चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. जेवणाच्या शेवटाला डीझर्ट देण्याची पद्धत आहे. ते खाण्याची योग्य पद्धत कोणती? जेवण झाल्यानंतरचे काही विशिष्ट शिष्टाचार सांगणारा आजचा लेख..

जेवतानाचे एटिकेट आपण सध्या बघत आहोत. कॉण्टिनेंटल आणि अमेरिकन पद्धतीमधील कटलरी वापरायचे आणि ती ठेवायचे संकेत आपण गेल्या दोन भागांत पाहिले. आता जेवणाच्या शेवटाकडे येऊ या. मेन कोर्स खाऊन झाला की, टेबलवरची बरीचशी सामग्री उचलली जाते. डिनर प्लेट काढल्यानंतर साइड प्लेट, न वापरलेली कटलरी आणि क्रुएट सेट काढला जातो. यानंतर एका सुबक ब्रशने आणि छोटय़ा, सुबक सुपडय़ाने (हा सुपडा प्लास्टिकचा नसून चकचकीत पितळ किंवा प्लेटेड चांदीचा असतो!) टेबलावर पडलेले अन्नाचे कण साफ केले जातात. बहुतेक वेळा हे कण ब्रेडरोलचे असतात म्हणून या कृतीला ‘क्रिम्बग’ म्हणतात.
23
टेबलावर आता फक्त डीझर्ट कटलरी, सेंटर पीस आणि पाण्याचा ग्लास असतो. डीझर्ट जर प्लेटमध्ये सव्‍‌र्ह केलं असलं तरच ही कटलरी वापरली जाते. हा काटा आणि चमचा बघून अनेकांना प्रश्न पडतो की कॅरामल कस्टर्डसारखी मऊ डिश खायला फक्त चमचा पुरे असताना काटा का ठेवला जातो? तर याचं उत्तर – शेवटचा तुकडा जेव्हा उरतो, तो मऊ असल्याने नुसत्या चमच्याने उचलायला थोडं कठीण पडतं आणि त्या प्रयासात तो तुकडा, हॉकी खेळल्यासारखा चमच्याने प्लेटमध्ये गोल-गोल फिरवला जातो. आता हे शिष्टाचारात बसत नाही. मग तो तुकडा चमच्यावर व्यवस्थित ठेवण्यासाठी काटय़ाचा उपयोग केला जातो. काटय़ाच्या मागच्या बाजूने तो तुकडा अलगद चमच्यात ठेवायचा असतो आणि चमच्याने खायचा असतो.
डीझर्ट खाल्ल्यानंतर कॉफी सव्‍‌र्ह केली जाते. मागच्या सदरात सांगितलं तसं, ही कॉफी अगदी छोटय़ाशा कपबशीत दिली जाते आणि बहुधा ती बिनादुधाचीच पितात. अनेकदा कॉफीबरोबर ब्रँडी किंवा कुठली लिक्युअर सव्‍‌र्ह करतात. विविध प्रकारच्या लिक्युअर्स -मद्य घालून स्पेशल कॉफीज पण छोटय़ा प्रमाणावर केलेल्या समारंभात सव्‍‌र्ह होतात आणि याचबरोबर निरनिराळ्या प्रकारची चॉकलेट्स किंवा ‘पेतीत फूर्स’ देतात. ‘पेतीत फूर्स’ म्हणजे डीझर्टचाच प्रकार आहे. एका प्रकारच्या केकचे अतिशय छोटे तुकडे, ज्यांवर आयसिंग करून खूपच नाजूक, सुबक डिझाइन्स केली जातात. कॉफी झाल्यानंतर, होस्टचं एक आभार प्रदर्शनाचं भाषण असू शकतं, त्यानंतर प्रमुख पाहुणे समारंभातून रजा घेतात. प्रमुख पाहुणे जायच्या आधी इतर उपस्थितांना निघून जाता येत नाही. जाताना, एका सुंदर भोजनाचा आस्वाद घ्यायची संधी दिल्याने, होस्टचे आभार मानूनच बाहेर पडावे. दुसऱ्या दिवशी हे आभार ई-मेल अथवा छोटय़ा पत्राद्वारे कळवल्याने शिष्टाचार पूर्ण होतो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
dombivli crime news, double money scheme dombivli marathi news,
डोंबिवलीत दामदुप्पटच्या आमिषाने ज्येष्ठांची फसवणूक