29 February 2020

News Flash

Wear हौस : जोडीचा मामला

ड्रेसची नेकलाइन कशी असावी आणि तुमची शरीरयष्टी, ड्रेसचा पॅटर्न यावर नेकलाइन कशी अवलंबून आहे.

 

आजच्या मिक्स अँड मॅचच्या जमान्यात ड्रेसची नेकलाइन आणि तिला कॉम्प्लिमेंट करणारं जॅकेट, ओढणी किंवा नेकपीस याची जोडी जुळवणं सगळ्यांना जमतंच असं नाही. ‘चलता है’ असं म्हणत कशावरही काहीही घातलं तर फॅशनची पुरती वाट लागते. त्यासाठीच हा जोडीचा मामला जुळला पाहिजे.

ड्रेसची नेकलाइन कशी असावी आणि तुमची शरीरयष्टी, ड्रेसचा पॅटर्न यावर नेकलाइन कशी अवलंबून आहे, यावर मागे या स्तंभातून आपण बरीच चर्चा केली आहे. हे सगळे नियम पाळून आपल्या पसंतीच्या नेकलाइनचा ड्रेस शिवला किंवा विकत घेतला तरीही काही अडचणी येतातच. कधी गळ्यात काही तरी हवं, असं वाटत असतानाही नक्की पेंडंट घालायचं की जॅकेट हेच कळत नाही. बहुतेकदा इच्छा नसतानाही केवळ गळा मोठा दिसतोय म्हणून कुर्त्यांवर ओढणी घेतली जाते. अर्थात वॉर्डरोबमधल्या भलत्याच पंजाबी सूटची उसनी ओढणी घेतलेली असल्या15ने ती ओढणी ड्रेसला साजीशी असेलच असंही नाही. ड्रेसची नेकलाइन आणि तिच्यासोबत जॅकेट, ओढणी, नेकपीस याची जोडी जुळली नाही की या आणि अशा कित्येक ‘चलता है’ शकला ऐनवेळी वापराव्या लागतात. त्यामुळेच वॉर्डरोबची आखणी अशा सर्व प्रसंगांना अनुसरून करणं गरजेचं आहे.
ड्रेसची नेकलाइन एकूण लुकवर खूप परिणाम करते. तयार होताना आरशात पहिल्यांदा नजर जाते, ती नेकलाइनवर. नेकलाइन ब्रॉड असली की खांदे रुंद दिसतात, हा त्याचा फायदा असला तरी, रुंद खांद्यांच्या मुली त्यामुळे अधिक लठ्ठ दिसतात. बंद गळ्यामुळेसुद्धा हा परिणाम होतो. प्लंजिंग नेकलाइन दिसायला कितीही आकर्षक दिसत असली तरी वाकताना, बसताना अडचणीचं होतं. त्यामुळे कित्येक जणींचा वॉर्डरोब गोल, चौकोनी गळ्याच्या ड्रेसेसनी भरलेला असतो. पण हे काही या प्रश्नाचं उत्तर नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या खेपेला शॉिपग करताना एम्ब्रॉयडरी जॅकेट, श्रग, स्कार्फ पाहिल्यावर ‘मला याची गरज नाही,’ हा विचार डोक्यात येऊ देऊ नका. याच गोष्टी अशा प्रसंगी तुमच्या तारणहार आहेत. ओढणी सर्व प्रश्नांना उत्तर नसते. त्यात सगळ्या कुर्त्यांना साजेशा ओढण्या वॉर्डरोबमध्ये असतीलच असं नाही. त्यामु
ळे कोपऱ्यात पडलेली जॉर्जेट, कॉटनची जुनी ओढणी घेऊन संपूर्ण ड्रेसचा लुक खराब करू नका.
तुम्ही नीट निरीक्षण केलंत तर लक्षात येईल, सगळ्याच रुंद गळ्याच्या ड्रेसबाबत हा प्रश्न येत नाही. बारीक िपट्र, सेल्फ एम्ब्रॉयडरी किंवा
प्लेन कलर्ड ड्रेसच्या बाबतीत ही समस्या जास्त सतावते. मल्टीकलर एम्ब्रॉयडर जॅकेट, डेनिम जॅकेट हे बाजारात ऑल टाइम हिट असतात. एखाद्या रुंद गळ्याच्या किंवा बोट नेक कुर्त्यांवर तुम्हाला जॅकेट घालता येईल. या जॅकेट्सच्या नेकलाइनमुळे खांद्याला येणारा ब्रॉडनेस कापला जातो. स्पगेटी स्ट्रॅपच्या ड्रेससोबतही तुम्हाला जॅकेट घालता येऊ शकतं. लेस जॅकेट त्यासाठी उत्तम आहेत. याच्या पारदर्शकपणामुळे स्ट्रॅप मिरव
ता पण येतात आणि खांद्याचा ब्रॉडनेससुद्धा कमी होतो.
ल्ल ओढणीचे कट्टर प्रेमी असलात, तर जॉर्जेटच्या प्लेन, बोिरग ओढण्यांचा ट्रेंड जाऊन एक पर्व उलटलं आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्याऐवजी बांधणी, लेहरीया िपट्रच्या ओढण्या वॉर्डरोबमध्ये असू द्या. िपट्रेड न्युट्रल शेडच्या ओढण्यासुद्धा वेगवेगळ्या कुर्त्यांवर वापरू शकता. कुर्ता
किंवा लेिगगला मॅचिंग ओढणी घेण्यापेक्षा कुर्त्यांमधील िपट्र किंवा एम्ब्रॉयडरीतील एका रंगाची ओढणी घ्या. प्लेन कुर्त्यांवर तिसऱ्याच वेगळ्या रंगाची ओढणी घ्या. ड्रेसच्या लुकवर याचा नक्कीच परिणाम होतो आणि ओढणीची शेड लेिगग, कुर्तासोबत मॅच करत बसण्याचा त्रास वाचतो.

