टेक वन
काल परीक्षा संपली नि आज गाडीतून (पक्षी: गाडी चारचाकीच पण लाल डब्बा!) गावाला पळायचं. ते डायरेक्ट शाळा-कॉलेज सुरू व्हायच्या वेळी डबल सामानासकट (पक्षी: या सामानात आंब्याच्या करंडय़ा, फणस, कोकणी मेवा, खाजा वगरे खानपान सेवा!) घरी परतायचं.
टेक टू
काल परीक्षा संपली नि आजही आपण व्हेरी बिझीच आहोत. सुट्टीचं सगळं शेडय़ूल, अगदी लास्ट डेपर्यंतचं फिक्स झालंय (पक्षी: इथं मॅच फििक्सगचा संबंध नाही). डे बाय डे प्रत्येकाला काही तरी अचिव्ह करायचंय. (पक्षी: ‘बिझिनेस’ हाच आमचा फंडा! आमची शाखा कुठंही नाही!)
 कसे वाटताहेत हे प्रसंग? ओळखीचंच वाटतंय ना सगळं? कदाचित दोन वेगळ्या पिढय़ा रिलेट करतील या दोन प्रसंगांशी. सध्याच्या पिढीची सुट्टी यातल्या ‘टेक टू’शी मिळतीजुळती असेल यात शंका नको. अभ्यास करून थकल्याभागल्या जीवांना आराम हवा असं सुरुवातीला तुम्ही फर्मली नक्कीच म्हणाला असाल. भरपेट झोप, मनसोक्त खेळणं, वाटेल तेवढं नि तसं हुंदडणंही. आऊटिंग, लॅपटॉपगिरी, ‘एफबी’ नि ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर पडीक असणं असे ‘सुट्टी स्पेशल उद्योग’ चालूच असतील. पण हे एवढंच कितीदा नि किती दिवस करणार? या उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग केलात तर?
आपल्याला मोकळा वेळ हवाय की नकोय, इथं आपण थोडंसं कन्फ्यूज होतो सध्या. म्हणजे वर्षभर अभ्यास केल्यावर छुट्टी तो मंगती हैं ना बॉस! पण म्हणून सुट्टीचा सगळा वेळ टीपी करण्यातच घालवावा का? आपल्या आवडत्या गोष्टी सुट्टीत प्लॅन केल्यास सुट्टीचा आनंद आणखी मिळेल. दहावीची परीक्षा दिलेल्यांसाठी फोटोग्राफी, म्युझिक, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, चित्रकला, सुलेखन, अ‍ॅिक्टग इत्यादी पर्याय इन आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हे जगमान्य असल्यानं त्यानं आपल्या ज्ञानात भर पडेल. त्यामुळे आपणही ‘लिहिते’ होऊ शकतो. आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजची आवड असलेले ट्रेकिंग, रॉक क्लायंिबग, रॅपिलग, हॉर्स रायिडग, रायफल शूटिंग शिकू शकतात. या अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे मानसिक, शारीरिक क्षमतांचा कस लागतो. ग्रुपबरोबर राहिल्यानं नवीन ओळखी होतात. कम्फर्ट झोन नसताना, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायची सवय लागते. काही नेचर लव्हर्सना नेचर ट्रेल्सना जाऊन नवीन दृष्टी मिळते. भाषेची आवड असलेल्यांना वेगवेगळ्या भाषांचे एक ते दीड महिन्याचे कोस्रेस ट्राय करता येतील. कारण करिअरच्या दृष्टीनं सध्या जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, चिनी भाषा शिकणं गरजेचं ठरतंय. कुणी पॉकेटमनीसाठी किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी म्हणून समर जॉब करून बघतात. त्यात कॉफी शॉपीपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत अनेक ऑप्शन्स आहेतच.
viva09काही जणांनी आपले ‘सुट्टीचे प्लॅन्स’ ‘व्हिवा’शी शेअर केले. पेपर क्वििलग आर्टस्टि नम्रता योगी सांगते की, ‘गेल्या मे महिन्याच्या सुट्टीपासून मी पेपर क्वििलग करायला सुरुवात केल्येय. मधल्या काळात कॉलेज-अभ्यासामुळे सवड नाही मिळाली. आता सुट्टीत ही कला जोपासतेय. सोसायटीतल्या फनफेअरमध्ये स्टॉल लावल्यापासून खूप ऑर्डर्स मिळताहेत. यू ट्यूबवर बघून मी पेपर क्वििलग शिकले. आता समर कॅम्पमध्ये काही जणांना पेपर क्वििलग शिकवणारेय. मला आवडतंय, तेच मला करायला मिळतंय, शिकवायला मिळतंय.’’ फोटोग्राफीची आवड असणारा माधव नांदिवडेकर म्हणतो की, ‘‘दहावीच्या सुट्टीपासून मी फोटोग्राफी शिकायला सुरुवात केल्येय. एरवी फोटो काढण्याचा सराव सुरू असला किंवा काही असाइनमेंटस् करत असलो तरी सुट्टीत फोटोग्राफी शिकतो. या महिन्याभरात मी कमर्शिअल आणि अ‍ॅडव्हान्स फोटोग्राफी शिकणारेय. मला फोटोग्राफीतच करिअर करायचं असल्यानं आता बारावीनंतर फोटोग्राफी रिलेटेड कोस्रेस मी  करतोय. कारण फोटोग्राफी इज माय पॅशन.’’
करिअर प्लॅनर सानिका पात्रे म्हणते की, ‘‘दहावी-बारावीच्या अभ्यासामुळे कथक शिकणं थोडं साइिडगला पडलं होतं. पण या सुट्टीत पुन्हा जॉइन केलंय. सध्या मी Common Law Admission Test चा अभ्यास करतेय. त्यामुळे त्या अर्थानं सुट्टी एन्जॉय करत नसले तरीही करिअरच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. क्लास-अभ्यासातून वेळ मिळाल्यावर मी एखादी राऊंड मारते पार्कात. दिवसभरचा स्ट्रेस कमी करायला रात्री म्युझिक ऐकणं अजिबात मिस करीत नाही. एकदम रिलॅक्स वाटतं.’’ संगीतप्रेमी समीर पटवर्धन सांगतो की, ‘‘दहावीच्या सुट्टीत मी गिटार शिकलो होतो. एका प्रोग्रॅममध्ये प्रदीप्तो सेनगुप्ता यांचं मेंडोलिनवादन ऐकलं. ते खूप आवडलं. भावानं बर्थडे गिफ्ट म्हणून मेंडोलिन दिलं. आता एफवायच्या सुट्टीत तेच यू टय़ूबच्या साहाय्यानं शिकतोय. त्यामुळे आमच्या म्युझिक ग्रुपमध्ये मेंडोलिन हे आणखी एक इन्स्ट्रुमेंट अ‍ॅड होतंय.’’ सो, काय करायचं ते फर्मली ठरवून ते फायनल ठरवून टाका. त्यात प्रावीण्य मिळवा नि सुट्टीतला वेळ सत्कारणी लावा.
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com