मानसी जोशी

काही इन्फ्लुएन्सर्स ब्रॅण्ड आणि प्रमोशनपुरते मर्यादित न राहता नवं काही शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी तसंच समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या सोशल मीडियाचा चांगला उपयोग करताना दिसत आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध गोष्टींवर विनोदी, मार्मिक तर कधी गंभीर हेतूने कंटेन्टच्या माध्यमातून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. यात महिला इन्फ्लुएन्सर्सचा टक्का अंमळ अधिक आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

जनमतावर प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्ती म्हणजे इन्फ्लुएन्सर्स. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरनी त्यांचं एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. आज प्रत्येक ब्रॅण्ड आपला बिझनेस वाढवण्यासाठी ‘इन्फ्लुएन्सर्स’ची मदत घेतात. मात्र, काही इन्फ्लुएन्सर्स ब्रॅण्ड आणि प्रमोशनपुरते मर्यादित न राहता नवं काही शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी तसंच समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या सोशल मीडियाचा चांगला उपयोग करताना दिसत आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध गोष्टींवर विनोदी, मार्मिक तर कधी गंभीर हेतूने कंटेन्टच्या माध्यमातून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. यात महिला इन्फ्लुएन्सर्सचा टक्का अंमळ अधिक आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशाच महिला इन्फ्लुएन्सर्सबद्दल जाणून घेऊया. या महिला इन्फ्लुएन्सर्स विशेषत: आपल्या कंटेन्ट, विचार याच्यापलीकडे जाऊन समाजाला उपयोगी पडावं असं काही करण्याच्या दृष्टीने धडपडताना दिसतात. समाजातील महिलांविषयीचे जुने बुरसटलेले विचार, प्रसंगी वर्षांनुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना बदलण्याचं कामही त्या करत आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते. त्याच एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतात आणि प्रगतीच्या आड येतात या संकल्पनेलाही छेद देणारं काम या तरुण इन्फ्लुएन्सर्सकडून होताना दिसत आहे. 

सोशली कनेक्टेड..

 ठाण्याच्या आरती पवार यांचं  इंस्टाग्रामवर  Whats hot Thane या नावाचं पेज आहे. या पेजच्या माध्यमातून त्या ठाण्यातील विविध ब्रॅण्ड्सविषयी तसंच शहरातील हॅपिनग गोष्टींची माहिती देतात. इंस्टाग्रामवर त्यांचे ४५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘माझ्या पेजमधून महिला बचत गट, उद्योजक, छोटे घरगुती उद्योग यांचं प्रमोशन मी करते. अनेक फॅशन लेबल्स, फूड चेन्स यांनी माझ्या पेजबरोबर कोलॅब केल्यावर त्यांचा उद्योग वाढला आहे. या दोन वर्षांत इन्फ्ल्युएन्सर्स ही संकल्पना मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय झाली. यात विविध ब्रॅण्ड्सबरोबर काम करणं, हे आव्हानात्मक काम आहे. सध्या जो उठतो तो कंटेन्ट क्रिएट करतो. काळासोबत चांगला कंटेन्ट प्रेक्षकांना देणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे’ असं त्या सांगतात. याआधीही त्यांनी ठाण्यासाठी अनेक कम्युनिटी पेजेस केले होते. मात्र चांगल्या कंटेन्टमुळे  Whats hot Thane हे पेज जास्त लोकप्रिय झालं आहे. प्रत्येक शहराची एक सोशल मीडिया कम्युनिटी असावी असं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातून त्या शहराच्या समस्या, तेथील लोकप्रिय ठिकाणं, शहराची खाद्यसंस्कृती याविषयी लोकांना माहिती मिळते असं त्यांचं स्पष्ट मत आहे.  फक्त ब्रॅण्डसचं प्रमोशन नाही तर आरती पवार यांनी महिलांच्या प्रश्नांनाही या माध्यमातून वाचा फोडली आहे. ठाण्यातील अनेक भागांत स्त्रियांना, मुलींना त्रास दिला जातो, अशा प्रकारचा मेसेजेस मुलींकडूनच येत होते. त्याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेत कारवाई केली, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

