शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत सध्या आपण कोरियाला स्टॉपओव्हर घेतलाय.
कोरियात हिवाळय़ात किंवा स्पेशल ऑकेजन ला ‘चुनकुँवा’ (आलं,  दालचिनी आणि तिथे मिळत असलेले खजूर यापासून बनवलेलं ड्रिंक) घेतलं जातं. त्यांच्या नेहमीच्या जेवणात भात, सीफूड (टय़ूना, किंग क्रॅब, स्क्वीड) चिकन, भाज्या असे पदार्थ असतात. मटण व इतर प्रकार क्वचितच असतात. फ्लेविरगसाठी लाल मिरची, पातीचा कांदा, आल लसूण, तीळ, मूग यांचा उपयोग करतात.
जसं आपल्याकडे, अ‍ॅपेटाझर, मेनकोर्स, डेसर्ट असा क्रम नाही, तसाच कोरियामध्ये जेवणाच्या पदार्थाचा क्रम नाही. हे प्रकार सर्वसाधारण पाश्चिमात्य देशात दिसतात. कोरियातही आपल्यासारख्या सगळय़ा गोष्टी एकाच वेळी टेबलावर ठेवल्या जातात आणि त्यांचा आस्वाद घेतला जातो.
घरातल्या जेवणाच्या टेबलाची उंची साधारण दहा इंच असते. टेबल पण सुंदर नि डेकोरेटिव्ह असतं. टेबलाच्या अवतीभवती बसण्यासाठी जमिनीवर उशा मांडल्या जातात. जेवताना सगळय़ा डिशेस टेबलाच्या सेंटरमध्ये ठेवल्या जातात आणि प्रत्येकासमोर भाताचा बाऊल ठेवला जातो.
सगळय़ांचं जेवण झालं की, बऱ्याच वेळा हेच टेबल उचलून शोपिस म्हणून िभतीवर टांगलं जातं. आहे की नाही मस्तं आयडिया!

ग्रीन आनियन पॅनकेक  
साहित्य : कांदय़ाची पात  – १ गड्डी कोवळी पाने घ्यावी. (४ ते ५ इंच लांबीचे), मदा – १ वाटी, साखर -२  टी स्पून, लाल मिरची ताजी – २ (लांबट कापलेली) मीठ – १ टी स्पून, काळी मिरी पूड – २ चिमूट, अंडं – १  थंड पाणी – आवश्यकतेनुसार
सॉससाठी साहित्य : सोया सॉस – २ टेबलस्पून, व्हिनेगर – १ टीस्पून, मध – १ टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा -१ (छोटा), बारीक चिरलेली लाल मिर्ची – १, भाजलेले तीळ – १ टी स्पून
कृती : कांदय़ाची पात धुवून घ्या. वर दिलेलं साहित्य एकत्र करून मद्याचा घोळ बनवून घ्या. नॉनस्टिक पॅन गरम करून घ्या. कांद्याची पात मद्याच्या घोळात बुडवून हलकेच काढून नॉनस्टिक पॅनवर टाका. दोन्ही बाजूंनी परतून घ्या. वर दिलेल्या सॉससोबत सव्‍‌र्ह करा.
टीप : कोरियामध्ये बऱ्याच वेळा अशा पॅनकेकमध्ये
ताजे Shrimps (िझगे) वापरले जातात.

कोरियन बारबेक्यू चिकन (डाक बुलगोगी)
साहित्य : बोनलेस चिकन क्युब्स – २५० ग्रॅम, ठेचलेले लसूण – ४ ते ५ पाकळय़ा, किसलेलं आलं – अर्धा टी स्पून, किसलेला कांदा  – १ (मध्यम),  सोया सॉस – दीड टी स्पून, तिळाचं तेल – अर्धा टी स्पून, साखर – दीड टी स्पून,  बारीक चिरलेली कांद्याची पात – अर्धी वाटी, काळीमिरी पूड – २ चिमूट, तीळाची भरड – २ टी स्पून, चिली पेस्ट – दीड टी स्पून, राइस वाइन – २ टी स्पून, िलबाचा रस –  १ टी स्पून.
कृती : वर दिलेले साहित्य एकत्र करून घ्या. चिकनचे तुकडे त्यामध्ये घोळून घ्या व १ तास मॅरिनेट करून ठेवा. नॉनस्टिक पॅनवर किंवा बारबेक्युवर हे चिकन शिजवून घ्या. गरमागरम चिकनवर कांद्याची पात टाका व सव्‍‌र्ह करा.