27 May 2020

News Flash

मेक-अप टिप्स : मेक-अपचा पाया : फाउंडेशन

मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात.

| April 25, 2014 01:08 am

मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
फाउंडेशन :नावाप्रमाणेच फाउंडेशन हा मेकअपचा पाया आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट नॅम वो सांगतो की, जर का तुम्हाला कुणी फाउंडेशनबद्दल कॉमेंट दिली तर समजावे की फाउंडेशन लावण्यात कुठेतरी चूक झाली आहे. फाउंडेशन हे स्किनटोनमध्ये इतकं बेमालूमपणे मिसळलं गेलं पाहिजे. साधारणत: फाउंडेशन लावताना झालेल्या चुका अशा की चेहरा केकी दिसणे, पॅचेस दिसणे, ‘क्रीझ लाइन्स किंवा हेअर लाइन्स दिसणे, जबडय़ाच्या भोवती रेषा तयार होणे, डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसणे, चेहऱ्याचा रंग अबोली दिसणे किंवा चेहऱ्याचा रंग आणि कान/ गळा यांचा रंग एकसारखा न दिसता वेगळा दिसणे. वरीलपैकी एकही गोष्ट चेहऱ्यावर आढळली नाही तरच समजावे की, तुम्ही परफेक्ट फाउंडेशन लावले आहे. फाउंडेशन लावण्याच्या या काही सोप्या स्टेप्स तुम्हाला परफेक्शनसाठी नक्कीच मदत करतील.

कलर निवडणे : साधारणत: ७५% स्त्रिया मान्य करतात की, परफेक्ट कलर निवडणे अतिशय जिकिरीचे काम आहे. फाउंडेशनची शेड ही तुमच्या चेहऱ्याच्या टोनशी परफेक्ट मॅच करणारीच असावी. बऱ्याचदा मेकअप आर्टिस्टसुद्धा कलर निवडताना चूक करतात. रेड कार्पेटवरील सेलिब्रेटीजचे फोटो जर बघितले तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की, चेहरा व गळ्याचा रंग वेगवेगळा दिसतो. असो. फाउंडेशन विकत घेताना आधी हातावर लावून बघावा. फक्त फिलिंगकरता नंतर जबडय़ावर लावून बघावा जर व्यवस्थित ब्लेंड होत असेल आणि गळ्याच्या स्किन टोनशीही मॅच होत असेल तर तो परफेक्ट कलर समजावा. फाउंडेशन खरेदी करताना कलर सॅम्पलची विचारणा करा. काही कंपन्यांच्या आउटलेटमध्ये कलर सॅम्पल उपलब्ध असतात. सॅम्पल कलर चेहऱ्याला लावल्याच्या ५ तासानंतरही चेहरा फ्रेश दिसत असेल तर तोच योग्य कलर समजावा.

फाउंडेशनचे प्रकार व निवड : बाजारात विविध मीडियम आणि टेक्श्चरमध्ये फाउंडेशन उपलब्ध आहेत. लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, क्रीम, लिक्विड आणि एरोसोल्स. पण घाबरून जाऊ नका. यांच्यात फारसा फरक नसतो. तुम्ही तेच मीडियम निवडा जे तुम्हाला कम्फर्टेबली लावता येते आणि चेहऱ्यालाही सूट होते.

साहित्य : फाउंडेशन कशाने लावायचे याच्यावर बरेच वाद आहेत. कारण प्रत्येकाचे असे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत.
फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी ब्रश, स्पंज किंवा हाताचाही वापर करतात. वॉटर बेस्ड फाउंडेशनसाठी स्पंजचा वापर करू नये, कारण त्याचे चेहऱ्यावर मार्क्स उमटतात. मी आधीच्या लेखातही नमूद केले आहे की, ज्यांना पिंपल्स असतील त्यांनी हाताने किंवा स्पंजने मेकअप करू नये. माझ्या मते ब्रशचा वापर करणे उत्तम आहे. फाउंडेशन स्टिपलिंग ब्रशने कुठलाही क्रॅक किंवा भेगान पडता फाउंडेशन समप्रमाणात लागते. ब्रश वापरल्याने कमीतकमी फाउंडेशनमध्ये जास्तीतजास्त भाग कव्हर होतो.

फाउंडेशन लावण्याआधी : कोऱ्या चेहऱ्यावर लगेच फाउंडेशन लावल्यास कोरडी किंवा तेलकट त्वचेचे प्रॉब्लेम्सच जास्त हायलाइट होतात. गुळगुळीत त्वचेवर फाउंडेशन चांगल्या प्रकारे ब्लेंड होते. स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावून ५ मिनिटे सेट होऊ द्यावे. सर्वसाधारणपणे मॉइश्चराइजरनंतर सनस्क्रीन आणि नंतर प्रायमर आणि मग फाउंडेशन लावतात. त्यानंतर गरज भासल्यास कन्सिलरचाही वापर करावा लागतो. परंतु जितके जास्त थर लागतील तितका मेकअप कमी वेळ टिकेल. त्यासाठी दुहेरी फायदे देणारे प्रॉडक्ट्स निवडावे. उदाहरणार्थ, प्रायमर विथ रढा किंवा मॉइश्चराइजर विथ सनस्क्रीन. मी स्वत: प्रायमर लावल्यानंतरच फाउंडेशन लावते. प्रायमर हे पारदर्शक जेल असून ते लावल्यास त्वचेची रंध्रछिद्रे बंद होतात व सुरकुत्याही कमी दिसतात.

फाउंडेशन लावताना : फाउंडेशन संपूर्ण चेहराभर लावण्याची गरज नाही. कपाळावर, नाकावर, गालावर आणि हनुवटीवर डॉट ठेवावेत व गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर पसरवावेत. कान, गळा व मान येथेही लावायला विसरू नका. (जर तुमच्या ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा गळा मोठा असेल तर उघडय़ा दिसणाऱ्या संपूर्ण भागावर फाउंडेशन लावायला विसरू नका.) दोनदा खात्री करून घ्यावी की, कुठे कमीजास्त प्रमाणात तर लागले नाही ना!
ज्यांना पिंपल्स, काळे चट्टे किंवा डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील त्यांनी कन्सिलर लावून चेहऱ्याला फिनिश्ड लूक द्यावा. नंतर पावडर लावून चेहरा सेट होऊ द्यावा.
५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 1:08 am

Web Title: foundation makeup
टॅग Girls,Ladies
Next Stories
1 ओपन अप : अभ्यासाचा कंटाळा
2 खाबुगिरी : भेजा खुश!!
3 खावे त्यांच्या देशा : इजिप्शियन खाना (इजिप्त १)
Just Now!
X