फिरस्तीचे व्हायरल अनुभव

संयुक्ता पेनुरकर वर्षांतील १० महिने फिरतीवरच असते. तिचे इंस्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडीओतून ती बजेट बॅकपॅकिंग, सोलो ट्रॅव्हिलग करताना घ्यायची काळजी, देशातील काही पाहिलेली ठिकाणं याविषयी माहिती देते. ‘हिमालयातील केलेल्या ट्रेकमुळे माझा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. याआधी मुली एकमेकांची प्रगती पाहून मत्सर करतात, एकमेकांसाठी वैर भावना बाळगतात हाच माझाही सर्वसाधारण समज होता. हृषीकेशला गेल्यावर तिथे एका कॅफेसाठी कंटेन्ट शूट करत असताना माझी शिवानी या मुलीशी ओळख झाली. तीसुद्धा माझ्यासारखी एकटीच फिरायला आली होती. आम्ही हृषीकेश ते लोहागंज असा ट्रेक एकत्र केला. सोबत बाहेर कॅिम्पगही आणि आकाशदर्शनही केलं. आमच्या ट्रेकदरम्यान आम्ही दोघींनी आम्हाला प्रवासा दरम्यान आलेले चांगले-वाईट अनुभव शेअर केले. पहिल्यांदा मला एका मुलीबरोबर अत्यंत सुरक्षित आणि चांगलं वाटलं. हा माझा अनुभव मी सोशल मीडियावर सांगितला. त्यानंतर मला अनेक मुलींचे असेच अनुभव सांगणारे मेसेज आले’ असं सांगणाऱ्या संयुक्ताने पुढे आपले अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली. संयुक्ता जास्त एकटी फिरते. त्यामुळे ती मुलींना एकटं फिरताना घ्यायची काळजी, सोलो ट्रॅव्हिलग करताना आलेले चांगल्या-वाईट गोष्टींचे अनुभव, टिप्स सांगत असते. ‘एक महिला आणि एकटीने फिरताना मला अनेक चित्रविचित्र गोष्टींचा सामनाही करावा लागतो. एकदा प्रवासात एक मुलगा पाठी लागला होता. तर एका ठिकाणी मी मुलगी आहे म्हणून मला वॉलेंटिअरचं काम करताना विनाकारण राबवूनही घेतलं गेलं. मला आलेल्या अनुभवातून मी शिकत गेले, माझी योग्य काळजी घेतली. आता हेच अनुभव मी माझ्या व्हिडीओमधून अनेक मुलींपर्यंत पोहोचवते. कितीतरी जणी मला सोलो ट्रॅव्हिलगमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल प्रश्न विचारतात. माझ्याकडून टिप्स घेतात. कधी कधी तेवढय़ापुरतं मर्यादित न राहता मेन्स्ट्रुअल कप कसा वापरावा यासारखे विषयही व्हिडीओतून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते’, असं संयुक्ताने सांगितलं. 

बिनधास्त मुलगी..  

