वैष्णवी वैद्य मराठे 

भारतीय सणांची आपली सगळय़ात आवडती गोष्ट म्हणजे नवनवीन कपडे आणि फॅशन आत्मसात करणे. भारतीय संस्कृतीतला दुर्गा देवीच्या नऊ अवतारांना समर्पित असलेला एक शुभ हिंदू उत्सव म्हणजे नवरात्र. सणावाराच्या निमित्ताने आपल्याला लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड अनुभवता आणि मिरवता येतात. नऊ दिवस नॉन-स्टॉप दांडिया, गरबा खेळण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.

Prakshal Puja, Vitthala, Pandharpur,
पंढरपूर : विठ्ठलाची प्रक्षाळपूजा संपन्न, नित्योपचार पूर्ववत; देवाचा शिणवटा जाण्यासाठी आयुर्वेदिक काढा
Mumbai Crime: Gurusiddhappa Waghmare aka Chulbul Pandey brutally murdered inside a Spa in Mumbai's Worli, Mumbai
Worli Murder Case : आधी मद्यपान केले, मग स्पामध्ये जाऊन…, प्रेयसीसमोरच चुलबुल पांडेची निर्घृण हत्या, वरळीत हत्येचा थरार!
Roha Diva Memu schedule changes Mumbai
रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
Xiaomi Smart Umbrella
Xiaomi Smart Umbrella: यंदाच्या पावसाळ्यासाठी स्मार्ट छत्री; मोबाईलसारखी टचस्क्रीन आणि बरंच काही, जाणून घ्या फीचर्स!
Police Dance In Vitthal Wari 2024 Video Pandharpur wari Police Live Their Moments In Wari Police Dancing At Palakhi satara
पोलिसांसाठी तो बंदोबस्त नसतो, पांडुरंगाची सेवा असते! वर्दीतल्या वारकऱ्यांचा VIDEO एकदा पाहाच
World Plastic Bag Free Day Doctor Couple Special Campaign in akola
जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्तदिन विशेष : ‘प्लास्टिक पिशवीची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा’; डॉक्टर दाम्पत्याची विशेष मोहीम
Hearing today before the Electricity Regulatory Commission on the tender of Mahavitaran
बड्या कंपनीकडून वीजखरेदीसाठी लगबग? ‘महावितरण’च्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर आज सुनावणी
Bhushi dam, overflow,
लोणावळा : भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी

हा सण प्रत्येक समुदायात वेगवेगळय़ा पद्धतीने जरी साजरा होत असला तरी आजकाल सगळेच नटूनथटून, नवनवीन थीमचे पोशाख परिधान करून अगदी जल्लोषात नवरात्रीचा आनंद घेतात. या उत्सवाचा पारंपरिक पोशाख म्हणजे घागरा, लेहेंगा चोळी, चनिया चोळी; पण त्यामध्येही टिपिकल न राहता तरुणाईने या वर्षी काय वेगवेगळे ट्रेण्ड आणले आहेत ते बघू या.

लॉन्ग कुर्ता आणि स्कर्ट

पारंपरिक चनिया चोळी आणि घागरा यामध्ये तुम्हाला काही तरी नवीन पद्धत करायची असेल तर आजकाल लॉन्ग कुर्ता आणि स्कर्टची फॅशन आता ट्रेण्डिंग आहे. पेस्टल रंगांची तरुणांची आवड पाहता तुम्ही गुलाबी, आकाशी, पिस्ता किंवा न्यूड रंगामध्ये कुर्ता घालून त्यावर कॉन्ट्रास्ट असा छान एम्ब्रॉयडरी केलेला स्कर्ट परिधान करू शकता. तुमच्या आवडीनुसार त्यावर छान रंगसंगतीचा दुपट्टाही घेऊ शकता. बांधणी प्रिंट किंवा डिजिटल प्रिंटच्या फॅशनमध्येही हा प्रयोग तुम्ही करू शकता. सिल्क चंदेरी कुर्ता आणि पलाझो पँट्स असा कॉम्बिनेशनसुद्धा या प्रकारात छान दिसेल. टू-टोन्ड/धुपछाव रंगसंगतीचे कुर्ते दांडिया सेलिब्रेशनसाठी परफेक्ट आहेत.

