News Flash

फॅशन पॅशन : आत्मविश्वास हेच खरे स्टाइल स्टेटमेंट

मी अठरा वर्षांची मुलगी आहे. माझी उंची ५.२ फूट असून वजन ७६ किलो आहे. मला होजिअरी टॉप्स घालणं विशेष रुचत नाही. कारण मी त्यात जाड

| November 22, 2013 01:05 am

मी अठरा वर्षांची मुलगी आहे. माझी उंची ५.२ फूट असून वजन ७६ किलो आहे. मला होजिअरी टॉप्स घालणं विशेष रुचत नाही. कारण मी त्यात जाड दिसते. मी नेहमी पूर्ण बाह्य़ांच्या कुर्ती वापरते. पण ते आता फार ओल्ड फॅशन्ड झालंय. मला माझं स्टाइल स्टेटमेंट बदलायचंय. कृपया मला मार्गदर्शन करा.      
स्मृती, मुंबई
होजिअरीचे कपडे निश्चितच जाड व्यक्तीला अधिक जाडजूड दिसायला लावतात. निटेड गारमेंट्स म्हणजे विणलेले कापड याच पद्धतीचे असते. ते अंगावर घातल्यावर जाड दिसते. त्यामुळे हलक्या कापडावर भर दे. म्हणजे कॉटन, क्रेप, शिफॉन, जॉर्जेट अशा कापडांचेच ड्रेस वापर. नेहमीच पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस किंवा टॉप वापरायची आवश्यकता नाही. त्याऐवजी थ्री-फोर्थ स्लीव्ह्ज वापरून बघ. बंद गळ्याचे, विशेषत: कॉलरवाले ड्रेस शक्यतो टाळ. त्याऐवजी जरा मोकळ्या गळ्याचे व्ही नेक, लीफ शेप नेक वगैरे ट्राय कर. छोटय़ा प्रिंट्स असलेली डिझाइन्स निवड.
जीन्स वापरत असशील तर स्ट्रेट फिट जीन्स वापरण्याऐवजी खाली निमुळती होत जाणारी जीन्स वापर. कुठलाही टॉप उंचीला मोठा असलेला वापर. हिप्स पूर्णपणे झाकले जातील असाच तो असावा. खरंतर डार्क कलर घातल्याने व्यक्ती आहे त्यापेक्षा बारीक दिसते. पण तुझा स्कीन टोन लक्षात घेता खूप डार्क कलर वापरणे योग्य नाही. त्याऐवजी रॉयल ब्लू, माइल्ड ऑरेंज, पोस्टर ग्रीन, पीच, क्रीम, प्लम असे रंग तुझ्यावर खुलून दिसतील.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुझ्या साइजचे कपडे वापर. सैलसर कपडे अजिबात घालू नको. व्यवस्थित फिटिंग असणारे कपडे जादू करू शकतात. अंगापेक्षा बोंगा जास्त असे कपडे भोंगळ वाटतात, अजागळ वाटतात. बाकी सगळं स्टाइल स्टेटमेंट तुझ्या अ‍ॅटिटय़ूडमध्ये आहे, हे लक्षात ठेव. कुठल्याही गोष्टीची, आपल्या वजनाची, आकाराची लाज वाटणं पहिलं सोडून दे. टिपिकल आउटफिट्स वापरावे लागतात, याचा बाऊ करू नकोस. फक्त वजन जास्त, अंगकाठी जाड म्हणून काही फरक पडत नाही. तुझ्यातला आत्मविश्वास तुला स्मार्ट दिसायला, छान दिसायला मदत करेल. तेच खरे स्टाइल स्टेटमेंट आहे. चीअर्स!
एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, आपल्या कांतीला कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना, ही फॅशन शोभून दिसेल ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या आऊटफिट्सविषयी, फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:05 am

Web Title: self confidence is a true style statement
टॅग : Fashion,Style
Next Stories
1 भटकंतीचं काम
2 विष्णूज् मेन्यू कार्ड : द्राक्ष पुराण
3 पीक ऑफ द वीक
Just Now!
X