News Flash

ओन्ली स्टार्टर्स

कुठल्याही हॉटेलात जा.. मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच

| April 12, 2013 07:13 am

कुठल्याही हॉटेलात जा..  मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.  

चीज ऑलिव्ह पायनॅपल स्टिक्स
साहित्य :  प्रोसेस्ड चीज – चौकोनी कापलेले तुकडे  ६, पायनॅपेल – चौकोनी कापलेले तुकडे ६,
ब्लॅक ऑलीव्ह – ६, टुथ पिक – ६ नग, पेस्टो सॉस
पेस्टो सॉससाठी साहित्य : बेसील पाने , ऑलीव्ह ऑइल – २ ते ३ चमचे, प्रोसेस्ड चीज – २ चमचे, लसूण – १ चमचा, काजूचे तुकडे – २ चमचे, मीठ – चिमूटभर. सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट तयार करा.
कृती : पायनॅपल, ऑलीव्ह ऑइल, चीज एकामागून एक स्टिक्समध्ये लावून घ्या.
आता या स्टिक्स सॉससोबत सव्‍‌र्ह करा.  
टिप्स  : अ‍ॅक्च्युली ऑथेन्टिक पेस्टो रेसीपीमध्ये पायनट आणि पाम्रेझान चीजचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा या गोष्ट अ‍ॅव्हेलेबल नसतात, म्हणून प्रोसेस्ड चीज आणि काजूचा वापर केला आहे.

मोझरेला कॅनॅपे / मॅरीनेटेड टोमॅटो कॅनॅपे
मोझरेला कॅनॅपे साहित्य : मोझरेला (मोझरेला नसेल तर कोणतेही चौकोनी कापलेले चीज), झुकीनी, यलो स्कॉश लांबट कापून त्याला थोडंसं तेल, मीठ, हर्बस् ब्लॅक पेपर, ठेचलेले लसूण तव्यावर परतून घेतलेले, लेटय़ूस, टोमॅटोचे लांबट काप, पेस्टो सॉस – ३ ते ४ चमचे, लांबट ब्रेडचे स्लाइसेस कापून घेतलेले.
कृती : ब्रेडचे स्लाईसेस टोस्ट करून घ्या. थोडे बटर लावून घ्या. वर लेटय़ूस, झुकीनी,  टोमॅटोचे स्लायसेस किंचित पेस्टो सॉस असे एकावर एक रचा आणि सव्‍‌र्ह करा.
मॅरीनेटेड टोमॅटो कॅनॅपे साहित्य : लेटय़ूस, टोमॅटोचे चौकोनी कापून घेतलेले तुकडे, ऑलीव्ह पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, ऑलीव्ह ऑइल, मीठ, काळमिरी, किसलेले पनीर, िलबाचा रस अर्धा चमचा, लांबट ब्रेडचे स्लाईसेस कापून घेतलेले.
कृती : वर दिलेले साहित्य टोमॅटोमध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या. ब्रेडवर लेटय़ूस लावून मॅरीनेटेड टोमॅटो त्यावर ठेवा. वर किसलेले पनीर टाका आणि सव्‍‌र्ह करा.
टिप्स् : पेस्टो सॉसची कृती – चीज ऑलिव्ह पायनॅपल स्टिक्स्  रेसीपीमध्ये  आलेली आहे.

पनीर कॅनॅपे  
साहित्य : लांबट ब्रेड – ६ पीस, पनीर क्यूबस्, बटर – २ चमचे, लेटय़ूस, लाल सिमला मिरची, ग्रीन ऑलीव्ह – २ चमचे, रेड चिली पावडर – १ चमचा, कोथिंबीर – १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची – १ चमचा, ब्लॅक पेपर पावडर – चिमूटभर, मीठ – चिमूटभर, चिरलेले लसूण – १ चमचा
कृती : एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण टाका, हिरवी मिरची टाका. पनीरचे तुकडे लाल मिरची पावडर व इतर साहित्य टाकून चांगले टॉस करा. नंतर हे मिश्रण थंड करून घ्या.
ब्रेडला बटर लावून त्यावर लेटय़ूस लावा. आता तयार मिश्रण ब्रेडला लावा.
ऑलीव्हने गाíनश करून सव्‍‌र्ह करा.

व्हेजीटेबल स्टिक्स
साहित्य : फिंगर साईजमध्ये कापून घेतलेल्या भाज्या (काकडी, बीट, गाजर, रंगीत सिमला मिरची (लाल, हिरवी, पिवळी इ.) सोबत सव्‍‌र्ह करायला कॉकटेल सॉस आणि स्पिनच गार्लिक योगर्ट
कॉकटेल सॉससाठी साहित्य : टोमॅटो केचप, मेयोनेस सॉस, टोबॅस्को सॉस, मीठ – चिमूटभर
स्पिनच गार्लिक योगर्टसाठी साहित्य : पाणी काढून बांधून घेतलेले दही, पालक पेस्ट (पालक उकडून) – २ चमचे, लसूण ठेचून घेतलेला, मीठ – चिमूटभर, काळीमिरी पूड – २ चिमूट, साखर – १ चिमूट, बारीक चिरलेली कोथिंबीर -१ चमचा
कृती : फिंगर साईजमध्ये कापून घेतलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये सजवा. कॉकटेल सॉस व स्पिनच गार्लिक सॉससोबत सव्‍‌र्ह करा.
टीप : ही रेसीपी स्टार्टर्स म्हणून किंवा सॅलेड म्हणूनही आपल्याला सव्‍‌र्ह करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 7:13 am

Web Title: only starter food
टॅग : Viva
Next Stories
1 क्लिक
2 रेडी टू फेस समर
3 डाएट करा चवीचवीने!
Just Now!
X