वेदवती चिपळूणकर परांजपे

दिवाळी म्हटली की सुट्टय़ा आल्या. सुट्टय़ांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी दोनच: शॉपिंग आणि फिरणं! दिवाळीत तर नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने दोन्ही होतं. नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे रिकाम्या हाताने तर जाऊ शकत नाही. म्हणजे काहीतरी घ्यायलाच हवं. दिवाळीनिमित्ताने ठिकठिकाणी प्रत्यक्ष सेल आपल्याला मोहात पाडण्यासाठी तर लागलेले असतातच. पण ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात ऑनलाइन ऑफर्स, दिवाळी धमाका, कॉम्बो ऑफर्स, फेस्टिव्ह ऑफर्स यांचाही सुकाळ असतो. आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना भेट देण्यायोग्य वस्तू आपल्याला सेल मार्केटपासून ते ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलपर्यंत कुठेही मिळू शकतात.

women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video

सध्या वेस्टसाइड, फॅब इंडिया, होम डेकोर, चुंबक, आय टोकरी अशा ऑनलाइन आणि ऑफलाइन लाइफस्टाइल स्टोअर्सनी दिवाळी शॉपिंग आणि गिफ्टिंग यांसाठी अनेक सुंदर वस्तूंची रेंज आणली आहे. वेस्टसाइड, फॅब इंडिया, आय टोकरी यांसारख्या वेबसाइटवर कपडे, साडय़ा, दुपट्टे, मटेरियल्स तर आहेतच, मात्र त्यांनी होम डेकोरमधल्या अनेक वस्तूदेखील गिफ्टिंग रेंजमध्ये आणल्या आहेत. वेगवेगळय़ा आकाराचे, साइजचे, प्रकाराचे दिवे हा यावर्षीच्या गिफ्टिंगमधलं मुख्य आकर्षण आहे. पिलो कव्हर्स आणि बेडशीट असे कॉम्बोसुद्धा गिफ्टिंग ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत. हँड पेंटेड वस्तू गिफ्ट करण्याचा ट्रेण्ड नव्याने सेट होऊ पाहत आहे. त्यात पेंटिंगच्या फ्रेम्स, क्रोकरी, टी-कोस्टर्स अशा वस्तू चुंबक, वेस्टसाइड यांसारख्या ऑनलाइन आणि होम सेंटरसारख्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये गिफ्टिंगसाठी पाहायला मिळतात.

हेही वाचा >>> बन ठन के जश्न में रहना

दिवाळी म्हणजे उटणं आणि उटणं म्हणजे सुगंध! कोणालाही सुगंध गिफ्ट म्हणून देणं याच्याइतकी क्रिएटिव्ह कृती इतर कोणती नसेल! सुगंध भेट देण्यासाठी वेगवेगळय़ा सुगंधांच्या साबणांचा कॉम्बो गिफ्ट पॅक हा एक चांगला पर्याय असू शकतो. सुगंधी अत्तर स्नान अशा पद्धतीचे विविध सुगंध असलेले कॉम्बो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. उटणे, साबण, धूप, अशा वेगवेगळय़ा प्रकारांतील सुगंधित गिफ्ट्स देता येऊ शकतात. यापेक्षा वेगळा सुगंध म्हणजे अर्थात परफ्यूम्स! आयटीसीच्या ‘एंगेज’ ब्रॅण्डने वेगवेगळय़ा फ्रेग्रन्सचे परफ्यूम्स बाजारात आणले आहेत. मेन-विमेन कॉम्बो ‘मोमेंट्स परफ्यूम गिफ्ट बॉक्स’ या नावाने बनवले आहेत. दिवाळी गिफ्टिंग डोक्यात ठेवूनच हे कॉम्बो बनवले गेले आहेत. त्यांच्याच ई.डी.डब्ल्यू एसेन्झा या रेंजचेसुद्धा लक्झरी परफ्यूम गिफ्ट बॉक्स मार्केटमध्ये आलेले आहेत. अर्थात केवळ सुगंध हा एकच पर्याय नव्हे. अजूनही गिफ्टिंगचे इंटरेस्टिंग पर्याय शोधले तर सापडू शकतात.

हेही वाचा >>> हाच आपुला ठेवा गं

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच अशा गॅझेट्सच्या लोकप्रिय पर्यायांनी तर ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारपेठ भरलेल्या आहेत. या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि हॅण्डक्राफ्टेड आर्ट्सच्या वस्तू, कपडे या सगळय़ा हटके वस्तू तर आहेतच, मात्र आईला, बहिणीला, बायकोला, जवळच्या मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी अ‍ॅक्सेसरीज हा कायमस्वरूपी पसंत पडणारा पर्याय आहे. ‘तनिष्क’च्या ‘धरोहर’ या कलेक्शनमधील नेकपीस, ब्रेसलेट, कडा अशा दागिन्यांचा अगदी जवळच्या व्यक्तींसाठी गिफ्ट म्हणून विचार करता येऊ शकतो. थोडय़ा मॉडर्न आणि तरीही नाजूक डिझाइन्सचा पर्याय हवा असेल तर ‘तनिष्क’चेच ‘मिया’ कलेक्शनमधली डिझाइन्स अत्यंत सुंदर ठरतील. व्हाइट गोल्ड आणि रोज गोल्डमधली पेंडंट, ईयर टॉप्स, ब्रेसलेट अशा व्हरायटी गिफ्ट म्हणून देता येऊ शकतील. मोठमोठया ज्वेलरी ब्रॅण्डबरोबरच सिल्व्हर ज्वेलरीचे अनेक ब्रॅण्ड्स आज ऑनलाईन खूप सुंदर पर्याय उपलब्ध करून देत आहेत.  यंदाच्या दिवाळीला आपल्या प्रिय व्यक्तींपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत सर्वांना गिफ्ट्स देण्यासाठी अनेक ऑप्शन्स ट्रेण्डमध्ये आहेत. viva@expressindia.com