सवलतींचा पाऊस

साधारणपणे क्लोदिंगवर ७० ते ८० टक्के सूट ऑनलाइन साइट्सवर पाहायला मिळेल.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

दैनंदिन जीवनातही सतत डिस्काऊंट आणि सूटच्या बाबतीत जागरूक असलेले आपण अधिकृतरीत्या ऑनलाइन साइट्सवर जरा कुठे डील्स आणि डिस्काऊंट्सना सुरुवात झाली रे झाली की त्यावर तुटून पडतोच. सध्या कपडे खरेदी व इतरही खरेदीसाठीचे पर्याय मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ई-बाजारात सहभागी झालेल्या कित्येक लेबल्स आणि ब्रॅण्ड्सनी यंदा डोकं वर काढलं आहे. एरव्हीही पावसाळ्यात बरसणाऱ्या सरींबरोबर सगळीकडे डिस्काऊंट्स किंवा सेलचा पाऊसही सुरू होतो..

सोशल मीडियावर सतत तीन-चार तासांनी एखाद्या ऑनलाइन साइट्सवर असलेल्या डिस्काऊंट्सच्या जाहिराती दिसत आहेत. विशेषत: यूटय़ूब, अ‍ॅप्सवर विविध ऑनलाइन स्टोअरकडून मिळणाऱ्या डिस्काऊंट्सच्या जाहिराती अनेकदा दिसून आल्या आहेत. यंदा सीझनच्या सुरुवातीलाच डिस्काऊंट्स आणि सेल्सचा बोलबाला आहे. यामध्ये प्रामुख्याने क्लोदिंग, अ‍ॅक्सेसरीज आणि अनेक स्टायलिश गोष्टींचा समावेश आहे आणि त्यातून महत्त्वाचे म्हणजे मोठय़ा संख्येने नावाजलेल्या ब्रॅण्ड्स, ऑनलाइन साइट्स आणि स्टोअरचाही यात डिस्काऊंट्सच्या पावसात सहभाग आहे.

या वर्षी डिस्काऊंट आणि सेलचा पूरच आला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण वुमन्सवेअर आणि मेन्सवेअरमध्ये बरेच पर्याय या वेळी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत ज्यावर ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त सूट देण्यात आली आहे. ‘फ्लिपकार्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘शॉपर्स टॉप’, ‘मिन्त्रा’, ‘टाटा क्लिक’, ‘कूव्ह्स’, ‘जबॉन्ग’, ‘अजियो.कॉम’, ‘स्टॉकबायलव्ह’, ‘मॅक्स फॅ शन’, ‘एफबीबी’ आणि ‘पॅन्टॅलून्स’ अशा अनेक शॉपिंग साइट्सवरून नानाविध ऑफर्स, डील्स, डिस्काऊंट्स मिळतील. मेन्सवेअरमध्ये वॉचेस, फूटवेअर, बॅकपॅक, सनग्लासेस आणि स्पोर्ट्सवेअरवरदेखील जास्त भर दिला गेला आहे, तर वुमन्सवेअरमध्ये हॅण्डबॅग्स, सनग्लासेस, फूटवेअर, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज आहेत. यंदाच्या या सेलदरम्यान फेस्टिव शॉपिंगसाठीचे जास्त पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अशा दोन महत्त्वाच्या साइट्सकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेस्टिवल खरेदीचाही पर्याय ठेवण्यात आला आहे आणि त्यावर विविध ऑफर्स दिल्या गेल्या आहेत.

साधारणपणे क्लोदिंगवर ७० ते ८० टक्के सूट ऑनलाइन साइट्सवर पाहायला मिळेल. समर कलेक्शनमध्येही ४० ते ६० टक्के सूट देण्यात आली आहे, परंतु काही प्रमाणात आता डिस्काऊंट्स रेट २४-२६ टक्क्यांवरती घसरले आहे ज्यात समर कलेक्शनचाच भरणा आहे. ‘बाय वन गेट वन फ्री’च्या ऑफर्सही बऱ्याच ऑनलाइन स्टोअर्सनी ठेवल्या आहेत. प्लस साइज फॅ शनवरही या वेळी चक्क ८० टक्के सूट देण्यात आली आहे. प्लस साइज स्टोअरतर्फे  वुमन्सवेअर व मेन्सवेअरमध्ये ४० टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली गेली आहे. ‘अमायडस.कॉम’ या साइटवरदेखील हव्या त्या किमतीत प्लस साइड फॅ शन उपलब्ध आहे. फेस्टिव शॉपिंगमध्ये गोल्डन ज्वेलरी, एथनिक वेअर, कांजिवरम व सिल्कच्या साडय़ा, कुर्ती याहून वेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे इथे शॉपिंगसाठी जास्तच उडय़ा पडणार आहेत.

