पिंपलला म्हणा बाय-बाय
ही पद्धत पारंपरिक आहे. गरम पाण्यात चमचा बुडवून त्याचा फुगीर भाग पिंपलवर चमचा थंड होईपर्यंत धरून ठेवा. चांगला परिणाम दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्बल नेलपेंट इफेक्ट
  दोन वेगवेगळ्या रंगांच्या नेलपॉलिशचे थेंब चमच्यात घेऊन हेअर पिनच्या साहाय्याने गोलाकार फिरवा (एकजीव करू नये) नख मिश्रणात बुडवून वाळू द्या. टिकण्यासाठी त्यावर ओव्हरकोट लावा. घरबसल्या नेलआर्ट डन!

परफेक्ट डो आय लाइनरसाठी
चमच्याची पकडीची बाजू डोळ्यांच्या बाहेरील भागावर ठेवून एक सरळ रेषा आखून घ्या. नंतर पुढील भागाने डोळा झाकून घेऊन त्या गोलाकार भागाच्या साहाय्याने डो आय शेप काढा. ती आकृती लाइनरने भरून टाका आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण डोळ्याला बारीकसे लाइनर लावा. तुमचा प्रोफेनल विंग्ड लाइनर लुक तयार!

मस्कारा लावताना..
मस्कारा लावताना अनेकदा केलेला मेकअप खराब होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी खालच्या बाजूस मस्कारा लावताना चमच्याचा फुगीर भाग पकडा, जेणेकरून अतिरिक्त मस्कारा चमच्यावर पडेल.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy makeup tips
First published on: 28-11-2014 at 01:09 IST