तेजश्री गायकवाड

भारतीय फॅशनविश्वाचा परीघ जगभर विस्तारण्यात इथल्या फॅशन डिझायनर्सचा फार मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला फॅशनविचार, दृष्टिकोन आणि कलेक्शन याच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक नामांकित फॅ शन डिझायनर्सची मांदियाळी आपल्याकडे आहे. या मांदियाळीतील थोरांशी संवाद साधून त्यांची जडणघडण, त्यांचे विचार, त्यांच्या यशाचा मंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न ‘डिझायनर मंत्रा’या सदरातून करण्यात येणार आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

कधी त्याच्या वर्णावरून तर कधी त्याने डिझाइन केलेलं कलेक्शन नाही तर त्याचे लुक्स किंवा त्याच्या रिलेशनशिपसंदर्भातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असणारा आणि अनेक वर्ष फॅशन इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे फॅशन डिझायनर रोहित बाल. जवळजवळ २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष फॅशन इंडस्ट्रीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फॅशन डिझायनर म्हणून लौकिक टिकवून असलेला रोहित मूळचा काश्मीरचा आहे. भारतीय फॅशन विश्वातलं महत्त्वाचं नाव म्हणजे रोहित बाल. १९९० मध्ये त्याने त्याचं पहिलं कलेक्शन सादर केलं आणि नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. इंटरनेटवर भारतीय फॅशन डिझायनर्सची यादी पाहायची म्हटली तरी त्यात रोहित बाल हे नाव अग्रणी दिसेल. तो फक्त त्याच्या फॅशन विचारांसाठीच नाही तर हटके पण ठाम जीवनशैलीसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. इंटरनॅशनली रोहितची हाय कोटूर फॅशन डिझायनर म्हणूनही ओळख आहे.

रोहित हा आर्ट आणि फॅशनचा मेळ घालत डिझाइन करणारा फॅ शनइंडस्ट्रीतील मोठा आणि जुना डिझायनर आहे. त्याच्या कोणत्याही कलेक्शनमध्ये भारतीय गोष्टींचा, आर्टचा, ट्रॅडिशनचा दुवा सांधलेला नाही, असं होऊच शकत नाही. त्याच्या या डिझायनिंगच्या युनिक स्टाइलबद्दल तो म्हणतो,‘आपल्या देशात कलेसंदर्भात कितीतरी गोष्टी आहेत. आपल्याकडे हॅन्ड वर्क केलं जातं. या हॅन्ड वर्क कलेक्शनमध्ये आपल्या कलाकारांनी केलेली कलाकुसर पाहिली तरी आपली संस्कृती किती श्रीमंत आहे याची सहज कल्पना कोणालाही येईल. देशभरात कुठेही जा प्रत्येक ठिकाणची काही ना काही खासियत आहे. त्यामुळे मला कपडे डिझाइन करताना भारतातील एखादी जागा, एखादा महाल, एखाद्या राज्याची एम्ब्रॉयडरीची स्टाईल, विव्हिंगची पद्धत, रंग, कापड अशा अनेक गोष्टी प्रेरणा देतात आणि याचा वापर मी सहज कलेक्शनमध्ये करू शकतो.’

रोहितच्या कामाचा एक वेगळाच स्टाईल मंत्रा आहे. त्याच्याकडे बघितलं तरी अनेकांना उत्साह येतो. त्याच्या स्टाईल मंत्राबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘काम असो वा माझे वैयक्तिक आयुष्य असो.. ‘बी युवरसेल्फ’ हा माझा एकमेव मंत्र आहे. स्वत:ची स्टाईलच माणसाला मोठी करते. त्यामुळे डिझाइन करताना मी कधीच कोणाची, कशाची नक्कल करत नाही. आपण डिझायनर आहोत, आपण ट्रेण्ड फॉलो करायचे नसतात तर आपण ट्रेण्ड सेट करायचे असतात. तुमच्या कामात तुम्ही, तुमचं व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा, तुमची स्टाईल दिसून आली पाहिजे’, असं तो आग्रहाने नमूद करतो. ‘बी युवरसेल्फ’चा हा मंत्रा घेऊन रोहित बाल आजही अनेक कलेक्शन तयार करतो आहे. त्याने नुकतंच ‘ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर’मध्ये ऐंशी गारमेंट्सचं कलेक्शन सादर केलं. हे त्याचं सगळ्यात मोठं कलेक्शन होतं. एकीकडे भारताच्या रॉयल संस्कृतीचं दर्शन घडवतानाच आजूबाजूला घडणाऱ्या बदलांकडेही त्याचं नेहमी लक्ष असतं. ‘माझ्या या कलेक्शनमध्ये नेचरमधलं सेलिब्रेशन आहे. सध्या आपल्याला सस्टेनेबल फॅशनची गरज आहे. निसर्गातील व्हायब्रंट रंग, आनंदी वातावरण बघून स्वत:ला आतून खूप शांत वाटेल असं हे कलेक्शन आहे. आणि अर्थातच भारतीय सिल्क, चंदेरी, मलमल असे कपडे आणि हॅन्ड वर्कने हे कलेक्शन सजलं आहे. ज्यात घागरा, अंगरखा, जॅकेट असं सगळंच आहे’, असं तो सांगतो. रोहितच्या कोणत्याही फॅशन शोमध्ये किंवा त्याच्या बुटिक्समध्ये बघितलं तर केवळ कपडेच नाही तर त्यावर उठून दिसतील अशी ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज असा सारा जामानिमा असतो. फॅशन डिझायनर आहे म्हणून फक्त कपडय़ावरच लक्ष न देता समोरच्याचा संपूर्ण लूक तयार करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याबद्दल तो म्हणतो, ‘माझं डिझाइन झाल्यावर मी त्यावर कोणती ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज जातायेत हे आवर्जून बघतो. समोरच्या ग्राहकाला संपूर्ण लुकच दिला तर तो पटकन घेतो. पण याचा अर्थ