डिस्काऊंटवर असलेल्या पर्यायांमध्ये रूटिन फॅशनपासून ते अगदी फेस्टिव वेअपर्यंत विविधता आहे. विशेष म्हणजे कॉकटेल आणि पार्टी वेअर, ऑफिस वेअर व कॅज्युअल वेअरमध्ये बऱ्यापैकी डिस्काऊंट आहे. त्यामुळे याची खरेदी करण्यावर जास्त भर आहे. कॅज्युअल वेअरमध्ये ४३ टक्के आणि त्यावरही सूट आहे. जीन्स, टी शर्ट आणि टय़ूनिक्सशिवाय कॅ ज्युअल, आरामदायी त्याचबरोबर समर सीझनला सूट होईल असं कलेक्शन कूव्ह्सवर विविध पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डेनिम ड्रेस, शर्ट ड्रेस, टी-शर्ट ड्रेस, शिफ्ट ड्रेस आणि मिडी ड्रेस असे नवे समर कलेक्शनचे पर्यायही पावसाळी फॅ शन म्हणूनसहज स्वीकारण्यासारखे आहेत. पार्टीवेअरमध्येदेखील बॉडी कॉन ड्रेस ट्रेण्डमध्ये आहेत ज्यावर ५० टक्के सूट आहे. या बॉडी कॉन ड्रेसमध्ये शिमर, स्ट्राइप, स्टडेड, मिलिटरी पॅटर्न्‍स उपलब्ध आहेत. ऑफिस वेअरसाठीदेखील टेप शर्ट, चेक्स शर्ट, रफल्ड पेन्सिल वनपीस असे काही आऊटफिट्स उपलब्ध आहेत.

वुमन्स वेअरमध्ये जम्पसूट, बॉडीसूट, स्केटर स्कर्ट, बॅन्डो ड्रेस, ट्राऊझर्स आहेत, तर मेन्सवेअरमध्ये ओव्हरसाइज्ड शर्ट्स, पोलो शर्ट्स, प्रिन्टेड शर्ट्स आहेत. याशिवाय टायपोग्राफी, आझटेक, फ्लोरल आणि प्रिंटेड टी-शर्टही वूमन्स वेअरमध्ये आहेत. शॉर्ट्स, कूलोट्स, लाऊं ज पॅन्ट्स, प्रिंटेड पॅन्ट्स, केप्रीज, पजामा, रफल शॉर्ट्स असेही पर्याय यात पाहायला मिळतील. मुलांसाठी स्ट्राइप पोलो टी-शर्ट, मोनोक्रोम शर्ट्स, इंडिगो शर्ट्स आणि कॉटन शर्ट्सही आहेत. सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘ली कुपर’ या मोठय़ा ब्रॅण्डने इंडिगो आणि डाय केलेले कॉटन शर्ट आणले आहेत. साध्या आणि सिंपल टी-शर्ट्सवरसुद्धा १५ टक्के सूट असून त्यात विविध रंग आणि पॅटर्न्‍स आहेत. पॅन्टालून्सवरही सध्या ४० टक्के सूट असून त्यातून कपडय़ांची क्वॉलिटी आणि क्वाँटिटी दोन्हीचे गणित उत्तम साधले आहे.

पॅन्टालून्सचा ‘ग्रेट फॅ शनसेल’ आणि अ‍ॅमेझोनचा ‘ग्रेट इंडियन सेल’ हे दोन सेल सध्या अतिशय चर्चेत आहेत, कारण यामध्ये एथनिक आणि फेस्टिव कलेक्शन मोठय़ा प्रमाणावर आहे. ज्यात सिल्क, कॉटन आणि चंदेरी असे कलेक्शन आहे. अ‍ॅमेझॉनवर साधारणपणे ‘अनस्टिच’ कलेक्शनही उपलब्ध झाले आहे ज्यात सलवार कमीज, कुर्ती, एम्ब्रॉयडरी असलेले पलाझो, अनारकली गाऊन असे अनेक प्रकार आहेत.

डिस्काऊंटसह विविध स्कीम्स, डील्स, प्राइझेस, सूट आहेतच. त्यामुळे फॅ शन आणि लाइफस्टाइलच्या सगळ्याच गोष्टी सध्या योग्य आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. फॅ शनच्या बाबतीत तर संपूर्णत: प्रत्येकाची वैयक्तिक आवड जाणून घेऊन मोठय़ा संख्येने नावाजलेल्या ब्रॅण्ड्सनी वैविध्यपूर्ण पर्याय आणले आहेत. त्यामुळे थोडा फॅ शनचा विचार केला तर या स्वस्त खरेदीचा चांगलाच लाभ उठवत सर्वोत्तम कस्टमाइज्ड कलेक्शन वॉर्डरोबमध्ये आणता येईल.या सवलतींच्या पावसात चिंब भिजण्यासाठी लवकरच खरेदीला सुरुवात करणं म्हणजे योग्य व्यवहार ठरेल असं म्हणायला हरकत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discount deals online sites sell brand abn

ताज्या बातम्या