हेही वाचा >>> ‘परंपरेचं’ पान!

इंडो-वेस्टर्न फ्युजन

फॅशनेबल दिसत असतानाच तुम्हाला सांस्कृतिक वळण आणायचे असेल तर इंडो-वेस्टर्न कपडे कोणासाठीही योग्य आहेत. इंडो-वेस्टर्न कपडे विविध प्रकारच्या शैलींमध्ये येतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगकाठीला अनुकूल असेल ते निवडू शकता. इंडो-वेस्टर्न कपडय़ांसाठी गुलाबी, पिवळा आणि किरमिजी रंग यांसारखे पेस्टल रंग सध्या प्रचलित आहेत. तळाशी किंवा नेकलाइनच्या काठावर कुंदन एम्ब्रॉयडरी असलेली झालर अगदी उठून दिसते. इंडो-वेस्टर्न प्रकारात सध्या गाजतोय तो म्हणजे जरीच्या किंवा पैठणीच्या कापडाचे फॉर्मल पॅन्ट-शर्ट किंवा जॅकेट. विविध सेलिब्रिटीज कार्यक्रमांना, पुरस्कार सोहळय़ांनासुद्धा हेच परिधान करून आपल्याला दिसले आहेत. दांडिया आणि गरबा या प्रकारांत नाचणे, बागडणे भरपूर असते, त्यामुळे तुम्ही जे कपडे घालाल त्यात कम्फर्टेबल असणे फार गरजेचे आहे. अनेक तरुण मुलींचे असे म्हणणे आहे की, नवरात्रीचे पारंपरिक कपडे तर घालायचेत; पण ते सांभाळणे आणि सावरणे हे फार अवघड असते. अशा वेळी इंडो-वेस्टर्न पॅन्ट-सूट हा अतिशय आकर्षक आणि सुयोग्य पर्याय आहे.

हाफ-हाफ साडी

ही स्टाइलसुद्धा तरुण मुलींच्या आवडीची झाली आहे. या पद्धतीत एकच साडी दोन अगदी वेगवेगळय़ा रंगसंगतीत असते. साडीचा पदर आणि पूर्ण अंगावरची साडी एका रंगाची व निऱ्यांचा भाग फक्त वेगळय़ा रंगाचा अशी या साडीची ठेवण असते. हा प्रकारसुद्धा योग्य पद्धतीने स्टाइल केल्यावर अतिशय सुरेख दिसतो. यामध्येही तुम्हाला हवे तसे प्रकार मिळू शकतात. कॉन्ट्रास्ट हाफ-हाफमध्ये रंगापासून ते एम्ब्रॉयडरीपर्यंत वेगवेगळी रंगसंगती असते. साडी नेसायची आवड आणि सावरण्याचे कसब असेल तर हा हटके प्रकार नवरात्रीसाठी अगदी परफेक्ट आहे.

अनारकली ड्रेस

काही वर्षांपूर्वी एखाद्या समारंभासाठी नवीन ड्रेस घ्यायचा असेल तर अनारकली पॅटर्न ही मुलींची पसंती असायची. तोच अनारकली पॅटर्न आता आधुनिक पद्धतीने लॉन्ग गाऊनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्यांना घागरा सावरता येत नाही, पण अशाच पद्धतीचं काही तरी हवं आहे त्यांच्यासाठी अनारकली बेस्ट पर्याय आहे. यामध्येही बेल्ट फॅशन, लेअर अनारकली, स्ट्रेट अनारकली असे पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि शोभेनुसार तुम्ही निवड करू शकता.

इंडो-वेस्टर्न आणि विंटेज प्रकारात खेळायला तरुणांना आवडते असे एकंदरीत लक्षात आले आहे. विंटेजमधलंच एक ट्रेण्डिंग उदाहरण म्हणजे बोहो स्टाइल.

