा प्रश्नसुद्धा पडला. वाचा बरं परत. स्पेलिंग आणि उच्चार कुठच्या कुठे आहेत, पण हळूहळू इंग्रजीचं वाचन वाढायला लागलं तसं लक्षात आलं की, बाळबोध लिपीत  ch चा ‘च’ होतो, पण तो नेहमी तसाच व्हायला हवा असं काही बंधन नाही. तो ‘क’ पण होऊ  शकतो. माझ्या बाळबोध मतानुसार  ch चा उच्चार ‘च’ करायचा आग्रह धरला तर chorus चा उच्चार कोरसऐवजी चोरस करावा लागेल. असे आणखीही काही शब्द वाचनात आले जसं की ऑर्केस्ट्रा, एको. त्यामुळे stomach मधल्या ch चा ‘क’ होऊ  शकतो हे पटलं आणि सगळ्या शंकाकुशंका मिटून ‘स्टमक’ याच उच्चारावर शिक्का पक्का केला.  
इतकं वेगळं स्पेलिंग आणि उच्चार असणारे हे ‘स्टमक’ महाशय आले आहेत तरी कुठल्या भाषेतून? तर हा मूळचा फ्रेंच शब्द estomac.त्याचं इंग्रजीत स्टमक झालं. पोटाशी अर्थात या स्टमकशी जोडलेले खूप शब्दप्रयोग आहेत. आपण रोजच्या आयुष्यात पण बोलतो की नाही empty स्टमक,  full’’ स्टमक किंवा एखादी गोष्ट करण्यापूर्वी नव्‍‌र्हस असू तर बटरफ्लाईज इन स्टमक. पोटात फुलपाखरं उडताहेत.
काही शब्द आपली जाम परीक्षा पाहतात. लांबचलांब स्पेलिंगमुळे गोंधळ होतो. स्टमकचं तसं काही नाही. पण दिसतंय वेगळं आणि बोलतोय भलतं. यामुळे या शब्दातून गोंधळ होतो. यावर काही जणांचा उपाय भारी असतो. असा एखादा शब्द उच्चारात आला की, पुटपुटल्यासारखं करून पुढे सरकायचं. म्हणजे बोललो बाबा एकदाचं असं बोलणाऱ्याला समाधान! आणि ऐकणाऱ्याला नीट ऐकू आलं नाही म्हणून त्याचंही दुर्लक्ष!
पण मी काय म्हणते! यापुढे या असल्या युक्त्या आणि शॉर्टकट नकोच. जे काही अडतंय उच्चारात ते क्लियर करू आणि पुढे जाऊ. आपापसांत मस्त चर्चा करू आणि सोडवू या की गोंधळ! तर बिनधास्त विचारा असे शब्द! मिळून शोधू या!
                                         

Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?