*  बंद गळ्याच्या ड्रेसवर छोटे स्कार्फ घालता येतात, तर डीप नेकवर लांब स्कार्फ वापरा.
*  पांढरा, काळा न्यूड शेडचा गंजी, स्पगेटी, टँक टॉप वॉर्डरोबमध्ये हवाच. प्लंजिंग, काउल नेकलाइन ड्रेससोबत घातल्यास वाकताना, बसताना होणारी अडचण सतावत नाही. अशा ड्रेससोबत कॉन्ट्रास्ट किंवा िपट्रेड गंजी, टँक टॉपसुद्धा सुंदर दिसतो.
*  कुठल्या नेकलाइनवर कसा नेकपीस घालावा याचं एक सोपं उत्तर आहे. स्टेटमेंट नेकपीस गळ्याच्या आकारानुसार बसणं गरजेचं आहे. तरच ते उठून दिसतात. त्यामुळे बोट नेक, गोल गळ्याच्या ड्रेससोबत असे नेकपीस वापरा. बंद गळ्याच्या ड्रेसवर सुद्धा हे नेकपीस घालू शकता.
*   ‘व्ही’ नेक गळा असल्यास छोटंसं पेंडंट छान दिसतं. पण त्याची लांबी ठरवणं गरजेचं आहे. पेंडंटमुळे नेकलाइनवरचा फोकस बदलतो. बघणाऱ्याची नजर थेट पेंडंटवर जाते. त्यामुळे पेंडंटच्या चेनची लांबी गळ्यापर्यंत किंवा बस्टखाली असू द्या.
*  कॉलर शर्टवर नेकपीस कसा घालायचा हा नेहमीचा प्रश्न आहे. कॉलरसोबत नेकपीस घालायचा असल्यास तो कॉलरच्या आतल्या बाजूने शर्टवर असू द्या. जेणेकरून तो कॉलरला दाबणार नाही. सगळ्यात वरचं बटण न लावता नेकपीस घातला तर बटनपट्टीचा आकार बिघडणार नाही.

17

छायाचित्रांतील तपशील :
१, ४. ओढणीच्या बाबतीत सतत प्रयोगशील राहत एखाद्या कुर्त्यांबरोबर तिसऱ्याच रंगाची लांब ओढणी घेत क्रॉस मॅचिंगचा पर्याय उत्तम. २. बंद गळा, बोट नेक, गोल गळा अशा कोणच्याही पॅटर्नच्या ड्रेसवर गळ्याच्या आकाराला साजेसा स्टेटमेंट नेकपीस मस्त. ३. रुंद गळ्याच्या किंवा बोट नेकचा कुर्ता, वन पीस अथवा इतर आउटफिटसोबत डेनिमचा किंवा साधा श्रग उठून दिसतो. ५. विरुद्ध रंगाचं प्रिंटेड जॅकेटही छान दिसतं.

First Published on June 3, 2016 1:30 am

Web Title: clothes fashion tips and tricks
Next Stories
1 चलती का नाम ट्रेण्ड: इकोफ्रेण्डली निसर्गालंकार
2 @ व्हिवा पोस्ट : खाद्यसंस्कृतीचा रंजक इतिहास
3 टेन्शन काय को लेने का?
X
Just Now!
X