08 August 2020

News Flash

‘ई’ संधी

इझी लाइफ हे आमचं स्टार्टअप आहे. मी केवळ ३० प्रॉडक्ट्पासून सुरुवात केली. आता आम्ही तीन हजारांहून जास्त प्रॉडक्ट्सची ऑनलाइन विक्री करतोय. ई कॉमर्समधली वाढ उत्साहवर्धक

| July 17, 2015 08:54 am

इझी लाइफ हे आमचं स्टार्टअप आहे. मी केवळ ३० प्रॉडक्ट्पासून सुरुवात केली. आता आम्ही तीन हजारांहून जास्त प्रॉडक्ट्सची ऑनलाइन विक्री करतोय. ई कॉमर्समधली वाढ उत्साहवर्धक आहे.

स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक संख्या दिसतेय ई कॉमर्सशी संबंधित कंपन्यांची. तरुणाई या नव्या ई प्लॅटफॉर्मचा संधी म्हणून उपयोग करत नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातलीच काही उदाहरणं..

इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगाशी तर जोडले गेलोच, पण त्यामुळे ऑनलाइन बाजारपेठ आपल्याला खुली झाली आहे. ई कॉमर्सच्या साध्या, सुटसुटीत स्वरूपाने छोटेखानी व्यवसाय सगळ्यांपर्यंत पोहोचू लागलेच, पण त्यासोबत एक नवीन करिअरची वाट तरुणांना दाखवून दिलीये. चाकोरीबद्ध नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यास प्राधान्य देणारी तरुण मंडळी ई कॉमर्सचा मार्ग अवलंबताना दिसतात. वेगवेगळ्या आघाडय़ांवर काम करण्याची संधी या ई- कॉमर्समुळे मिळते.

वेगवेगळ्या आघाडय़ांवर काम करण्याची संधी या ई- कॉमर्समुळे मिळते. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करताही आपला व्यवसाय सुरू करता येतो, अगदी घरातूनही काम सुरू होऊ शकतं.  वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइट्स उपलब्ध असल्याने विक्रीसाठी एक भलीमोठी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध असते. थेट तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं आणि फीडबॅकही त्वरित मिळतो.

म्हणूनच व्यवसायिकांची तरुण पिढी ई कॉमर्सकडे ओढली गेली आहे. ई कॉमर्समध्ये असणाऱ्या ‘इझी लाइफ’ या गृहोपयोगी वस्तू ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीची अंकिता शह सोनावाला म्हणाली, ‘‘मी परदेशात असताना मला असं जाणवलं की, तिथे लोकांना बाहेर जाऊन खरेदीसाठी वेळच नाहीये. तिथे लोक ऑनलाइन खरेदी करतात. आपल्याकडेही हा ट्रेण्ड रुळतोय. यातली संधी मी ओळखली. ई कॉमर्सच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता येतं. त्यामुळे मी माझे प्रॉडक्ट्स ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून विक्रीस ठेवले. सुरुवातीला आमच्याकडे केवळ ३० प्रोडक्ट्स होती. पण आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि ग्राहकांच्या मागणीमुळे आता आम्ही तीन हजारांहून जास्त प्रॉडक्ट्सची ऑनलाइन विक्री करतोय.’

रोहना शाह हिने तिच्या वडिलांचा पुस्तकांचा जुना व्यवसाय आता ऑनलाइन नेला आहे. विल्को क्लासिक लायब्ररी या पब्लिकेशन्सची वेगवेगळी पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन’वर ऑनलाइन उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपल्याला हवं ते पुस्तक शोधणं सोप्पं होतं. ‘‘ई कॉमर्समुळे वेळ वाचतो. आम्ही कमी किमतीत चांगली पुस्तक देण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाइन पुस्तक खरेदीकडे लोकांचा ओढा आहे असं लक्षात येतंय,’’ असं रोहना म्हणाली.

– अंकिता शहा सोनावाला

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2015 8:54 am

Web Title: working for startup 4
टॅग Job,Startup
Next Stories
1 शब्दसखा : गॅराज
2 सोशल न्यूज डायजेस्ट : स्टार वॉर
3 ‘मल्हार’ची दोरी मुलींच्या हाती
Just Now!
X