हेही वाचा >>> परंपरेतील नवता

बोहोमन स्टायिलग सध्या अतिशय ट्रेण्डिंग प्रकार बनला आहे. मूलत: हा फ्रान्स देशातला प्रकार आहे. पूर्वी फ्रान्समध्ये सगळय़ात स्वस्त आणि मस्त कापड वापरून लोकांचे अशा प्रकारे साधी राहणीमान असायचे. तिथे दारिद्रय़रेषेखालील वर्ग पूर्वी अशा पद्धतीचे कपडे घालायचा असासुद्धा इतिहास आहे. स्टायिलगमधल्या प्रयोगांना कुठलीही मर्यादा नसते. तुम्ही जे छान सावरू शकता ते तुम्हाला छान दिसेल असे एक साधे फॅशन तत्त्व आहे. बोहो स्टाइल आता विंटेज स्टाइल म्हणून इंडो-वेस्टर्न पद्धतीने तरुणाईने आत्मसात केली आहे.

नवरात्रीत बोहो स्टाइल करायची असेल तर विविध प्रकारचे आणि प्रिंट्स मिक्स अ‍ॅण्ड मॅच तुम्ही करू शकता. फ्लोरल प्रिंट्स, टाय-डाय, पेस्ली किंवा आदिवासी-प्रेरित डिझाइन असलेले पोशाख घालण्याचा विचार करा. वेगवेगळय़ा प्रिंट्स मिक्स केल्याने तुमचा बोहो नवरात्री लुक आकर्षक दिसेल. बोहो फॅशनमध्ये अनेकदा सिम्पल टोनचे रंग वापरले जातात. दांडिया, गरबा हे सगळं संध्याकाळच्या काळोखी वेळेत असल्याने तुम्ही लाल, पिवळा, हिरवा आणि निळा या पारंपरिक रंगांचा विचार करू शकता.

नवरात्रीचा मेकअप

मेकअपचा स्पर्श जोडल्याशिवाय कोणताही लुक पूर्ण होत नाही. नवरात्रीसाठी हलका मेकअप करणे योग्य आहे. भरपूर नाचणे म्हणजे खूप घाम येणे. लाइट कव्हरेज आणि स्वेट-प्रूफ मेकअप प्रॉडक्टस निवडणे लॉन्ग-लास्टिंग मेकअप ठेवण्यास मदत करेल. मॅट फाऊंडेशन, वॉटरप्रूफ मस्करा आणि मॅट लिपस्टिक ही तुमची नवरात्रीसाठी बेस्ट मेकअप प्रॉडक्ट्स आहेत. जे काही प्रॉडक्ट्स वापराल ते लाइट शेडमध्ये ठेवावेत यामुळे तुमचा चेहरा पूर्णवेळ ग्रेसफुल दिसतो.

जर तुम्ही लिक्विड किंवा क्रीम फाऊंडेशन वापरत असाल तर तुमच्या मेकअपला सेटिंग पावडरने सेट करा, ज्यामुळे तेल आणि घाम येणार नाही. दांडिया नाइटला ग्लॅम फॅक्टर जोडण्यासाठी गुलाबी आणि लालसारख्या डायनॅमिक शेड्सचा योग्य वापर तुम्ही करू शकता.

दांडिया स्पेशल हेअरस्टाइल

जेव्हा फ्री केशरचनांचा विचार केला जातो तेव्हा आपले केस मोकळे सोडणे हा सर्वात सोपा पर्याय वाटू शकतो, तो नवरात्रीसाठी नक्कीच योग्य नाही. डान्स केल्याने तुम्हाला सतत घाम येऊ शकतो तसेच केसही धुळीमुळे खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत बन्स किंवा प्लेट्ससारख्या सुंदर हेअरस्टाइल तुम्ही करू शकता. ब्राइड्स हेअरस्टाइल नवरात्रीसाठी परफेक्ट आहे. पारंपरिक पोशाखाला ब्राइड्स अतिशय छान सूट होतात. तसेच फिशटेल वेणी, थ्री-स्ट्रँड वेणी, डच वेणी आणि क्लासिक वेणी यांसारखे वेण्यांचे अनेक पर्यायसुद्धा तुम्ही करू शकता.

तुम्ही अंबाडय़ासारखे केअर-फ्री हेअरस्टाइलदेखील निवडू शकता. दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांसारख्या सेलिब्रिटींमध्ये क्लासिक स्लीक लो बन आवडता आहे. ब्रेडेड बन, मेसी बन आणि टॉप नॉट यांसारख्या इतर अनेक बन स्टाइल आहेत ज्या एथनिक नवरात्री लुकसाठी निवडू शकता. आणखी एक सहज हेअरस्टाइल पर्याय म्हणजे क्लासिक हाय पोनीटेल ज्यामध्ये कधीही गोंधळ होत नाही आणि ही हेअरस्टाइल सहज सावरता येते. केसात फुलं किंवा गजरा माळायला आवडत असेल तर ते वापरूनही तुम्ही अगदी प्रोफेशनल हेअरस्टाइल करू शकता.

