21 November 2019

News Flash

फॅशन पॅशन : सिंपल पण स्मार्ट फॉर्मल्स

हाय! मी सत्तावीस वर्षांची आहे. माझी उंची ५ फूट १ इंच आहे. मी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. मला कुठली...

| January 24, 2014 01:06 am

हाय! मी सत्तावीस वर्षांची आहे. माझी उंची ५ फूट १ इंच आहे. मी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. मला कुठली ड्रेसिंग स्टाइल सूट होईल? माझं प्रोफेशन आणि काम लक्षात घेता मी कसा पेहराव करावा?
– प्रज्ञा

प्रिय प्रज्ञा,
तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असता, तेव्हा फॉर्मल ड्रेसिंग असावं. व्यवस्थित सलवार-कुर्ता, साडी, ट्राउझर-शर्ट किंवा फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, ब्लेझर अशा प्रकारचा पेहराव असावा. टॉपमध्ये किंवा स्कर्टला, कुर्त्यांला झालर, लेअर किंवा वेगळं कुठलं डिझाईन करायचं टाळावं, त्यामुळे ड्रेसिंग सेन्स अगदी भडक वाटू शकतो. पिन टक्स किंवा प्लिट्स मात्र छान दिसतात. त्यामुळे यातलं कुठलं तरी एक केलं तरी छान दिसतं. फॉर्मल कपडय़ांचे कट्स किंवा सिलोएट्स साधेसे असावे. म्हणजे स्लीम फिट किंवा स्ट्रेट कट असावा.
बहुतेक वेळा कॉटन, लीनन किंवा त्या पद्धतीच्या कापडाचे ड्रेस असावेत. फॉर्मल्समध्ये पांढरा, क्रीम, बेज, ब्राऊन, ब्लू, इंग्लिश ग्रीन, मरून, ग्रे असे रंग येतात. गंमत म्हणजे हे सगळे रंग कुठल्याही वर्णावर उठून दिसतात. तुमचा वर्ण काळा, गव्हाळ किंवा गोरा असला तरी काही फरक पडत नाही. शर्टच्या कॉलर आणि कफ्स असतील तर फॉर्मल वेअर उठून दिसतात. लो कट किंवा रीव्हिलिंग नेकलाइन, खोल गळा असलेले ड्रेस शक्यतो टाळ. फार ड्रेसी स्लीव्हजसुद्धा नकोत. वेस्टर्न फॉर्मल्स घालणार असशील तर साधा शर्ट आणि ट्राउझर्स असा पेहराव ठेव. हल्ली ट्राउझर्सऐवजी स्ट्रेट कट जीन्स फॉर्मल म्हणून घालायचा ट्रेंड आलाय.
साडी नेसणार असशील तर साडी शक्यतो कॉटन किंवा त्यासारख्या पोताची असावी. जॉर्जेट, शिफॉन किंवा नेटच्या साडय़ा कॉलेजमध्ये शिकवायला जाताना टाळाव्यात. साडीला फार डिझाइन नको. छोटा काठ किंवा बारीक नक्षी शोभून दिसेल. ब्लाऊजसुद्धा साधं, डिसेंट नेकलाइन आणि स्लीव्हज असलेलं घालावं.
कपडय़ावरची कशिदाकारी किंवा डिझाइन मात्र कमीत कमी असण्याकडे कल ठेव. कुर्ते वापरणार असशील तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. छोटय़ा भागात केलेली एम्ब्रॉयडरी किंवा इतर काम ठीक पण पूर्ण भरलेला ड्रेस नको.
तू फॅशन किंवा त्यासंबंधित क्षेत्र सोडता इतर कुठल्याही विषयाची असिस्टंट प्रोफेसर असशील तर या सगळ्या गाइडलाइन्स लागू पडतील. पण फॅशन इन्स्टिटय़ूट्समध्ये किंवा कॉलेजमध्ये फॅशन डिझाइन प्रोफेसर सध्या ‘इन व्होग’ असलेले कुठलेही फॅशनेबल पेहराव करून येतात!

एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.

First Published on January 24, 2014 1:06 am

Web Title: simple but smart formal
Just Now!
X