‘तो’ म्हटलं तर कायमच आपला असतो.. म्हटलं तर एकदम जवळचा किंवा मानला तर कायमच लांबचा.. ‘त्याचा’ तो गोडवा, ‘त्यातलं’ ते क्रीम.. नि ‘त्याचं’ ते टेम्प्टेशन.. ‘त्याची’ ती चवढव, ‘त्याचे’ ते ढीगभर प्रकार नि एक सो एक अवतार, ‘त्याचे’ ते सतराशे साठ ब्रॅण्ड्स, बेकरीतून येणारा खमंग खरपूस वास.. ‘त्याला’ मनापासून दाद देत ‘तो’ गट्टम करणं हे अनेकांच्या आवडीचं काम.. काहीजण ‘तो’ घरच्या घरीच करून बघतात. त्यांची ही शेफगिरी कौतुकास्पद ठरते. काही केवळ ‘त्याच्या’ टेस्टमध्येच न गुंतता ‘त्याचा’ सगळ्या बाजूंनी विचार करतात, तर काही महाभाग ‘त्याला’ नावं ठेवली तरीही इतरांच्या आग्रहाला बळी पडून ‘तो’ टेस्ट करतातच. ‘त्याचा’ चॉकलेट फ्लेव्हर ऑलटाइम हिट ठरतो. सध्या ‘त्याचा’ व्हॅनिला, चॉकलेट, स्ट्रॉबेरीयुक्त ‘मेट्रोपॉलिटिन’ हा अवतार हिट आहे. यंगिस्तानातले अनेकजण ‘तो’ केव्हाही, कधीही नि कुठंही खाऊ शकतात. ‘तो’ आहे केक..
‘ख्रिसमस’च्या निमित्तानं काही ‘केकलव्हर्स’नी या फेव्हरेट डेझर्टविषयी मारलेल्या या ‘गोडगप्पा’..

दीप्ती खामकर
     vv24मी सात र्वष बेकिंगमध्ये वेगवेगळे प्रयोग ट्राय करतेय. इंटरनेट नि टी शोजमधल्या रेसिपीज ट्राय करतेय. बाहेरच्या केकसारखेच केक घरी करून, त्यात आपल्या आपुलकीचा स्वाद मिक्स करून ते खिलवायला मला आवडतं. मी व्हॅनिला पॉप, चॉकोवॉलनट नि क्रम्बल केक केलेत. चॉकोलावा केक, हेल्दी रवा केक, ओटसचे हेल्दी कुकीज असे प्रयोगही केलेत. रिबिन्स अ‍ॅण्ड बलून्समधल्या रॉयल ट्रीटमधलं व्हॅनिला क्रिमचं फिनििशग एकदम भारी असतं. मी तसं करायचं ट्राय केलं असलं तरी अजून ती सर आलेली नाहीये. मॉन्जिनीजचा ब्लॅक फॉरेस्ट मला आवडतो. केक हा खूप इंटरेस्टिंग फॉरमॅट आहे. तो प्रत्यक्षात तयार होईपर्यंत त्याची आयडिया क्लिअर नसते. आधी किती विचार केला तरी तो तस्साच होईल, असं नाही. तरीही मी हे सगळं हौशीनं करते. माझे बाबा फूडी नसले, तरी त्यांनाही माझे ‘केकप्रयोग’ आवडतात. केकमुळं होणाऱ्या कौतुकाचा आनंद शब्दांत सांगणं कठीण..  

अमित पाटील
vv25प्रत्येक केकमागं असतो इतिहास नि भूगोल.. त्याच्या रंग-रूप-चवीचा सगळा माहोल.. त्यांचा मागोवा घेताना मला काही केक्स सरस वाटले. मला होमशेफमधला पॉरक्युपाइन केक आवडतो. त्याचा पोर्शनसाइज अ‍ॅक्युरेट असतो. स्पाँजच्या आत मेल्टेड मूस असतं. त्याची साइज छोटी असली तरी क्वालिटी एकदम चांगली असते. तिथलाच रेड व्हेल्वेट केकही फेमस आहे. त्यात बिब्जक्रीम, चेरी नि ब्रॅण्डी वापरली जाते. कयानीचा मावा केक परफेक्ट असतो. टेस्टला सुंदर नि पोट भरत नसलं तरी केक खाल्ल्याचं समाधान मिळतं. सेम फीिलग मेरवानच्या मावा केकमुळंही मिळतं. केक ही एक सायकॉलॉजिकल गोष्ट आहे. काहींना खूप आवडतो काहींना नाही आवडत. केक ही चीज आँखों सें खाई जाती हैं.. त्याचा सुंदर व्ह्य़ू, एलिगंट डेकोरेशन, त्याचा अरोमा, त्यातला यंगस्टर्सना भावेल एवढाच गोडवा, क्रीमचं करेक्ट स्प्रेिडग, अ‍ॅक्युरेट कट नि आइसिंग, व्यवस्थित भाजणं या सगळ्याचा मिलाफ म्हणजे ‘द परफेक्ट केक’.. तोच मला आवडतो..

