13 August 2020

News Flash

मेक-अप ट्रेंड्स

चेहऱ्याच्या मेकअपमध्ये या वेळी डोळे आणि ओठ यांना महत्त्व देण्यात आलंय. तुम्हाला डोळे फोकस करायचे असतील तर लीप कलर न्यूट्रल ठेवा आणि ओठ हायलाइट करायचे

| April 18, 2014 01:15 am

चेहऱ्याच्या मेकअपमध्ये या वेळी डोळे आणि ओठ यांना महत्त्व देण्यात आलंय. तुम्हाला डोळे फोकस करायचे असतील तर लीप कलर न्यूट्रल ठेवा आणि ओठ हायलाइट करायचे असतील तर डोळ्यांना सटल मेकअप करा. समर मेक-अपचे ट्रेंड्स आणि टिप्स..

हेअरस्टाइल्स
साइड बन हेअरस्टाइल सध्या ट्रेण्डमध्ये आहे. त्याचबरोबर वन साइडेड पोनीटेल किंवा वेणी पण तुम्ही ट्राय करू शकता. मागच्या सीझनचा मेसी लुक जाऊन आता क्लीन लुक ट्रेण्डमध्ये आला आहे. टॉप नॉट बन ट्राय करायला हरकत नाही. हेअर ब्रॅण्ड, क्लिप्स या हेअर अॅक्सेसरीज पण तुम्ही ट्राय करू शकता. फ्लोरल पॅटर्न या सीझनमध्ये हिट आहेत.

हायलाइट युअर लिप्स
लीप शेड्समध्ये सध्या ऑरेंज, रेड आणि पिंक शेड ट्रेण्डमध्ये आहेत. चेरी रेड ते मरूनपर्यंत लाल रंगा जी शेड तुमच्या चेहऱ्याला सूट होईल ती निवडा. तुम्हाला लुकसोबत एक्सपिरीमेंट करायचा असेल तर ऑरेंज शेड ट्राय करून बघा. डोळ्यांना बोल्ड लायनर लावून तुमचा लुक पूर्ण करू शकता.

हायलाइट युअर आइज
व्हाइट आय लायनर आता ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे स्पेशल ओकेजनला व्हाइट शेड ट्राय करायला हरकत नाही. याशिवाय शिमर किंवा ग्लिटर शेड्सच्या आय श्ॉडोज ट्राय करू शकता. आय मेकअप हेवी असल्यास तुम्ही काजळाला रजा देऊ शकता.

गो न्यूट्रल
‘गो न्यूट्रल’ हा यंदाच्या मेकअपचा मूळ मंत्र आहे. यात आय मेकअप आणि लीप शेड न्यूट्रल ठेवल्याने फोकस संपूर्ण चेहऱ्याला मिळतो. यासाठी पिंक किंवा न्यूड शेड्समधल्या लीप शेड्स तुम्ही वापरू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2014 1:15 am

Web Title: makeup trends
टॅग Fashion,Girls,Ladies
Next Stories
1 पॉलिटिकल फॅशन
2 पॉलिटिकल फॅशन
3 सेलिब्रिटींची जादू फिकी
Just Now!
X