नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

सुंदर दिसणं किंवा चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेणं ही आदिम प्रेरणा आहे. आज बाजारात हजारो उत्पादनं तुम्ही सुंदर दिसावं याकरता तत्पर आहेत, पण ज्या काळात सौंदर्यप्रसाधने मुबलक नव्हती किंवा त्या दृष्टीने फारशी सजगताही नव्हती त्या काळापासून आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पॉण्ड्सची क्रीम्स प्रसिद्ध आहेत. पॉण्ड्सची ती अंडाकार गोल शुभ्र बाटली आणि आतलं तितकंच धवल क्रीम पाहताना परिकथेत आढळणाऱ्या राजहंसाच्या तळ्याचा, पॉण्डचा या उत्पादनाशी काही संबंध असावा असा गरसमज अनेक र्वष मनात होता, पण तसं नसून पॉण्ड्स हे एका अमेरिकन संशोधकाचं नाव आहे.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

अमेरिकेत राहणाऱ्या थेरॉन पॉण्ड्स अर्थात टी.टी पॉण्ड्स यांनी त्यांच्या संशोधनातून एक औषधी मलम तयार केले. या मलमामध्ये विच हॅजलनामक वनस्पतीचा अर्क वापरण्यात आला. छोटय़ा मोठय़ा जखमा, त्वचाविकार यासाठी हे क्रीम वापरलं जाई. गोल्डन ट्रेजर या नावाने हे क्रीम बाजारात आले. काही दिवसांनी पॉण्ड्स एक्स्ट्रॅक्ट अशा नावाने नव्या नावासह हे औषधी क्रीम विकले जाऊ लागले. १८४६ मध्ये टी. टी. पॉण्ड्स कंपनी स्थापन करण्यात आली. क्रीमची जाहिरात करण्यात येऊ लागली. पुन्हा नाव पॉण्ड्स एक्स्ट्रॅक्टवरून पॉण्ड्स हीिलग क्रीम असे करण्यात आले. चेहऱ्यावरील जखमा, डाग बरे करणारे हे क्रीम धिम्या गतीने लोकांच्या पसंतीस पडत होते. तो काळ मुळात रोजच्या रोज चेहऱ्याला मॉइश्चराइज वगरे करण्यासाठी, क्रीम लावण्याचा नव्हता. त्यामुळे क्रीमचा औषधी भागच सतत पुढे केला गेला, पण १९१४ पर्यंत परिस्थिती बदलली. मेकअप, चेहऱ्याचं सौंदर्य याचा स्त्रीवर्ग अधिक गांभीर्याने विचार करू लागला आणि पॉण्ड्स कंपनीने पुन्हा आपला अजेंडा बदलत पॉण्ड्स व्हॅनिशिंग क्रीम आणि पॉण्ड्स कोल्ड क्रीम अशी दोन क्रीम्स बाजारात आणली. मूळ उत्पादन तेच होते, पण काळानुसार त्याचा योग्य तो पलू लोकांपुढे बदलत्या रीतीने आणला गेला. या बदलामुळे पॉण्ड्स क्रीमच्या विक्रीत ६० टक्क्यांनी वाढ झाली. चेहऱ्यावरच्या डागांसाठीच नाही तर नॉर्मल चेहऱ्यालाही नेहमी सुंदर ठेवण्यासाठी रोजच्या रोज क्रीमची गरज आहे हे जाहिरातीतून ठसवले गेले. मग एक काळ असा आला की लोकांना पॉण्ड्स क्रीम आवडले तर होते, पण कमी किमतीत मिळणाऱ्या या क्रीमचा वापर करणे फारसे प्रतिष्ठेचे नाही असा प्रचार होऊ लागला. त्याच वेळी योगायोगाने एक घटना घडली जिचा पॉण्ड्सने पुरेपूर वापर केला. १९२३ मध्ये रोमानिया प्रांताची राणी अमेरिकेत आली असता तिने पॉण्ड्स क्रीम वापरले. तिला हे उत्पादन आवडले. तिने अधिक क्रीम्सची मागणी करणारे पत्र पॉण्ड्स कंपनीला लिहिले. या पत्राचाच कंपनीने जाहिरात म्हणून वापर केला आणि पॉण्ड्स क्रीम लावणे पुन्हा एकदा प्रतिष्ठेचे ठरू लागले.

काळाच्या ओघात पॉण्ड्सने पावडर, क्लिन्सर, फेसवॉश, मॉइश्चरायजर, स्किन केअरची अनेक उत्पादने बाजारात आणली, पण आजही ती कोल्ड क्रीमची छोटी पांढरी बाटली तळागाळापर्यंत लोकप्रिय आहे. पॉण्ड्स हा ब्रँड सौंदर्यप्रसाधन विश्वात स्थिरावला आहे. ही मूळची अमेरिकन कंपनी अनेक देशांमध्ये फैलावली आहे. स्पेन, भारत, जपान, थायलंड हे या कंपनीची उत्पादनं विकत घेणारे सर्वात महत्त्वपूर्ण देश आहेत.

गोरं होण्याची क्रीम्स बाजारात येण्यापूर्वी पॉण्ड्स क्रीमचा खूप मोठा चाहतावर्ग भारतात होता. आजही आहे. कपाळावर, दोन गालांवर, हनुवटीवर या पांढऱ्या शुभ्र क्रीमचे चार ठिपके काढत नंतर पूर्ण चेहऱ्याला हे क्रीम चोळणारी मंडळी आजही अनेकांना आठवत असतील किंवा आजही पाहण्यात असतील. औषधी क्रीम ते रोजच्या वापराचे क्रीम हा पल्ला गेल्या १६० वर्षांत अतिशय यशस्वीरीत्या पॉण्ड्सने पूर्ण केला आहेच, पण या ब्रॅण्डच्या इतर उत्पादनांनीही आपल्या रोजच्या जगण्याचा भाग होण्याइतपत विश्वास कमावला आहे. त्यामुळे डॉ. पॉण्ड्स यांच्या नावावर आणि या पांढऱ्या शुभ्र छोटय़ाशा कुपीवर आपण आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे. गोल्डन ट्रेजर, पॉण्ड्स एक्स्ट्रॅक्ट, पॉण्ड्स हीिलग, पॉण्ड्स व्हॅनिशिंग, पॉण्ड्स कोल्ड क्रीम असे कितीही नामबदल झाले तरी आतल्या शुभ्र पांढऱ्या, मऊ, गुळगुळीत क्रीमचा स्पर्श मात्र तितकाच हवाहवासा! तितकाच आश्वासक!

रश्मि वारंगह्ण viva@expressindia.com