शांभवी बोरकर
vv26चॉकलेट केक मला खूप आवडतो. रिबिन्स अँड बलून्स नि ठाण्याच्या पांचपाखाडीच्या ‘गिल्ट ट्रिप’मधले केक्स मला आवडतात. शिवाय रेड व्हेल्वेट, पायनापल, बटर स्कॉच वगरे केक्स मी ट्राय केलेत. चॉकलेट, व्हॅनिला हे बेसिक केक करायला मला जमलं. पण रेड व्हेल्वेट थोडासा चुकला तरी खाणेबल झाला होता. या सगळ्या माझ्या बेकिंग हॉबीला घरच्यांचा सपोर्ट आहे. ते सतत प्रोत्साहन देतात. बर्डीज, मॉन्जिनीजचे केक्सही मला आवडतात. अय्यंगार बेकरीचा रवा केक खूप चांगला लागतो. बेकर्स प्राइडमधला मार्बल केक टेस्टी लागतो. पण केक ताव मारून खाण्यापेक्षा तो थोडासाच खायला आवडतो. तो करायला नि इतरांना खिलवायला जास्त आवडतो..

लक्ष्मी सिवरामन
vv27वाशीच्या बेकर्स स्ट्रीटमधला चोकोचिप्स केक फार टेस्टी असतो. मस्त, मोठा नि क्वालिटीलाही रिच. ते आमच्याकडं सगळ्यांनाच आवडतात. या चोकोचिप्सचे तीन लेअर्स असतात. त्याचा स्पाँज थिक असतो. त्यात व्हाइट नि ब्राऊन चॉकलेट चोकोचिप्स हे दोन प्रकार मिळतात. बेकर्स स्ट्रीटमध्ये प्युअर व्हेज नि कस्टमाइज पदार्थ मिळतात. मॉन्जिनीजमधले केक्सही खाल्ले जातात. केक खायचा विचार पक्का झाल्यावर मग कॅलरीज वगरे गोष्टींचा विचार केला जात नाही. केक खाल्ल्यानं मूड सुधारतो, हा चॉकलेटचा इफेक्ट होतो. त्यातून एनर्जी मिळून चार्ज झाल्यासारखं वाटतं. कुकिंगमध्ये इंटरेस्ट असल्यानं कधीतरी मी चॉकोलावा केक करते. पण केकची रेसिपी जमायला अजून वेळ लागतोय. केक समोर असल्यावर वाटतं की, होल वर्ल्ड इज इनफ्रण्ट ऑफ यू.. या टेम्प्टेशनवर आणखी काही बोलण्यापेक्षा आता मी तो खायलाच घेतेय..

प्रणव वसुले
vv28डोंबिवलीच्या सेलिब्रेशन केक शॉपीमधले केक्स मला आवडतात. त्यात खूप व्हरायटी आहे. त्यांची चव नि क्वालिटीही चांगली आहे. त्यातले पायनापल, ब्लॅक फॉरेस्ट हे फ्लेवर आवडीचे आहेत. अय्यंगार बेकरीचे चॉकलेट स्लाइस केक, कप केकही आवडतात. मॉन्जिनीजच्या ब्लॅक फॉरेस्टची गोडी कायमच जिभेवर रेंगाळते. माझ्या ३१ डिसेंबरच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आपसूकच वर्ल्डवाइल्ड होतं. गेल्या वर्षी मित्रांनी मला सरप्राइज बर्थडे पार्टी दिली होती. कॉलेजच्या रस्त्यालगत गाडय़ा उभ्या करून केलेलं ते सेलिब्रेशन कायमच लक्षात राहील.. निमित्त कोणतंही असलं तरी केक हवाच. तो केव्हाही, कधीही, कितीही खाऊ शकतो.. चला तर मग..

मानसी शुक्ल
vv29केक हे माझं फेव्हरेट डेझर्ट आहे. कितीही पोट भरलं असू दे, पण पुढय़ात आलेल्या केकला ‘नाही’ म्हणणं शक्यच नाही. डार्क नि मिल्क चॉकलेट केक मला खूप आवडतात. बर्डीजचा रेड व्हेल्वेट केक, बांद्रय़ाच्या थिओब्रोमाचे रेड व्हेल्वेट नि कप केक्स छान लागतात. मी कुकरमध्येच एगलेस केक करते. आजीच्या पंच्याहत्तरीनिमित्त मी डबल लेअरचा डार्क अ‍ॅण्ड मिल्क चॉकलेटचा केक केला होता. त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. घरच्यांप्रमाणंच कॉलेजच्या ग्रुपलाही माझे केक आवडतात. त्यामुळं मत्रिणींच्या वाढदिवसाला मी आवर्जून केक तयार करते. दहावीनंतरच्या प्रत्येक सुट्टीमध्ये मी मत्रिणीसोबत काही डिशेस् ट्राय केल्या, त्यात केक्सच जास्त होते. टीव्ही शोज नि यूटय़ूब व्हिडीओज बघून या रेसिपीज ट्राय करते. मनी कान्ट बाय हॅप्पीनेस, बट इट कॅन डेफिनेटली बाय केक अ‍ॅण्ड गिव्ह हॅप्पीनेस फॉरएव्हर..  

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.