सुटी म्हणजे रुटिनपासून सुटी.. शाळा कॉलेजच्या दिवसातली हक्काची सुटी संपली आणि नोकरीच्या घाण्याला बांधलो गेलो की, मग एकेक ‘हॅपी रिअलायझेशन’ होतं- कॉलेजच्या सुटीचा वेळ यासाठी दिला असता तर.. पण तेव्हा असे ‘छुट्टी के दिन’ पुन्हा येत नाहीत. सो या सुटीत थोडं क्रिएटिव्हली रिलॅक्स व्हायला हवं.
हुश्श! र्हु!! संपली एकदाची परीक्षा..हलकं डोकं नि दोन महिने मज्जा -मस्ती-धमाल. आता ट्रिपला जाणं, लोळत घरी बसणं, टरबूज खात टॉम अ‍ॅण्ड जेरीपासून काहीही बघत बसणं वा तासन्तास झोपा काढणं.. अहाहा ..सुख नुसतं! सुट्टीचे पंधरा-वीस दिवस सरले की, या सुखाची मज्जा पण सरते आणि बोअर व्हायला लागतं. या उरलेल्या भल्या मोठय़ा सुट्टीचं करायचं तरी काय, असा यक्षप्रश्न आपल्या काही फ्रेण्ड्सना पडतो. त्याचीच उत्तरं आपण शोधूया.
असा थोडा जरी आपण विचार केला तर , गेल्या काही वर्षांतल्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा थोडय़ा फार प्रमाणात सारख्याच होत्या. दोन-चार गावं फिरायची, घरात लोळायचं, कसल्या तरी एखाद्या कॅम्पला जाऊन यायचं याव्यतिरिक्त आपले बहुतांश फ्रेण्ड्सफारसं काही अजून करत नाहीत. काही वर्षांनी जेव्हा ही शाळा कॉलेजची हक्काच्या सुट्टीची र्वष सरतात तेव्हा लक्षात येतं की, गेली कित्येक र्वष आपण अशीच सुट्टी वाया घालवली. आत्ता नोकरीच्या घाण्याला बांधलेल्यांना विचारा..  सुट्टय़ांमध्ये खूप काही शिकायचं राहून गेलेलं असतं. यार.. सुट्टीतला वेळ देता आला असता या गोष्टीला, असं जेव्हा हे ‘हॅप्पी रियलायझेशन’ होतं तेव्हा दुसऱ्या प्रायोरिटीज येऊन ठेपतात. म्हणून या सुट्टीत जरा क्रिएटिव्ह धडपड करून, सुट्टी एन्जॉय करूया! आपण कधी असा विचार केलाय का दोस्तांनो, आपल्याला सुट्टय़ा का असतात? कारण आपल्या मेंदूला एका ब्रेकची गरज असते, म्हणजे तो ताजातवाना होऊन पुन्हा कामाला लागलेला. सायकॉलॉजिस्टच्या मते, क्रिएटिव्ह गोष्टी मेंदूला एक वेगळं रिलॅक्सेशन देतात, शेवटी कुणी तरी म्हटलंच आहे की, ‘ब्रेक इज चेंज इन वर्क.’ म्हणून आयुष्यातलं रिफ्रेश बटन दाबूया आणि नवीन काही तरी शिकूया!
मागच्या उन्हाळ्याचा सुट्टीपर्यंत एका मैत्रिणीला अजिबात स्वयंपाक यायचा नाही. मागच्या सुट्टीत ती जिद्दीनं अगदी नेमानं आई स्वयंपाक करताना बाजूला उभी राहिली. अगदी कुकर लावताना तांदळात किती पाणी घालावं, इथपासूनचे बारकावे शिकताना स्वयंपाक करायला कधी आवडायला लागलं ते तिचं तिलाच कळलं नाही. सुट्टी संपता संपता तिनं सगळ्यांसाठी नाश्त्याला उपमा बनवला, तेव्हा त्या फक्कड जमलेल्या उपम्यापेक्षा काही तरी नवं शिकल्याचा आनंद जास्त होता. सो फ्रेण्ड्स सुट्टीत जरा किचनमध्ये लुडबुड करून ‘एक्सपेरिमेंटल डिश’ बनवायला काही हरकत नाही. ‘सोशॉलॉजी’ शिकणारा सौमील दर सुट्टीत ‘कुछ नया’च्या शोधात असायचा. गेली दोन र्वष झाली तो एका एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थेमध्ये ‘समर इंटर्नशिप’ करतो. अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या त्या ‘एनजीओ’मध्ये सुट्टीतले रोजचे दोन तास देतो. अगदी अकाऊन्ट्समध्ये काही मदतीपासून ते मुलांना गोष्टी सांगण्यापर्यंतचं कुठलंच काम त्याला वज्र्य नाही. या वर्षी त्यानं त्याचा दोन वर्षांमधला समर इंटर्नशिपचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला.
तो म्हणाला, ‘मी पुस्तकांमध्ये शिकत असलेली सोशॉलॉजीची थिअरी मला इथे अप्लाय करायला मिळते आणि सुट्टय़ांमध्येच मी इथे येत असल्याने मी जास्त खोलवर आणि लक्ष देऊन निरीक्षण करतो. अभ्यासाला प्रॅक्टिकल टच देण्याचा हा माझा प्रयत्न असतो.’ त्याच्या या प्रयत्नातून तो जणू अभासच करत आहे समाजाचा.