प्रत्येक डिझाइनवर, कपडय़ावर ज्वेलरी हवीच असंही नाही. त्या त्या वेळी गोष्टी उपलब्ध झाल्या तरच मी त्या वापरतो’, असं त्याने सांगितलं.

दिल्लीत रोहितचं एक फ्लॅगशिप स्टोअर आहे तसंच मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, कोलकाता आणि चेन्नईतही स्टोअर्स आहेत. इतक्या वर्षांनंतर त्याने स्वत: ज्वेलरी डिझाइन करायलाही सुरुवात केली आहे. रोहितने अनेक फॅशन शो, फॅशन वीक आणि अनेक स्पेशल प्रोजेक्टही केले आहेत. सरकारच्या हरियाणातील  पंचकुला या शहरातील हातमाग टेक्स्टाईल ग्राम उद्योग योजनेच्या प्रोजेक्टसाठी रोहितची निवड झाली होती. अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट्स, शोजसाठी त्याने काम केलं आहे मात्र याची अनेकांना माहिती नाही. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या चार सीझनमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कपडे, त्यांचे लुक्स डिझाइन करण्याचे कामही आपण केले होते, असं त्याने सांगितलं. त्यावेळी अमिताभ हे माझ्यासाठी एखाद्या महानायकापेक्षा माझ्या कुटुंबाप्रमाणेच होते. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते बॉलीवूडचे  कितीही मोठे कलाकार असले तरी त्यांच्याबरोबर काम करताना मला कोणतंही दडपण येत नाही किंवा भीतीही वाटत नाही. मी जे डिझाइन करेन, स्टायलिंग करेन त्यावर विश्वास ठेवून ते परिधान करत असत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा हा अनुभव माझ्या आजवरच्या कामाच्या अनेक आठवणींपैकी एक गोड आठवण म्हणून कायम राहील, हे सांगताना तो भावूक होतो.

कारकिर्दीच्या या टप्प्यावर पोहोचताना मागे वळून पाहण्याचा मोह त्यालाही आवरत नाही. दुसऱ्यांसाठी उत्तमोत्तम कपडे डिझाइन करत ग्लॅमर विश्वात वावरताना वैयक्तिक आयुष्यात आणि डिझायनर म्हणून झालेल्या कारकिर्दीतही अनेक अप्स आणि डाऊन्स पाहिल्याचं तो सांगतो. आपल्या अनुभवांच्या जोरावर इतरांनाही तळमळीने या क्षेत्रात पुढे येताना काय करायला हवं हेही तो सांगतो. ‘आयुष्यात प्रामाणिक राहा. आपण जी गोष्ट करतोय ती बेस्ट करतोय आणि ती आपली ओरिजिनलच आहे हे लक्षात असू द्या. नव्याने या फॅशन इंडस्ट्रीत पाऊल टाकणाऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. बाहेरून गोड, ग्लॅमरस दिसणारी, खूप प्रसिद्धी मिळवून देणारी ही इंडस्ट्री तितकी सोप्पी नाही. ‘बी युवर सेल्फ’ म्हणत स्वत:ची छाप नाही पाडू शकलात तर या इंडस्ट्रीत टिकणं कठीण आहे’, हे तो स्पष्टपणे सांगतो.

viva@expressindia.com