अजूनही काही महिला मुलामुलींच्या एकत्र गटात एकटीने सहलीला- ट्रेकला जायला बिचकतात़ तर काहींच्या घरून तशी परवानगी नसत़े यावर उपाय आहे ऑल विमेन ट्रेक्सचा. निसर्गमित्र, कल्पविहार अशा काही संस्था ८ मार्चला खास महिला दिनानिमित्त फक्त महिलांचे विशेष ट्रेक नेतात. वैशाली देसाईच्या ‘कल्पविहार अडव्हेंचर’ या संस्थेने २००८ पासून महिला विशेष ट्रेकला सुरूवात केली़ दरवर्षी महिला दिनाच्या मागच्या किंवा पुढच्या रविवारी हा ट्रेक आयोजित करण्यात येतो़ आतापर्यंत शिवनेरी, अलिबाग, कोरलई, सिंहगड, लोहगड आदी ठिकाणी हा ट्रेक आयोजित करण्यात आला आह़े ना नफा ना तोटा तत्त्वावर आयोजित करण्यात येणाऱ्या या ट्रेकला दरवर्षीच उदंड प्रतिसाद मिळतो़
खरतरं हा ट्रेक म्हणण्यापेक्षा रोजच्या व्यापात असणाऱ्या महिलांसाठी हे एक मोकळं होण्याचं व्यासपीठ असतं़ इथे महिलांना त्यांच्या मनातील सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी मोकळेपणाने करता येतात़ खरंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महिला दिन असतो आणि हाच काळ परीक्षांचाही असतो़ त्यामुळे आणखीही बऱ्याच जणींना इच्छा असूनही येता येत नाही, असं वैशाली सांगत़े त्यातून आम्ही दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही या ट्रेकमध्ये आईसोबत येऊ देतो़ त्यातून बाळाला कुठे ठेवायचं किंवा मुलं एकटी राहात नाहीत, ही गैरसोय तरी टाळता येत़े या वर्षीसुद्धा आम्ही औरंगाबादला जात आहोत, असंही वैशालीने सांगितलं.
– संकेत सातोप़े