दिवाळी आणि खरेदी यांचं अगदी घट्ट नातं आहे. एकमेकांना सणानिमित्त भेटवस्तू देण्याची परंपराही जुनीच पण आता या गिफ्ट चकाचक पॅकिगमध्ये देण्यात येतात इतकंच. अनेक मॉल्समध्ये गिफ्टिंग आर्टिकल्सचे स्टॉल्स लागले आहेत. व्यापारी पेठा किंवा प्रदर्शनांमधून अनेक गिफ्ट आयटेम्स दिसताहेत. या सगळ्या वस्तू बनविण्यासाठी अनेक हात राबत असतात. असेच काही हात कलाकुसरीच्या वस्तू ‘हेड टू हार्ट’ या गटाच्या माध्यमातून विविध आकर्षक वस्तू बनवत आहेत.
गरजू महिलांनी स्वतच्या हातांनी बनवलेल्या वस्तूंना मार्केटही प्राप्त होतं, शिवाय अशा महिलांना त्याद्वारा रोजगारही उपलब्ध होत आहे. हा गट खास दिवाळीच्या निमित्ताने २६ ते ३० ऑक्टोबर रोजी गिरगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत सहभागी होणार आहे. हँडमेड पेपर तसेच वेताने तयार केलेले आकाशकंदील, आकर्षक पणत्या, रेडीमेड रांगोळ्या, जूट पस्रेस, फ्लोटिंग दिवे, चॉकलेट्स अशा विविध वस्तू या हेड टू हार्ट प्रदर्शनात उपलब्ध होतील, अशी माहिती या प्रकल्पाच्या संचालिका डॉ.शिवांगी पुरंदरे यांनी सांगितली.
दिवाळीत पर्यावरणपूरक दिव्यांची निर्मिती करणाऱ्यांना व्यासपीठ देणारी आणखी एक संस्था कार्यरत आहे – निर्मिती आर्ट्स. निमिर्ती आर्टचा दीपोत्सव २०१३ निर्मिती कलादालनात (पोतुíगज चर्चजवळ, आगारबाजार, दादर) सुरू झाला असून तो ३ नोव्हेंबपर्यंत खुला राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2013 रोजी प्रकाशित
आर्ट फेस्ट
दिवाळी आणि खरेदी यांचं अगदी घट्ट नातं आहे. एकमेकांना सणानिमित्त भेटवस्तू देण्याची परंपराही जुनीच पण आता या गिफ्ट चकाचक पॅकिगमध्ये देण्यात येतात इतकंच.

First published on: 25-10-2013 at 05:28 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival of art