केक्स आणि कुकीज तयार करण्याची मानसीला फार आवड. वेगवेगळ्या प्रकारचे केक ती अगदी आवडीने, तिच्या दोस्तमंडळींसाठी न्यायची. तिला तिच्या एका मत्रिणीनं बर्थडे केकची ऑर्डर दिली. मानसीनं बनवलेला हटके केक सगळ्यांना इतका आवडला की, तिला प्रोफेशनल ऑर्डर मिळायला लागल्या. मग तिनं ‘ट्रिक्स अ‍ॅण्ड ट्रीट्स’ नावाचं घरातच छोटंसं दुकान थाटलं. तिचा अभ्यास सांभाळत ती काही ऑर्डर्स घेतेच पण सुट्टीत मात्र तिचं हे काम जोरात चालतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या एक्सपरिमेंट्स आणि बहारदार प्रेझेंटेशनमुळे मानसीची आवड अनेक खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतेय. सुट्टीत म्हणून ती आता एका मॉलमध्ये तिच्या कपकेक्सचा स्टॉल लावणार आहे.
खरं तर, सुट्टी म्हणजे ‘सुट्टी असावी ती रुटिनमधून.’ कारण सुट्टी हा एक गोल्डन चान्स असतो, काही तरी नवीन आजमावून पाहण्याचा, एका तऱ्हेने ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चा, आपले छंद जोपासण्याचा..आपल्याला जे आवडतं ते करून पाहण्याचा! कुणास ठाऊक कदाचित सुट्टीतल्या या खटपटीतून कुणाला करियरचा मार्ग मिळेल. सो.. भटके फ्रेण्ड्स, छान ट्रेकिंगला जा, आणि निसर्ग काय म्हणतंय ते ऐका.. एखादं निष्पर्ण झाडसुद्धा तुम्हाला फोटोसाठी ‘पोझ’ देत असेल.. क्रिएटिव्ह फ्रेण्ड्स, डान्स करायला आवडत असेल तर एखाद्या डान्स वर्कशॉपला जा. पेंटिंग-ड्रॉइंग करा. काही तरी नवीन लिहा. खूप काही नवीन वाचा. वर्कोहोलिक फ्रेण्ड्स, एखाद्या एनजीओमध्ये जाऊन त्यांचं काम बघा. एखाद्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करून बघा. गोष्टींकडे पाहण्याचा अधिक ‘प्रॅक्टिकल व्हय़ू’ डेव्हलप होईल. क्यूं की छुट्टी के ये दिन वापस नही आयेंगे, सो फ्रेण्ड्स बी क्रिएटिव्हली रिलॅक्स! हॅप्पी हॉलिडेज!!!!!    
वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या एक्सपरिमेंट्स आणि बहारदार प्रेझेंटेशनमुळे मानसीची आवड अनेक खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतेय. सुट्टीत म्हणून ती आता एका मॉलमध्ये तिच्या कपकेक्सचा स्टॉल लावणार आहे.
खरं तर, सुट्टी म्हणजे ‘सुट्टी असावी ती रुटिनमधून.’ कारण सुट्टी हा एक गोल्डन चान्स असतो, काही तरी नवीन आजमावून पाहण्याचा, एका तऱ्हेने ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चा, आपले छंद जोपासण्याचा..आपल्याला जे आवडतं ते करून पाहण्याचा! कुणास ठाऊक कदाचित सुट्टीतल्या या खटपटीतून कुणाला करियरचा मार्ग मिळेल. सो.. भटके फ्रेण्ड्स, छान ट्रेकिंगला जा, आणि निसर्ग काय म्हणतंय ते ऐका.. एखादं निष्पर्ण झाडसुद्धा तुम्हाला फोटोसाठी ‘पोझ’ देत असेल.. क्रिएटिव्ह फ्रेण्ड्स, डान्स करायला आवडत असेल तर एखाद्या डान्स वर्कशॉपला जा. पेंटिंग-ड्रॉइंग करा. काही तरी नवीन लिहा. खूप काही नवीन वाचा. वर्कोहोलिक फ्रेण्ड्स, एखाद्या एनजीओमध्ये जाऊन त्यांचं काम बघा. एखाद्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करून बघा. गोष्टींकडे पाहण्याचा अधिक ‘प्रॅक्टिकल व्हय़ू’ डेव्हलप होईल. क्यूं की छुट्टी के ये दिन वापस नही आयेंगे, सो फ्रेण्ड्स बी क्रिएटिव्हली रिलॅक्स! हॅप्पी हॉलिडेज!!!!!    
मानसीचे कॅण्डी क्रश कपकेक
सुटीतल्या उद्योगातून आवड म्हणून केक बनवता बनवता मानसीनं ‘ट्रिक्स अँड ट्रीट्स’ नावाचं एक दुकान घरातच थाटलं. फ्लेवर्सचे एक्सपरिमेंट्स आणि बहारदार प्रेझेंटेशनमुळं मानसीचे केक हिट आहेत. आता सुट्टीत मॉलमध्ये स्टॉल टाकण्याचाही तिचा विचार आहे.