फेस्टिव्ह मेकअप

सध्याच्या काळात मेकअपला पर्याय नाही हे मान्य. पण काही वर्षांपूर्वीच्या ट्रेंडच्या तुलनेत सध्या सगळ्याच तरुणींचा कल ‘सिंपल लूक’कडे जातो. लाऊड मेकअपला तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही.

सध्याच्या काळात मेकअपला पर्याय नाही हे मान्य.  पण काही वर्षांपूर्वीच्या ट्रेंडच्या तुलनेत सध्या सगळ्याच तरुणींचा कल ‘सिंपल लूक’कडे जातो. लाऊड मेकअपला तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही. तरीही फेस्टिवल सीझन असल्या कारणानं ‘सिंपल तरीही फंकी’ असाही ट्रेंड दिसून येतोय. ब्युटी एक्स्पर्टशी बोलून घेतलेला आढावा..
ऑक्टोबर-नोव्हेंबर हे महिने म्हणजे फेस्टिव्हल फीवर. नवरात्री, लग्न-समारंभ यांचा हा काळ. त्यामुळेच या काळात तरुणींना सतावणारा आणि कॉन्शिअस करणारा घटक म्हणजे त्यांचा ‘लूक’ आणि त्यावर अवलंबून असणारं त्याचं ड्रेसिंग, त्यांचा मेकअप, त्यांच्या अॅक्सेसरीज्.. फेस्टिव्ह काळातील मेकअप कसा असावा यासाठी व्हिवा टीमने ओरिफ्लेमच्या ब्युटी आणि मेकअप एक्स्पर्ट आकृती कोचर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या काही टिप्स..
फेस्टिव्हल सीझन
फेस्टिव्हल सीझनमध्ये मेकअपसाठी १६ ते २५ या वयोगटातल्या तरुणी शिमर किंवा फ्रॉस्टी लिपस्टिक ट्राय करू शकतात. त्याने चेहऱ्याला एक ग्लोइंग लूक मिळतो, जो फेस्टिव्हल मूडला साजेसा असतो. या सीझनमध्ये लाऊड मेकअप टाळायचा असेल तर शिमर बेस्ड आयशॅडोज्देखील वापरता येऊ शकतात. शिवाय लायनर, मस्कारा आणि काजळ यांशिवाय मेकअप अपूर्णच असतो. या फेस्टिव्हल सीझनच्या चाìमग वातावरणामुळेच मेकअपसाठी ब्राइट कलर्स वापरणं सोयीचं ठरतं; त्यामुळे मॅट स्कीनचा लूक टाळता येतो, पण सध्या हिवाळादेखील तोंडावर आला असल्याने फ्रेश डूई स्किन जास्त पॉप्युलर ठरतेय. त्यासाठी चेहऱ्याला न्यूट्रल इफेक्ट देण्यासाठी तुम्ही एक तर डोळ्यांवर ब्राइट कलर्स वापरू शकता किंवा ओठांवर ब्राइट कलरची लिपस्टिक ट्राय करू शकता. फेस्टिव्हल सीझन आणि स्पेशली विंटर सीझनसाठी मजेंटा, ब्राइट पिंक असे कलर्स जास्त उठून दिसतात. या कलर्समुळे एक फ्रेश लूकही मिळतो आणि लाऊड मेकअपसुद्धा टाळला जातो, पण एकाच वेळी दोन्ही करणं टाळावं. ज्यामुळे मेकअप लाऊड होऊन तुमच्या फ्रेश डूई स्किनचा इफेक्ट जाऊ शकतो. आऊटफिट्समध्येही तुम्ही गोल्डन, ब्राँझ अशा कलर्सने प्राधान्य देऊ शकता.
लग्नसमारंभासाठी मेकअप
नवरात्र आणि दिवाळीपाठोपाठ आता लग्नसराईचा हंगाम सुरू होईल. लग्न म्हणजे फक्तनवरीनंच नटणं, हा ट्रेंड कधीचाच बदललाय. लग्नात प्रत्येकालाच आपल्या ‘लूक’बद्दलची काळजी असतेच. कुठल्याही मोठय़ा कार्यक्रमाला, तुमची स्किन उजळ दिसणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यासाठीच चांगले प्रॉडक्ट्स वापरून स्वत:च्या स्किनची आधीच काळजी घेणं कधीही उत्तमच. रापलेली, काळवंडलेली त्वचा सगळा लूक वाया घालवते हे लक्षात ठेवलं पाहिजे. वेडिंग सेरेमनीज्मध्ये तुम्ही उठावदार दिसण्याकरिता कलर्ड आयलायनर आणि आयशॅडोज्चं कॉम्बिनेशन करू शकता. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या स्कीन टोनबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. जर तुमचा स्किन टोन वॉर्म असेल, तर त्यासाठी वॉर्म कलर्सचे आऊटफिट्स आणि त्यालाच साजेसे आयशॅडोज् आणि आयलायनर वापरू शकता. जर तुमचा स्किन टोन डार्क असेल, तर तुम्ही डीप कलर शेड्सचा वापर करू शकता. फाऊंडेशनचाही वापर कमी-जास्त प्रमाणात गरजेनुसार करावा. नवरीने स्पेशली उठून दिसण्याकरिता जास्तीत जास्त ब्राइट कलर्स वापरावेत. मॅजेंटा, रेड, ऑरेंज असे कलर्स लग्नाच्या मंडपात जास्त खुलून दिसतात. त्याचबरोबर मेकअप करताना डोळ्यांवर ग्लिटर लावल्यास ब्राइडला एक वेगळाच लूक मिळतो.

स्पेशल टिप्स
*  कॉलेज गर्ल्सनी शक्यतो हेवी मेकअप टाळावा.
*  १६ ते २५ या वयात मुलींची स्किन जास्त ग्लोइंग असल्याकारणाने सॉफ्ट मेकअप पुरेसा असतो.
*  फेस्टिव्हल सीझनसाठी कलर्ड आयलायनर, ग्लिटर आणि कलर्ड आयशॅडोज् स्किन टोनप्रमाणे वापरावेत.
*  फेस्टिव्हल आणि विंटर सीझनसाठी न्यूट्रल इफेक्ट देणारा मेकअप करावा.
*  शिमर बेस्ड आयशॅडोजचा वापर जास्त उठावदार असतो, त्यामुळे त्याचा आणि फ्रॉस्टी लिपस्टिकचा वापर करून तुम्ही अधिक देखण्या आणि उठावदार दिसू शकाल.
*  झटपट मेकअपसाठीदेखील लायनर, मस्कारा आणि काजळ यांचा योग्य प्रमाणात वापर पुरेसा ठरतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Festive makeup

ताज्या बातम्या