रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
श्रावण, भाद्रपदाचे दिवस म्हणजे पावसाबरोबर सणांचे वातावरण. श्रावण संपता संपता गौरी-गणपतीची तयारी सुरू होते. या सणावारांच्या दिवसांत जेवणावळीसुद्धा झडतात, त्याही पारंपरिक पदार्थाच्या. या भागामध्ये आपण काही चटण्या व कोशिंबिरीचे प्रकार बघूया. चटण्या व कोिशबिरी ताटात डावीकडे वाढल्या जातात. कारण हे पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवतात. जेवण रुचकर आणि आपल्याला हवे तसे बनविण्यात मदत करतात. म्हणूनच यांना असे म्हणावे लागेल की हे पदार्थ जरी डावीकडे असले तरी ते उजवे असतात.
आता यांना डावीकडे का ठेवतात याचे एक शास्त्र आहे. कारण चटण्या कोिशबिरीमध्ये जास्त प्रमाणात आंबट, गोड, तिखट हे पदार्थ असतात व चटण्या कोशिंबिरीमुळे आपण भाजीची चव आपल्याला हवी तशी करू शकतो.
मोकळी चटणी
साहित्य : चण्याची डाळ भिजवलेली
१ वाटी, िलबाचा रस १ चमचा, मोहरी १ चमचा, हळद, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, तेल, िहग पाव चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे २ चमचे
कृती : सर्वप्रथम डाळ दोन-अडीच तास भिजवून वाटून घेणे. नंतर कढईमधे तेल घालून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालावी. सर्वात शेवटी हळद, तिखट व जाडसर वाटलेली चण्याची डाळ घालून मंद आचेवर झाकण लावून शिजवा. एक-दोनदा परतवून पाहा. सर्वात शेवटी चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकत्र करून मोकळे करा.चिंचेचे पंचामृत
हा प्रकार विशेषत: विदर्भात आढळून येतो.
साहित्य : चिंचेचा कोळ १ वाटी, गूळ १ वाटी, मीठ दीड चमचा, तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, दाण्याचा कूट २ चमचे, तिळाचे कूट २ चमचे, मेथीदाणे पाव चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे १ चमचा, धने-जिरे पावडर १ चमचा, मोहरी १ चमचा, िहग पाव चमचा, खोबऱ्याचे तुकडे २ चमचे, शेंगदाणे ४ चमचे.
कृती : सर्वप्रथम चिंचेचा कोळ काढून घ्यावा. त्याकरिता चिंच पाण्यात भिजवून, उकळवून चाळणीमधून गाळून त्याचा गर काढून घेणे. नंतर पॅनमधे मोहरी, मेथीदाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, िहग, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे घालून थोडे परतून घेणे. नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ, हळद, तिखट व धने-जिरे पावडर घालून भरपूर उकळणे. मिश्रणाला थोडी चमक आली की चवीनुसार मीठ व तिळाचे कूट व दाण्याचे कूट घालणे.हिरवी चटणी
साहित्य : हिरव्या मिरच्या
१०-१२, कोिथबीर ४ चमचे, जिरे अर्धा चमचा, ओलं खोबरं पाव वाटी, आलं २ चमचे, लसूण (ऐच्छिक) २ चमचे, मीठ अर्धा चमचा, िलबाचा रस १ चमचा
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा.
आमसूल चटणी
चटकन होणारी चटकदार अशी ही चटणी वेळ पडली तर वरणात, भाजीतसुद्धा घालू शकतो किंवा आमटीतसुद्धा वापरू शकतो.
साहित्य : आमसूल १ वाटी, गूळ अर्धा वाटी, जिरे पावडर १ चमचा, मीठ चवीनुसार, तिखट चवीनुसार
कृती : आमसूल भिजवून त्यात गूळ, मीठ, तिखट, जिरे किंवा जिरे पावडर मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या. सव्र्ह करा.
दुसरी पद्धत : आमसूल थोडय़ा पाण्यात उकळवून त्याची पेस्ट करावी. उरलेले जिन्नस मिसळून वरीलप्रमाणे चटणी करावी.