vv13नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यप्रशिक्षक नकुल घाणेकर सांगताहेत डान्स आणि फिटनेसचं गणित.
परवाच डान्स स्टुडिओमध्ये एन्क्वायरी होती. ३५ वर्षांची स्त्री, तिला खरं तर सालसा शिकण्यात रस होता. पण अ‍ॅडमिशन घ्यायला आली होती बेली डान्सिंगच्या क्लासला. कारण सालसा शिकण्यासाठी तिच्याकडे पार्टनर नव्हता. तेव्हा तिचा गरसमज दूर केला आणि तिला सांगितलं की, सालसा शिकण्यासाठी जोडीदार किंवा साथीदार असण्याची स्ट्रीक्ट अट नसते. एखाद्या सालसा क्लासमध्ये हे नृत्य शिकण्यासाठी पद्धत मुळात ग्रूप डान्सचीच असते. जोडय़ा गोलात उभ्या राहतात आणि थोडय़ा थोडय़ा वेळाने डान्स ट्रेनर ‘चेंज युवर पार्टनर’ असं ओरडतो.  वर्गात अशाच पद्धतीने सालसा बऱ्याचदा शिकवलं जातं. पार्टनर्स सतत बदलत असतात. सालसा शिकण्याची हीच खरी उत्तम पद्धत आहे.
सालसा नृत्य केल्याने तासाला ३९३ ते ४०५ कॅलरीज बर्न होतात. हा कॅलरीचा आकडा १४० पाऊंड वजनाच्या व्यक्तीसाठी (१६३.५ किलो) सुचवली आहे. ही संख्या वजन, मसलमास आणि डािन्सगच्या इंटेनसिटीवर अवलंबून आहे. तसंच स्त्रिया आणि पुरुषांसाठी कॅलरीकाउंट वेगळा असतोच. पण थोडक्यात काय तर सालसामुळे कॅलरी बर्निगचा हिशोब व्यवस्थित जुळू शकतो. सालसामध्ये शरीराचा समतोल राखून केलेल्या चपळ हालचाली असतात. त्यामुळे हृदयस्पंदनं वाढतात. तसंच सालसा नृत्य करताना एकाच वेळी अनेक मसल्सचा वापर होतो. ऑब्लीक मसलचे टोिनग, पायाचे टोिनग यातून शक्य आहे.
सालसा मधल्या मुख्य स्टेप्सपासूनच नर्तकाला कमरेच्या, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशा हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे आपसूकच नर्तकाचे ‘अ‍ॅब्ज’ टाईट होतात. याने ‘कोअर एंगेजमेंट’ आणि ‘लेग मसल टोिनग’ दोन्हीही होतात. सालसामधल्या चपळ हालचालींनी हृदयगती वाढल्यामुळे कार्डिओ वर्कआऊट आपोआप होतो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक नृत्यशैलीने हृदयाची ताकद वेगवेगळ्या प्रमाणात वाढतेच, पण एखादी नृत्यशैली सुरू करायच्या आधी नर्तकाची ‘मेडिकल हिस्ट्री’ ही जाणीवपूर्वक पडताळून पाहिली पाहिजे.
हल्लीच्या तरुण मुला-मुलींमध्ये सालसा शिकण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण हे जोडीनं करायचं नृत्य आहे. यातून एकमेकांना समजून घ्यायची, ओळख होण्याची किंवा मत्री वाढवण्याची संधीसुद्धा मिळते. तरुण मुला-मुलींना कदाचित म्हणूनच हा डान्सफॉर्म खुणावत असतो. सध्या मात्र सालसाची क्रेझ त्यापलीकडे पोचली आहे. मध्यमवयीन लोकांमध्ये आणि लहान मुलामुलींमध्येही सालसा लोकप्रिय होत आहे. हे होणं साहजिकच आणि गरजेचंही आहे. कारण सालसामध्ये स्ट्रेस बस्टिंगची ताकद आहे. जगात सालसा नृत्याला नंबर १ ची तणावमुक्ती करणारी नृत्य शैली मानतात. आपण घरात एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन चार िभतीत स्वतला बंद करून बसून राहतो, तेंव्हा आपल्या घरचे किंवा मित्र आपल्याला म्हणतात की ‘बाहेर जा, मोकळ्या हवेत कोणाशीतरी गप्पा मार’. सालसा ही प्रियजनांबरोबर किंवा एखाद्या नवीन मित्राबरोबर गप्पा मारण्याची नृत्यात्मक पद्धत आहे. कारण सालसासुद्धा एक भाषा आहे. शब्दांपलीकडची. डोळ्यातून, स्पर्शातून आणि संगीताच्या चालीवर व्याकरणीत अशी एक आगळीवेगळी भाषा. या भाषेत एक ‘लीड’ सतत एक प्रश्न विचारत असतो म्हणजेच तो आपल्या पार्टनरला लीड करत असतो. आणि एक फॉलो असते जी त्या प्रश्नांचे उत्तर देत असते म्हणजेच आपल्या पार्टनरच्या प्रत्येक लीडला अचूकपणे फॉलो करत असते. हीच भाषा सालसा वर्गात अनोळखी लोकांशी पण बोलली जाते.  तेंव्हा तिथल्या तिथे डान्स फ्लोअरवर एक नव नातं, एक नवी मत्री (नृत्यातली मत्री, नेहमीची नव्हे) जन्म घेते. हेच तणावमुक्त होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.
६३ वर्षांची एक स्त्री अंधेरीवरून माझा ‘लोकप्रभा’मधला लेख वाचून सालसा शिकायला आल्या होत्या. नुकतच त्यांनी आपल्या सुपुत्रीला गमावलं होतं. त्या दुखातून स्वतला सावरायला त्यांनी ठाण्याच्या सालसा क्लासची वाट धरली आणि या सालसा वर्गाचा त्यांना खूप उपयोगही झाला. सालसामुळे दुसऱ्या एका तरुणाचं सिगरेटचं व्यसनही सुटलं. कारण तो तणावमुक्त झाला.
* सालसा लॅटिन अमेरिकन देशांमधून आलेले नृत्य आहे. त्याचे बहुतांश संगीत स्पॅनिश भाषेत आढळते. कोलंबिया, पोर्तो रिको, क्युबा इत्यादि ठिकाणाहून त्याचा जन्म झाला.
*  सालसा शिकण्यासाठी आधी कोणत्याही शैलीचं ट्रेिनग लागत नाही.
* सालसा शिकण्यासाठी अॅडमिशन घ्यायला पार्टनर लागत नाही आणि स्वतचा पार्टनर असला तरी वर्गात त्याच पार्टनरबरोबर सालसा करणार असा मूर्ख हट्ट बाळगू नये.
* वय वर्ष ७ ते चालता येईपर्यंत कोणत्याही वयात सालसा करता येतं. सालसा नृत्याच्या बेसिक स्टेप्स सोप्या असल्यामुळे ते जगात जास्त प्रसिद्ध आहे. चालताना जितकी लवचीकता कामी येते तितकीच सालसा शिकण्यासाठी पुरेशी आहे.
नकुल घाणेकर – viva.loksatta@gmail.com