वैष्णवी वैद्य

उन्हाळा दिवसेंदिवस डोकावू लागला तशी हळू हळू समर फॅशन मुलींमध्ये दिसू लागतेय. उन्हाळी फॅशनमधला सगळय़ात ट्रेण्डी प्रकार म्हणजे ‘स्कार्फ’. स्कार्फची फॅशन ही आजकाल मुलींसाठी स्टाइल स्टेटमेंट झाली आहे. धूळ, ऊन यांसारख्या हवामानातून संरक्षण म्हणून वापरला जाणारा स्कार्फ आता मुलींसाठी ट्रेण्डी फॅशन बनली आहे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
BJP Victory On 4th June Morning People Taunts By Sharing Attack Video
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

अगदी राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून स्कार्फ स्टाइल करणे हे स्टाइल स्टेटमेंट मानले जाते. कॉटन, शिफॉन, सिल्क अशा विविध कापडांमध्ये आता सर्रास स्कार्फ मिळतात. तसेच प्रिंटेड, सिंगल कलर, ओढणी स्टाइल अशा पॅटर्नमध्येही स्कार्फ मिळतात, जे वेगवेगळय़ा पद्धतीने, वेगवेगळय़ा कपडय़ांवर स्टाइल केले जाऊ शकतात. वेस्टर्न असो वा पारंपरिक कुठल्याही कपडय़ांवर स्कार्फ अगदी ‘कूल लूक’ देतात. आजकाल ओढणीसारखी मऊ लुसलुशीत, खण कापड व जरीच्या कापडातही स्कार्फ दिसतात.

प्रिंटेड स्कार्फ

हे स्कार्फ कुठल्याही कापडाच्या प्रकारात तुम्हाला मिळू शकतात. प्रिंटेड छोटे स्कार्फ ऑफिस फॉर्मल्सवर स्टाइल केले तर अतिशय स्मार्ट आणि बोल्ड दिसतात. शक्यतो प्रिटेंड स्कार्फ हे प्लेन कपडय़ांवर जास्ती उठून दिसतात व सूट होतात. हे स्कार्फ स्टाइलिंगसाठी निवडताना त्याचा रंग व तुमच्या कपडय़ाचा रंग एकतर कॉन्ट्रास्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी असावा तरच तुमचा आऊटफिट स्मार्ट दिसेल. कॉटनचे प्रिंटेड स्कार्फ तुम्ही प्रवासात धुळीपासून संरक्षणासाठीसुद्धा वापरू शकता.

खण स्कार्फ

खण स्टाइल ही स्कार्फमध्ये अतिशय ट्रेण्डी आणि लोकप्रिय झाली आहे. खणाचे स्कार्फ इंडो-वेस्टर्न स्टाइलसाठी अगदी परिपूर्ण निवड आहे. खणाचे स्कार्फ हे अगदी मोठय़ा ओढणीप्रमाणे असतात व सॉलिड कलर्समध्ये उपलब्ध आहेत. जर पूर्ण प्लेन काळा कुर्ता आणि काळय़ा सलवारवर हिरवा, निळा, लाल अशा रंगांचे खण स्कार्फ स्टाइल केले तर ही तुमची सिग्नेचर स्टाइलसुद्धा होऊ शकते. त्यावर सुंदर असे ऑक्सिडाइज्ड दागिने खुलून दिसतील.

सिल्क स्कार्फ

हे स्कार्फ शक्यतो पारंपरिक पेहरावावर किंवा पार्टीवेअरवर जास्त खुलून दिसतील, कारण त्या कापडाला थोडी जर किंवा चमक असते. सिल्कचे स्कार्फ तुमच्या केसांनाही सिल्की व सॉफ्ट ठेवतात.

इंडिगो स्कार्फ

या प्रकाराचे स्कार्फसुद्धा ओढणीमध्ये धरले जाऊ शकतात. इंडिगो फॅशन ही खण फॅशनसारखी सुपरहिट फॅशन आहे. हे स्कार्फ गडद निळय़ा रंगातच येतात, त्यामुळे स्टाइल करताना कपडय़ांचे रंग जपून निवडावे.

वेल्वेट स्कार्फ

वेल्वेट स्कार्फ डेली यूजसाठी शक्यतो वापरता येत नाहीत किंवा वापरू नये. थंडीच्या मोसमात किंवा प्रदेशात फिरताना या स्कार्फचा वापर जास्त होतो. पश्मीना शैलीतील हे स्कार्फ मोठय़ा कोटभोवती स्टाइल केले की तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनोखा लुक मिळतो. काश्मीरमध्ये खास त्यांच्या पद्धतीचे स्टाइलिंग करताना अशा पद्धतीचे स्कार्फ किंवा दुपट्टे वापरले जातात. स्कार्फ ही फॅशन अ‍ॅक्सेसरीसुद्धा आहे बरं का! अगदी शर्मिला टागोरच्या ‘कश्मीर की कली’पासून ते आत्ता दीपिकाच्या शांतीपर्यंत स्कार्फ स्टाइलच्या नवनवीन व्याख्या आपण पाहिल्या. पंजाबी कुडी तर स्कार्फ चक्क सुबक वेणीमध्येही स्टाइल करतात.

तरुणाईची फॅशन रोज बदलत असते. आजची फॅशन उद्या नसेलही किंवा नवीन रूपात आपल्या समोर येईल. पण हे मात्र नक्की की आजच्या तरुणाईला नव्या-जुन्याची सांगड घालून फॅशन करायला खूप आवडते. स्कार्फ ही स्टाइलसुद्धा पाश्चिमात्य संस्कृतीतून आपल्याकडे आली आहे. जुन्या बॉलीवूड सिनेमांमध्ये हटके पद्धतीने स्कार्फ आणि दुपट्टय़ाचा केलेला वापर आपण बघतोच, आता नवीन हिंदी अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या लुकमध्ये स्कार्फचा वापर आधुनिक पद्धतीने करत आहेत. तरुणाईची स्टाइल स्टेटमेंट या माध्यमातूनच बनत गेली.

महिला दिन किंवा इतर ओकेजन्सला स्कार्फला धरून वेगवेगळय़ा थीम, लुक ठरविले जातात. महत्त्वाची गोष्ट ही की आता स्कार्फ, दुपट्टा, शाल हे प्रकार मुलांच्या स्टाइलिंगमध्येही वापरले जातायेत आणि ते सुपरहिट ठरत आहेत. स्कार्फ हा प्रकार आता युनिसेक्स झाला आहे. अवॉर्ड शोज, पार्टी, लग्न अशा विविध सेलिब्रेशन्सला मुलांना हटके पद्धतीने स्कार्फ स्टाइलिंग केले जाते. कपडय़ाच्या छोटय़ा तुकडय़ापासून तयार होणारा स्कार्फ आज तरुणाईच्या फॅशनमधला महत्त्वाचा एलिमेंट बनला आहे.