पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी त्वचारोगतज्ज्ञ आणि बर्कोवित्स स्किन क्लिनिकच्या संस्थापक डॉ. जयश्री मनचंदा यांनी दिलेल्या टिप्स.
रणरणत्या उन्हाच्या काहिलीनंतर, पावसाच्या शीतल सरी सर्वानाच नवसंजीवनी देतात. पण पावसाळ्यात जाणवणाऱ्या सततच्या ओलाव्यामुळे काहींना त्वचेच्या तक्रारीही सहन कराव्या लागतात.
पावसाळ्यात त्वचा शुष्क होते. त्वचेच्या बाहेरील व आतील स्तरांची आद्र्रता कमी होणे किंवा नष्ट होणे या स्थितीला त्वचा शुष्क होणे असे सामान्यत: म्हटले जाते. त्वचेला शुष्कपणा अनेक कारणांनी येऊ शकतो.
बहुतेकदा पर्यावरणीय घटकांचा एकत्रित परिणाम तसेच उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जाणवणारी उष्णता आणि वातानुकुलित यंत्रांच्या वापराने निर्माण होणारा कृत्रिम थंडावा ही यामागील प्रमुख कारणे आहेत. हवेतील बाष्प म्हणजेच हवेतील आद्र्रता त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक असते, कारण ती त्वचा ओलसर किंवा मऊ ठेवण्यास मदत करते.
उन्हाळ्यात हवेचे तापमान वाढते, परिणामी हवेतील आद्र्रता पुष्कळ प्रमाणात कमी होते. आपण स्वयंपाकघरात शेगडी बराच वेळ सुरू ठेवली तर पूर्ण घरातील हवा जशी गरम आणि कोरडी होते अगदी तसेच काहीसे. घाम आणि गर्मीने त्रस्त करणाऱ्या उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा सर्वानाच हवाहवासा वाटतो, पण पावसाळ्यातील दमट, ओलसर हवा त्वचा आणि डोळ्यांसाठी आरोग्यकारक नसते. अर्थात तज्ज्ञांच्या मते या ऋतूत आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि वापराच्या वस्तूंमध्ये थोडाफार बदल करून आपण त्वचेचा तजेला आणि डोळ्यांची चमक परत मिळवू शकतो.
ऑइली स्किन
त्वचेचा हा गुणधर्म शरीरातील जनुकीय रचनेनुसार स्रवणाऱ्या संप्रेरकामुळे उद्भवतो. अशा त्वचेची निगा राखण्यासाठी तिच्यावरील अतिरिक्त तेलाचा अंश दिवसातून दोनदा किंवा फार फार तर तीनदा काढून टाकणे गरजेचे असते. एकूण काय तुमचा चेहरा दिवसातून दोनदा किंवा तीनदाच धुवा, कारण जास्त वेळा चेहरा धुतल्याने त्वचेच्या तलनिर्मितीची प्रक्रिया मंदावण्याऐवजी फोफावते.
नेहमी सौम्य स्वरूपाची क्लीन्सिंग क्रीम्स आणि स्क्रब्ज नियमितपणे वापरणे केव्हाही योग्य. यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि त्वचेवरील मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.
या शिवाय तुम्ही मुलतानी मातीचा मड-पॅक किंवा घरच्या घरी हळदीचा किंवा चण्याचे पीठ आणि निरश्या (कच्च्या) दुधाचा एकत्रित फेस-पॅक वापरून त्वचा रिफ्रेिशग आणि ग्लोइंग करू शकता.
ड्राय स्कीन
त्वचेचा कोरडेपणा हा शरीरातील पाण्याची आणि पूरक जीवनसत्त्वांची कमतरता दर्शवतो. पावसाळ्याच्या दिवसात या तक्रारी अजून वाढीस लागतात. अशा वेळी क्रीम बेस्ड क्लिन्झर वापरणे योग्य. कोरडय़ा त्वचेचा मुकाबला करण्यासाठी मॉइस्चरायझर उपयोगात आणावे. यामुळे त्वचेच्या वरच्या थरांतील पाण्याचे प्रमाण वाढते आणि स्किन मऊसर दिसते. मात्र या प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी अल्कोहोलविरहित टोनर वापरण्याची खबरदारी बाळगावी.
मिक्स स्किन टाईप
त्वचेच्या या प्रकारात चेहऱ्याची इंग्रजी ‘टी’ अक्षराच्या आकाराचा भागातील (कपाळ आणि नाक) त्वचा तेलकट तर गालांवरील त्वचा कोरडी किंवा सामान्य असते. अशा वेळी चेहऱ्याच्या दोन्ही भागांतील त्वचेची वेगवेगळी निगा राखली पाहिजे. उदाहरणार्थ कोरडय़ा भागासाठी सौम्य क्लिन्झर आणि नियमित मॉईस्चरायझर तर तलीय भागासाठी क्लिन्झर आणि नियमित स्क्रबर.
पावसाळा आणि त्वचेच्या तक्रारी
बुरशी आणि जिवाणूजन्य (फंगल, बॅक्टेरिअल) त्वचा रोग पावसाळ्यात बळावतात. ओलसर त्वचेवर हे रोग तीव्रतेने फैलावतात. त्वचेवर पुरळ उठणे किंवा िरगवम्र्स यामुळे त्वचेचा मूळ रंग बदलतो. त्वचेचे, शरीराचे आरोग्य राखायचे असेल तर सुती कपडे वापरावेत. यामुळे शरीराभोवती हवा खेळती राहायला मदत होते. ओले केस पूर्ण सुकल्यावरच बांधलेले चांगले. डास आणि अन्य कीटकांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे कपडे आणि डास प्रतिरोधक क्रीमचा वापर करणे योग्य. शक्य झाल्यास वातानुकूलित वातावरणात राहता आल्यास उत्तम. सरतेशेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेच्या सर्व तक्रारी टाळण्यासाठी दिवसातून दोनदा आंघोळ करणे अति उत्तम.
(अनुवाद : गीता सोनी)