News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : अपडेट्सचा पाठपुरावा!

पैसे मिळोत अथवा न मिळोत इन्व्हेस्टर्स अपडेट्सचं महत्त्व स्टार्टअप जगात मोठं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अपूर्वा जोशी

तुम्ही गुंतवणूकदारांना अपडेट्स किती वेळा पाठवावेत?, हा तुमच्या स्टार्टअप प्रवासातला महत्त्वाचा भाग असू शकतो. जर तुम्ही ही गोष्ट योग्य दृष्टिकोन ठेवून केली तर ती तुम्हाला वेळेवर आणि घेतलेल्या कष्टांवर एक सर्वोत्कृष्ट परतावा देऊ शकते; किंवा नाही केली तर संधी पूर्णपणे वाया जाऊ शकते. बऱ्याचदा गुंतवणूकदार पैसे एखाद्या व्यवसायात गुंतवतात, त्यानंतर  उद्योजकाकडून त्याच्या कामाबद्दल अपडेट्स मिळणं ही एक न बोलली जाणारी, अलिखित अपेक्षा असते. पैसे मिळोत अथवा न मिळोत इन्व्हेस्टर्स अपडेट्सचं महत्त्व स्टार्टअप जगात मोठं आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणूकदारांना किती वेळा अपडेट केले पाहिजे आणि तुम्हाला त्यातून अधिक चांगले परिणाम कसे मिळवता येतील याबद्दल या लेखात बोलूया.

१) गुंतवणूकदारांना अपडेट्स का पाठवायचे?

अपडेट्स पाठवण्याची पुष्कळ कारणं आहेत, परंतु संस्थापक म्हणून तुमच्यासाठी काही मुख्य फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

*   व्हिझिबल राहण्यासाठी

किती लोक माझे सतत त्यांच्या मेलबॉक्समध्ये जाणारे ईमेल हटवत असावेत याबद्दल मला मुळीच हरकत नाही; किमान ते माझे नाव पाहत राहतात, त्यांच्या इनबॉक्समध्ये समोर दिसणाऱ्या मेलमधून; किमान मी नेहमी काही वेळ त्यांच्या विचारांमध्ये तरी राहते. तुम्हाला वाटत नाही का की गुंतवणूकदारांचे लक्ष स्वत:कडे टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या विचारांमध्ये राहण्यासाठी हा प्रयत्न जरुरीचा आहे?

*   मदत मिळवण्यासाठी

मदत मागितली नाही तर ती तुम्हाला मिळणारही नाही. गुंतवणूक जोपर्यंत मागत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला फंडिंग राउंड्स बंद करता येणार नाहीत.

*   संबंध जोडण्यासाठी

तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नसतानाही तुमचा कल सतत नवीन नाती जोडण्याकडे असायला हवा. तुम्हाला कधीही इनपुट वाढवण्याची किंवा इतर इनपुटची आवश्यकता भासल्यास तुमच्या या सवयीमुळे  तुमच्याकडे भरपूर क्रेडिट आणि गुडविल जमलं असेल ज्याचा भविष्यात फायदाच होईल.

*   बिझनेस इनसाइट्स आणि सखोल मनन

गुंतवणूकदारांना अपडेट्स देण्याचे एक मोठे कारण म्हणजे आपल्या स्वत:च्या व्यवसायाबद्दल सखोल  मनन करण्यासाठी आणि लहान वाटणाऱ्या पण व्यवसायातल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर इनसाइट्स मिळवण्यासाठीचा वेळ जमवणे. स्टार्टअपच्या आयुष्यात खूप गोष्टींची गर्दी होते आणि त्यातून धांदल उडते. काही वेळा क्षणभर तुमची कामं संथ करून जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे, ऑन पेपर, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहता तेव्हा काही ‘युरेका’ क्षणांची तुम्हाला जाणीव होईल.

२) करंट इन्व्हेस्टर्सना देण्यात येणारे अपडेट्स

सर्वसामान्यपणे उद्योजक गुंतवणूकदारांना मन्थली अपडेट्स देत असल्याचे दिसते. माझ्या मते ही पेस फंडिंग राउंड्सच्या दरम्यानच्या काळातली एक वाजवी पेस आहे. त्यांच्या रडारवर राहण्याचे हे एक प्रबळ साधन आहे, तुम्ही मेहनत घेत आहात आणि त्यांच्या पैशाची काळजी घेत आहात हे त्यांना पॅसिव्हली कळू द्या. हा एक प्रयत्न त्यांना व्यग्र ठेवतो आणि तुमच्या पुढच्या वित्तपुरवठा फेरीची जाणीव जागरूकपणे करून देतो. काही उदाहरणांमध्ये उद्योजक अपडेट्स तिमाहीनंतर (क्वार्टरली) देतात, परंतु गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील इतर स्पर्धक स्टार्टअप्स आणि सक्रियपणे पीच क रणारे स्पर्धक लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात ताजे राहण्याचा फायदा विचारात घ्या की खरंच क्वार्टरली अपडेट्स देणं कितपत उपयोगी होईल?  तुमच्या कामकाजात सक्रियपणे गुंतलेल्या इतर गुंतवणूकदारांसह तुम्हाला कदाचित वीकली अपडेट्स देणं अधिक इष्ट ठरेल.

