vn10सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकू या या  व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..

परिणीती चोप्रा
परिणीतीचा रेड कार्पेट लुक कित्येकदा गोंधळात टाकणारा असतो. इथेही असंच काहीसं झालं आहे. तिच्या गाऊनच्या ट्रेलमुळे कुठेतरी लुकबद्दल गोंधळ झालाय. पण क्लीन न्यूड मेकअप आणि पोनीटेल अशा स्टायलिंगने तिचा लुक सावरला आहे.

श्रद्धा कपूर
श्रद्धा नेहमीच सिम्पल लुकला पसंती देते. तिच्या गाऊन्समध्येही कधीही भडकपणा जाणवत नाही. इथेही तिने तेच केलंय. स्ट्रॅपलेस सिम्पल गाऊनमुळे तिने बाजी मारली आहे. हाय स्लिट ही तिच्या गाऊनची जमेची बाजू आहे. मेकअपच्या बाबतीत मात्र तिने थोडा बोल्डनेस दाखवायला हवा होता. सिम्पल मेकअपऐवजी आय मेकअपवर भर दिला असता, तर ते चालू शकलं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.