गेल्या आठवडय़ात आपण फॉर्मल सीटआउट्समधील सीटिंग अरेंजमेंट कशी असते ते पाहिलं. बँक्वेट हॉलमध्ये टेबल पाहून सर्व जण बसल्यानंतर समारंभाला सुरुवात होते. हॉलच्या मध्यभागी प्रमुख पाहुण्यांचं आणि यजमानांचं टेबल असतं. सर्व पाहुणे व्यवस्थित स्थानापन्न आहेत की नाही हे बघितल्यानंतर यजमान समारंभाला सुरुवात करतात.

समारंभाच्या स्वरूपावर पुढच्या घडामोडी वळण घेतात. बहुधा यजमान पाहुण्यांचं स्वागत भाषण देऊन करतात. पाश्चात्त्य पद्धतीत ‘टोस्ट’पण करतात. ‘रेझिंग अ टोस्ट’ म्हणजे पेयाचे प्याले उंचावून आपल्या पाहुण्यांचं (किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचं) हित चिंतणे/ आभार मानणे. अशा वेळी त्या विशिष्ट व्यक्तीने बसले राहावे. इतरांनी उभं राहून, यजमानांचं भाषण झालं की, थोडं पेय प्यायचं असतं. संपूर्ण ग्लास रिकामा करायचा नसतो! टोस्ट झाल्यानंतर त्या विशिष्ट व्यक्तीने उभं राहून आपलं आभार प्रदर्शन करावं. पहिला टोस्ट प्रोपोझ करायचा मान यजमानांचा असतो. त्यानंतर इतर व्यक्ती करू शकतात. काही औपचारिक समारंभांत राष्ट्रगीतंही होतात – आपलं आणि परदेशी पाहुण्यांचही! अशा वेळेला दोन्ही राष्ट्रगीतांसाठी उभं राहणं आवश्यक आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

यजमान परत स्थानापन्न झाले की, इतर पाहुण्यांनीपण बसून घ्यावं. त्यांनी जेवण सुरू करायचा संकेत दिला की मगच सíव्हस सुरू होते. जेवण पूर्ण होईपर्यंत काही गोष्टी पाळाव्या लागतात.

चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. फॉर्मल सीटडाउन प्रकारचा भोजन समारंभात वागायचे काही शिष्टाचार असतात.

  • पुरुषांनी आपल्या शेजारी बसणाऱ्या महिलेला बसावयास मदत करावी. तिच्यासाठी खुर्ची बाहेर काढून ती बसत असताना, खुर्ची अलगद आत करावी.
  • यजमानांनी आपली कटलरी उचलल्यावरच (हा एक प्रकारचा संकेत असतो) इतरांनी जेवणाला सुरुवात करावी.
  • जेवणाची सíव्हस सुरू झाल्यानंतर टेबल सोडून जाऊ नये. ‘नेचर्स कॉल’ आधीच आटपून यावा.
  • आपल्याला मेन्यूमधले काही आवडत नसेल, तरी दुसऱ्या पदार्थाचा हट्ट करू नये. अगदी हळू आवाजात वेटरला दुसऱ्या पदर्थाची शक्यता विचारावी. नकार आल्यास गप्प बसून तो ‘कोर्स’ तसाच जाऊ द्यावा.
  • जेवण सगळ्यांना एकाच वेळी सव्र्ह केलं जातं. सíव्हसची संपूर्ण लय प्रमुख पाहुण्यांच्या जेवणाच्या स्पीडवर अवलंबून असते. त्यांनी एकदा का तो पदार्थ खाऊन झाल्याचा इशारा केला, की त्यांच्या टेबलसह इतर सर्व टेबल्सवरून त्या कोर्सची रिकामी झालेली क्रॉकरी काढली जाते. गप्पांत रंगून आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष केल्यास तो पदार्थ खायचा राहिला किंवा हळूहळू खात असलात, तरी क्रॉकरी काढली जाते. अशा वेळी वेटर्सबरोबर वाद घालू नये. ते फक्त त्याचं काम करत असतात.
  • उंच पट्टीत, मोठय़ा आवाजात बोलू नये किंवा सíव्हस स्टाफला बोल लावू नये. अशा समारंभासाठी स्टाफ अगदी ‘वेल ट्रेन्ड’ असतो. त्यांच्या सíव्हसमध्ये नावं ठेवण्यासारखं जवळजवळ काही नसतंच.
  • जोपर्यंत प्रमुख पाहुणे प्रस्थान करत नाहीत, तो पर्यंत इतर पाहुण्यांनाही जाता येत नाही.
  •  जाताना आपल्या यजमानांचे आभार मानून जाणे योग्य ठरेल.