मला असं दिसतं की बरेच उद्योजक जेव्हा त्यांना अधिक पैसे उभे करण्याची आवश्यकता असते तेव्हाच गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याची चूक करतात. तुम्हाला गुंतवणूकदारांच्या विचारांच्या केंद्रस्थानी राहणं आणि तुमच्या प्रगतीबद्दल त्यांना अपडेट करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला पुढच्या टप्प्याचा वित्तपुरवठा हवा असेल तेव्हा संभाषण सोपे राहील.

३) संभाव्य गुंतवणूकदार

हीच संधी आहे गुंतवणूकदारांच्या रडारवर राहण्याची, कुतूहल जागं ठेवून तुमचे फॉलोअर्स वाढवण्याची, परिचयांना प्रोत्साहन देण्याची आणि एक उत्तम निधी उभारणी कॅम्पेनची मांडणी करण्याची.

‘कोरा’ प्लॅटफॉर्मवरून, एंजल इन्व्हेस्टर सीए मयूर जोशींनी खूप चांगल्या शिफारशी केल्यात त्यातली महत्त्वाची म्हणजे ‘कोरा’चा जास्तीतजास्त वापर करून संभाव्य गुंतवणूकदारांना तुमच्या लिस्टमध्ये अ‍ॅड करून घेणे आणि तुमचे अपडेट्स ४-८ आठवडय़ांच्या अंतराने त्यांना पाठवत राहणं.

४) सक्रिय निधी संकलन कालावधी

सक्रिय निधी उभारणीच्या प्रयत्नांदरम्यान तुम्ही किती वेळा अपडेट्स पाठवाल ही गोष्ट अ) फंडिंग राउंड अंदाजे किती वेळ तुमचा घेण्याची तुम्ही अपेक्षा करता ब) तुमची मोमेंटम / चालना किती जलद आहे, यावर अवलंबून बदलू शकतात. काहींचा विश्वास आहे की उद्योजक दर २-३ दिवसांनी अपडेट्स देऊ शकतात. साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक किंवा मासिक  सातत्य अधिक कार्यक्षम असू शकेल. प्रत्येक वेळी तुमच्याकडे शेअर करण्यासाठी काही बातमी असेल तेव्हा ती लगेच योग्य माध्यमातून कळवली जाईल याची दक्षता घ्या.

५) तुमचे अपडेट्स गुंतवणूकदारांना कसे पाठवाल?

अपडेट्स सामान्यत: ईमेलद्वारे पाठवले जातात. बरेच गुंतवणूकदार हेवी ईमेल युजर्स असतात. हे एक प्रभावी माध्यम आहे जिथे तुमचा संदेश पोहोचवण्यासाठी तुम्ही पुरेसे महत्त्वाचे फॅक्ट्स आणि संदर्भ मिळवू शकता. याला अपवाद असू शकतात, विशेषत: जर तुम्ही नवीन संभाव्य एंजल इन्व्हेस्टरकडे पाहत असाल. हे गुंतवणूकदार बहुधा ‘लिंक्डइन’ आणि ‘ट्विटर’वर आढळतात. तर, उद्योजक काही मर्यादित सार्वजनिक अपडेट्स किंवा थेट मेसेजिंगसाठी या माध्यमांचा विचार करू शकतात.

६) तुमच्या गुंतवणूकदारांच्या अपडेट्समध्ये काय पाठवायचे?

*  कंपनीतले नवीन कर्मचारी

*  बातमी वार्ताकन

*  नवीन उत्पादने आणि सेवा

*   कोअर मेट्रिक्स

*  नवे गाठलेले टप्पे

*  कंपनीशी जोडले गेलेले नवीन गुंतवणूकदार

*  नवीन ग्राहक

*  तुमची पुढील वाटचाल

७) तुमच्या गुंतवणूकदार अपडेट्समधून अधिक परतावा कसा मिळवता येईल?

प्रत्येक गुंतवणूकदार युनिक असतो. जेव्हा तुम्ही विविध फंडिंग राउंडमधून प्रगती करता तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये आणखी बदल होतात. तुमच्या अपडेट्सद्वारे मदतीसाठी विचाराल याची खात्री करा. लोक इतरांना मदत करतात. तुम्ही विचारण्यास पुढाकार घेतला हे पाहून आपल्या गुंतवणूकदारांना बरंच. याशिवाय, त्यांची स्वत:ची गुंतवणूक स्टेकवर आहे. त्यांना परतावा वाढवण्याची संधी द्या.

तुमच्या व्यवसायासाठी ‘टेम्पलेट’ तयार केल्याने अपडेट्सची प्रक्रिया सुलभ बनते; विशेषत: सद्य गुंतवणूकदारांसाठी तुम्ही फंडिंग राउंड पूर्ण केल्यानंतर इतर अपडेट्स टेम्पलेट करणं थोडं अधिक कठीण असू शकतं. एखाद्या व्यावसायिक स्वतंत्ररीत्या काम करणाऱ्या लेखकाकडे हे आउटसोर्सिग करणं हा आणखी एक पर्याय आहे. त्यांना आकडेवारी आणि माइलस्टोन्स फीड करा आणि त्यात त्यांच्या रचनेची जादू दाखवू द्या.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 8:50 pm

Web Title: viva startup article on follow up updates abn 97
Next Stories
1 ‘नथिं’ग रॉन्ग
2 वस्त्रांकित : लोकसाहित्य आणि वस्त्र परंपरा
3 नावातच ‘युजर’आहे!
Just Now!
X