07 July 2020

News Flash

डिझायनर वेडिंग

लग्न ठरलं की, पहिली धावपळ असते, खरेदीची आणि खरेदीतही पहिला नंबर असतो कपडय़ांचा.

लग्न ठरलं की, पहिली धावपळ असते, खरेदीची आणि खरेदीतही पहिला नंबर असतो कपडय़ांचा. लग्नात काय घालणार याचा विचार मुली वर्षांनुर्वष आधीच करून ठेवतात. स्वत:च्या लग्नाचं सोडा, भावाच्या, बहिणीच्या इतकंच काय तर मैत्रिणीच्या लग्नातही कोणत्या रंगाचे, कोणत्या टाइपचे कपडे घालायचे याचं चित्र मनोमनी रचलेलं असतं. पण फॅशन ट्रेण्ड सतत बदलत असतात. मग नवीन फॅशनचे नक्की कोणते कपडे आपल्याला सूट होतील? कोणता रंग आपल्यावर जास्त खुलून दिसेल? चारचौघांत आपण उठून दिसू ना? या आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि आपली निवड आणखी क्याची करण्यासाठी हौशी तरुणाई सध्या पर्सनल फॅशन स्टायलिस्टला विचारून खरेदीला जाते. दुकानात जाऊन खरेदी केलेले कपडे कॉमन होण्याची शक्यता असते. पर्सनल स्टायलिस्ट्सच्या सल्ल्यानुसार आपल्याला हवे तसे ‘युनिक टू अवरसेल्फ’ कपडे तयार करून घेऊ शकतो.

सध्याच्या ट्रेण्ड्सविषयी वेडिंग डिझायनर्सना विचारलं असता, जुनं ते सोनं हाच ट्रेण्ड समोर येतोय. पण लग्नाचा इव्हेंट झाल्यामुळे मूळ लग्नात पारंपरिक साडी आणि रिसेप्शन किंवा साखरपुडा, हळद, मेहंदी आदी कार्यक्रमांना वेस्टर्न गाउन्सची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढलेली दिसतेय.

इंडोवेस्टर्न साडी गाउन्स या लग्नाच्या सीझनमध्ये भाव खाऊन जाताहेत. नवरा-नवरीच्या आजूबाजूला असणाऱ्या करवल्या आणि सख्यांच्या अंगावर असे पायघोळ गाउन्स किंवा फुल लेंथ अनारकली सध्या जास्त पाहायला मिळतेय. स्टीच्ड नऊवारीचादेखील ट्रेण्ड दिसतोय. वेडिंग फॅशनबाबत आम्ही काही डिझायनर्सशी संवाद साधला. प्रसिद्ध डिझायनर श्रुती संचेती म्हणाल्या, ‘आजकालच्या मुलींना कोणत्याही फंक्शनसाठी पायघोळ, अडकल्यासारखे कपडे नको असतात तर कम्फर्टेबल वेअर हवं असतं. वेस्टनाइज्ड फॅशनचा ट्रेण्ड आहेच. नव्वद टक्के मुली लग्नासाठी लेहंगा- चोली किंवा साडीला प्राधान्य देतात पण रिसेप्शन, कॉकटेल पार्टी यासाठी इंडियन साडी गाऊन, अनारकली गाऊनची निवड करतात. या फ्यूजनमधून आपल्याला हवा तसा इंडियन लुकही मिळतो आणि ते कम्फर्टेबलही असतात. खास लग्नासाठी नेव्ही ब्लू, बरगंडी, मजिंटा, मरून हे रंग जास्त खुलून दिसतात.’

डिझायनर सुचित्रा म्हणाली, ‘लाँग गाउन्सची फॅशन सध्या इन असली तरी तिला फार आयुष्य नाही. भरजरी साडय़ा, लेहंगा-चोली यालाच लोकांचं जास्त प्राधान्य राहील. सध्या गाउन्समध्ये पिच कलर, स्काय ब्लू कलर, यलो कलर अशा लाइट शेड्स जास्त चलतीत आहेत.’ अम्मी प्रभाकर ब्रायडल वेअरसाठी पारंपरिक आणि फ्यूजन वेअरचा सल्ला देतात. लग्नकार्यात मिरवणाऱ्या करवल्यांनी मात्र अँकललेन्थ गाऊन, फुल लेन्थ स्कर्ट हे पर्याय निवडायला हरकत नाही. यात वेगळेपणा आणता येतो, असं त्यांनी सांगितलं.

 

ब्रायडल स्टाइलिंग टिप्स

*      लग्नाची वेळ सकाळची असेल तर जांभळा, राणीकलर, हिरवा, निळा अशा गडद रंगांचा वापर करावा.

*     सकाळी सिल्क, जरी, कॉटन अशा फॅब्रिकचा वापर करावा.

*      लग्नाची वेळ रात्री असेल तर पोपटी, आकाशी, पिवळा, गुलाबी अशा लाइट शेड्स वापराव्या.

*     रात्रीच्या वेळी शिफॉन, जॉर्जेट, नेट, मलमल अशा फॅब्रिकचा वापर करावा.

*     पारंपरिक भारतीय लग्नसोहळ्यासाठी गाऊन घ्यायचा झाल्यास इंडियन बॉडीला साजेसे, अंगप्रदर्शन होणार नाही असा असावा.

*     गाऊन्ससाठी फ्लोरल फॅब्रिकचा वापर करावा.

*     गाऊनमध्ये हॅण्ड एम्ब्रॉयडरी, कट वर्क  जास्त नसेल याची काळजी घ्यावी.

*     गाऊन्सवर गोल्ड अ‍ॅक्सेसरी अजिबात वापरू नयेत. त्याऐवजी मोती किंवा हिरे, खडे यांचा वापर असलेले दागिने घालावेत.

*     गाऊनवर सूट होईल अशी वेस्टर्न हेअरस्टाइल असावी त्याने आपल्या लुकमध्ये वेगळाच उठाव येतो.

*     फुटवेअरसाठी पेन्सिल हिल्स किंवा बॉक्स हिल्स वापराव्यात.

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 12:45 am

Web Title: designer wedding
टॅग Viva
Next Stories
1 व्हिवा दिवा
2 ‘व्हिवा लाउंज’मध्ये सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर
3 कोड गर्ल
Just Now!
X