 हेअर चेन, मांग टिक्का, रंगीबेरंगी पिन आणि बऱ्याच अशा केसांच्या अ‍ॅक्सेसरीजदेखील आजकाल खूप लोकप्रिय आहेत. कोणतीही स्टाइिलग टूल्स वापरण्यापूर्वी गुंता-मुक्त आणि आटोपशीर हेअरस्टाइलसाठी हेअर सीरमचा उपाय चांगला आहे . हेअर सीरम तुमच्या केसांना पूर्णवेळ सेट ठेवते.

हेही वाचा >>> गोविंदा आला रे..

नवरात्री स्पेशल ज्वेलरी

सगळय़ांचा आवडीचा विषय म्हणजे नवरात्रीची खास ज्वेलरी. यामध्येही काही पारंपरिक पर्याय आहेत, पण तुमच्या आवडीनुसार आणि ट्रेण्डनुसार ज्वेलरीची निवड करू शकता. सध्या लोकप्रिय ट्रेण्डमध्ये कुंदन, ऑक्सिडाइज्ड, टेम्पल, टॅसल, हॅण्डमेड ज्वेलरी असे अनेकविध पर्याय आहेत. सध्या पारंपरिक आणि आधुनिक असे ऑप्शन्सही उपलब्ध आहेत. इंडो-वेस्टर्नसारखेच ज्वेलरीमध्येही मिक्स अ‍ॅण्ड मॅच तुम्ही करू शकता. ज्यांना कमीत कमी दागिने घालायला आवडतात त्यांच्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारांत मिनिमलिस्टिक ज्वेलरी हा प्रकार आहे. एकच छोटा खडा असलेला पेंडंट, कानातले, बांगडय़ा असं काही तरी तुम्ही निवडू शकता. तुमच्या वैयक्तिक शैलीशी जुळणारे दागिने निवडून हवा तास लुक तुम्ही कस्टमाइज्ड करू शकता.

मुलांसाठी नवरात्री लुक

लोकांमध्ये असा समज आहे की, स्त्रियाच फॅशन कॉन्शस असतात आणि पुरुष ट्रेण्ड लक्षात घेऊन ड्रेसअप करत नाहीत. हे अजिबात खरे नाही. आधुनिक काळात पुरुष आधीच्या तुलनेत जास्त फॅशन कॉन्शस आहेत.

नवरात्रोत्सवासाठी केडीया आणि काफनी पायजमा हा अतिशय आकर्षक ड्रेस असेल. केडीया हे भरतकाम आणि मिरर वर्क असलेले शॉर्ट कुर्ते असतात.

धोतीसोबत शेरवानी हा झटपट लुकही अतिशय हिट होईल. धोती किंवा धोती स्टाइलचा पायजमा घातलेली समृद्ध भरतकाम असलेली क्लासिक शेरवानी दांडियाच्या नृत्यादरम्यान तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवेल. जर तुम्ही समकालीन पोशाखांमध्ये अधिक आरामदायक असाल, तर चांगला पठाणी किंवा आकर्षक कुर्ता घ्या आणि तुमच्या जीन्सवर घाला.

नवरात्रात अगदी पूर्वापार प्रचलित असणारी फॅशन म्हणजे मिरर वर्क, बांधणी कापड, कुंदन वर्क. यापलीकडे जाऊन आता कॉटन, चंदेरी, शिफॉन, चिकनकारी अशा प्रकारांतही आधुनिक स्टायिलगचे कपडे मिळत आहेत आणि त्यातही तरुणाई स्वत:च्या आवडीप्रमाणे प्रयोग करताना दिसते आहे. तरुणांचे म्हणणे असे आहे की सणांची- उत्सवांची पारंपरिकता जपण्यात वेगळीच मजा आहे. म्हणूनच ती जपत असताना नावीन्याची जोड कशी लावता येईल याचा अट्टहास करावासा वाटतो. viva@expressindia.com