03 December 2020

News Flash

मेकओव्हर टाइम!

बिघडलेला लुक  पुसून टाकू न मेकओव्हर करण्यासाठी तरुणाईची सलॉन आणि स्पावारी सुरू झाली आहे.

गायत्री हसबनीस

घरच्या घरी केस कापल्यामुळे फिस्कटलेला हेअर लुक, चेहऱ्यासाठी घरगुती उपायांचा एक्स्पर्टशी प्रत्यक्ष न बोलता केलेला वरवरचा अवलंब आणि डाएट- व्यायामाचे तीनतेरा वाजल्यामुळे जमके  खाओचे शरीरावर झालेले परिणाम.. लॉकडाऊनच्या काळात बिघडलेल्या या गणितांनी इतरांबरोबरच तरुणाईची जीवनशैलीही चांगलीच विस्कटली आहे. आता हा बिघडलेला लुक  पुसून टाकू न मेकओव्हर करण्यासाठी तरुणाईची सलॉन आणि स्पावारी सुरू झाली आहे. स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही गोष्टींचे भान ठेवत बिघडलेला लुक दुरुस्त करून देण्यासाठी सलोन आणि स्पावर भर दिला जातो आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात..

ग्रुमिंग आणि सेल्फ केअरअंतर्गत सेवांची मागणी सध्या जास्त आहे. थोडक्यात, कु ठल्याही स्पेशल लुकची मागणी न करता आरोग्याच्या दृष्टीने बिघडलेल्या गोष्टी ताळ्यावर आणणाऱ्या मूलभूत सेवांची मागणी प्राधान्याने के ली जात आहे, असे मत ‘एनरिच सलॉन’चे संस्थापक विक्रम भट्ट व्यक्त करतात. सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे जास्त वेळ घेऊन हेअरकटिंग, फे स क्लीनिंगसारख्या सेवांना मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लॉकडाऊनच्या काळात केसांची निगा राखणे आणि स्टाइल मेन्टेन करणे कोणालाही फारसे जमलेले नाही. त्यामुळे हेअरकट, हेअरकलर ट्राय करणारे अनेक जण आहेत. त्यातही काहींनी अनलॉकच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत नवीन हेअरकट ट्राय केले. ‘ग्लोबल क्रेझी हेअर’, ‘बॉब हेअर कट’ आणि ‘फ्रिं गल्स’ असे हेअरकट्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. पण सध्या ग्राहकांना आरामदायी आणि स्वच्छ- नीटनेटक्या वेलनेस सेवांची गरज आहे’, असे निरीक्षण विक्रम भट्ट यांनी नोंदवले. ‘हेअर अफेअर फॅमिली सलॉन अ‍ॅण्ड स्पा’ चालवणाऱ्या वैभव गाडेकरच्या मते, तरुण वयोगट जरी सलॉन आणि स्पाकडे वळत असला तरी हा वर्ग सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांच्या केसगळतीच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बिघडलेली के शरचना त्यांना नीट क रून हवी आहे, तर घरच्या घरी के स कापून कं टाळलेल्या तरुणांना सलॉनच्या मदतीने योग्य असा हेअरलुक करून हवा आहे. ‘सध्या ऑफिसला जाणाऱ्या तरुणींचा एकच सूर असतो, केस वाढले आहेत ते कमी करून हवेत. त्यामुळे शॉर्ट हेअर लुक आणि ‘लेअर कट’ सध्या ट्रेण्डी आहे असे म्हणता येईल. ‘तरुणांना खास हेअरकटबरोबर वाढलेली दाढी कमी करून आणि योग्य आकारात हवी आहे,’ अशी माहिती वैभवने दिली. अगदी स्टाइलिश नाही पण नीटनेटका लुक तरुणाईला हवा आहे, असे तो म्हणतो. स्पाकडे वळण्याचे लोकांचे प्रमाण अजूनही कमी आहे, मात्र स्किन के अर आणि स्किन ट्रीटमेंटसाठी अनेक जण येतात. अर्थात, कोविड-१९ च्या भीतीमुळे स्किन ट्रीटमेंट घेणे किती सुरक्षित असेल, या शंके पोटीही स्पाकडे वळण्याचे प्रमाण सध्या कमी असल्याचे वैभवने सांगितले. डाएट फिस्कटल्यामुळे के स आणि त्वचेच्या बाबतीत निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी सलॉन-स्पामध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे त्याने स्पष्ट के ले.

स्पामध्ये येण्यापूर्वी ‘स्वच्छते’चा अधिक गंभीरतेने विचार के ला जातो. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार जे स्पा सेवा देतात तिथेच लोक सहज वळतात, असे ‘स्पा बाय क्लॅरिन्स’चे सर्वेसर्वा, योग प्रशिक्षक आणि स्पा थेरापिस्ट योगेश सावंत सांगतात. ‘ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा पाठदुखी आणि स्नायुदुखीवर उपाय म्हणून मसाजसाठी जास्त येतात. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना स्ट्रेस आणि टेन्शनचा सामना करावा लागला. त्यामुळे रिलॅक्सेशनसाठी अनेक जण आमच्याकडे येत आहेत. आयुर्वेदानुसार थंडीमध्ये मसाज घेणे आवश्यक असते. कारण तेव्हा त्वचा कोरडी असते व त्यावर तेलाचे अभ्यंग करणे गरजेचे असते. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक स्पाकडे अशा मसाजसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जास्त गर्दी करतील, परंतु सध्या तरी रिलॅक्सेशन म्हणूनच स्पाकडे वळत आहेत. सध्या मसाजमध्ये बॉडी डिटॉक्स करणे, इंटर्नल बॉडी क्लीन्झिंग हे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. योगाद्वारेही छाती आणि नाकावाटेचा भाग क्लीन करणारे प्रकारही ट्रेण्डमध्ये आहेत. आम्ही मसाजसोबत स्टीम देतो, त्यामुळे क्लीन्झिंग होते. त्याचबरोबर हेल्थी डाएटसुद्धा आम्ही प्री आणि पोस्ट मसाज देतो. उदाहरणार्थ, हर्बल टी, लाइम ज्यूस, ऑरेंज ज्यूस. लॉकडाऊनमध्ये वजन वाढल्याने फॅट्स बर्नसाठीच्या थेरपी हव्या आहेत, अशा मागण्याही तरुणींकडून होत असल्याने त्यांना आम्ही पॉवर मसाज देतो. तरुणांमध्ये जास्तकरून रिलॅक्सेशनसाठीच्या थेरपी ट्रेण्डमध्ये आहेत’, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये विस्कटलेला अवतार पुन्हा नीट करण्यासाठी म्हणून सध्या तरी तरुणाई मेकओव्हरवर जास्त भर देते आहे. अनलॉकमधून बिचकत बाहेर पडणेही आता लवकरच मागे पडेल आणि ऑफिसेस सुरू होतील तसा डाएट-फिटनेस, स्टाइलचा नित्यनेमही रुळावर येईल. हळूहळू स्टाइल्सच्या समीकरणांचीही जुळवाजुळव सुरू होईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त के ला आहे. स्टाइलसे जगण्यावर भर देणारी तरुणाई फार काळ यापासून दूर राहू शक णार नाही हे निश्चित!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:05 am

Web Title: salon and spa center for youth zws 70
Next Stories
1 सर्जनाच्या नव्या वाटा
2 सदा सर्वदा स्टार्टअप : तयार संकल्पनांची किमया!
3 रास ना रंग
Just Now!
X