इंस्टाग्रामवर ‘बिनधास्त मुलगी’ या नावाने प्रसिद्ध असलेली गौरी पवार आपल्या आजीबरोबरचे विनोदी, कधी थोडं गंभीर अशा कोकणातील गोष्टी शेअर करणारे व्हिडीओ टाकते. जे. जे. स्कूलमध्ये शिकत असणाऱ्या गौरीला सुरुवातीला तिची शारीरिक ठेवण आणि दिसण्यावरून ट्रोल केलं गेलं. ‘मी अगदी बारीक होते, त्यात मी शॉर्ट हेअर केल्याने अनेकांनी मला तू तृतीयपंथी आहेस का? थोडं खा म्हणजे जाड होशील अशा वाह्यात कमेंट्स देत ट्रोल केलं. भारतीय संस्कृतीत केस वाढवणं हे आजही सौंदर्याचं लक्षण समजलं जातं. मी मध्ये केस कापले होते आणि मी अंगाने बारीकही आहे, शिवाय माझं वागणंबोलणं मुलांसारखं आहे. माझ्या व्हिडीओतील कंटेन्ट दूरच राहिला, मात्र या सगळय़ा गोष्टींवरून टीका सुरू झाली’ असा अनुभव गौरीने सांगितला. सुरुवातीला याचा त्रास झाला, पण नंतर याकडे सकारात्मकतेने पाहण्याची सवय लागली, असंही गौरी सांगते. माझे फॉलोअर्स ही माझी ताकद आहे. एकीकडे व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या गौरीने कोविडकाळात आणि त्याआधीही आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करत लोकांना जमेल तशी मदत करायला सुरुवात केली. ‘एकदा कशेडी घाटात अडकलेल्या एकाला मदत केली होती. कोविडकाळात अनेकांना बेड मिळवून द्यायचा प्रयत्न केला. कोकणात रस्ता हरवलेल्या कित्येकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवलंय, असं सांगणाऱ्या गौरीला तिच्या युनिक कंटेन्टसाठी रिलबाझ, कोकणरत्न तसंच युवा सन्मान २०२३ आणि कोकण सन्मान २०२४ असे पुरस्कारही मिळाले आहेत. या प्रवासात आजीचा आणि कुटुंबाचाही भक्कम पाठिंबा आहे, असं म्हणणारी गौरी मुलींनी नेहमी ठामपणे स्वत: भूमिका घेतली पाहिजे. जे वाटतं ते व्यक्त करायला शिका. स्त्री ठामपणे उभी राहायला शिकली तर जगातील अनेक गोष्टी अत्यंत सोप्या होतील, असा सल्लाही मुलींना देते. 

कोकणी बायलची डिजिटल ताकद इंस्टाग्रामवर बायको, आई, सून, शेतकरी असा बायो असलेल्या कोकणी बायल माणूस हे पेज चालवणाऱ्या निशा आजगावकर हे कमाल व्यक्तिमत्त्व. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण या विषयावर त्यांनी व्हिडीओ बनवून समाजमाध्यमांवर टाकला. त्यांचा हा व्हिडीओ अत्यंत व्हायरल झाला. सहज म्हणून टाकलेल्या या व्हिडीओने निशा यांना डिजिटल माध्यमाची नवी वाट मिळाली.  आज त्यांचे १०९ हजार फॉलोअर्स आहेत. कुडाळ येथे राहणाऱ्या निशा या कोकणी भाषेतून कोकणातील दशावतार, तेथील खाद्यसंस्कृती, तेथील लोक याविषयी माहिती देतात. ‘कोकणातील श्रीमंत लोक’ या सीरिजमध्ये त्या कोकणातील सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या लोकांची माहिती देतात. याच सीरिजमध्ये त्यांनी काही महिलांनी सुरू केलेल्या अंकुर बचत गटाबद्दलही माहिती दिली होती. या बचत गटातर्फे गांडूळखत तयार केलं जातं. या बचत गटाबद्दल सांगितल्यावर त्यांच्या गांडूळखतासारख्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हातभार लागला. अशाच ‘जिव्हाळा’ नावाच्या वृद्धाश्रमाविषयी सांगितल्यावर समाजातील अनेक दानशूर लोकांनी तिथे सढळ हस्ते मदत केली. ‘माझ्या व्हिडीओवर सर्वात जास्त गृहिणींच्या कमेंट्स असतात. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून कोकणातील प्रश्न संपूर्ण जगात पोहोचतात याचा मला अभिमान आहे. लग्न तसंच मुलं झाल्यावरही तुमची आवड, एखादा छंद जोपासायला हवा, असा संदेश निशा तरुणींना देतात. 

viva@expressindia.com