शब्दांकन: श्रुती कदम

माना दूरियां बहुत होने वाली है हमारे बीच,

मगर फासला सिर्फ शहरों मैं होगा दिल मैं नहीं

स्पॉटीफायवर प्रसारित होणाऱ्या ‘दिल का पोस्ट बॉक्स’ हा पॉडकास्ट थोडा वेगळा आहे. अनेक आर. जे मिळून हा पॉडकास्ट सादर करतात. या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रियजनांसाठी लिहिण्यात आलेली पत्रं वाचून दाखवली जातात. ‘दिल का पोस्ट बॉक्स’ या पॉडकास्टच्या ‘डिअर बॉयफ्रेंड’ या भागात महाविद्यालयात शिकत असलेली मुलगी आपल्या पुढील शिक्षणाबद्द्ल तिच्या प्रियकराला पत्राद्वारे सांगते. त्या दोघांनी एकत्र पुण्यात अ‍ॅडमिशन घेण्याचे ठरवलेले असते, पण ती अचानक दिल्लीला जाण्याचा विचार करते आणि आपण आता एकमेकांपासून लांब जाणार असल्याचे सांगते. आपलं म्हणणं मांडताना ती ‘माना दूरियां बहुत होने वाली है हमारे बीच, मगर फासला सिर्फ शहरों मैं होगा दिल मैं नहीं’  हे वाक्य म्हणते आणि त्याला देखील तिची स्वप्नं समजून घेण्याची विनंती करते. या पॉडकास्टमध्ये अशा अनेक वेगळय़ा परिस्थितीत अडकलेल्या लोकांची पत्रं वाचून दाखवली जातात.

हेही वाचा >>> ऐकू आनंदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्ली क्लासी आणि मासी हे दोन प्रकार फार वाढले आहेत. मला यातलं जास्त समजत नाही. माझ्या मते आपल्याला जे आवडतं ते छान असतं. मी आवडीने पॉडकास्ट ऐकते. मला प्रेम कथा ऐकणं अधिक पसंत आहे. प्रेम कथांची अनेक पॉडकास्ट मी ऐकले आहेत, पण ‘दिल का पोस्ट बॉक्स’मध्ये आपल्या प्रियजनांना जी पत्रं ऐकवली जातात ती बरीचशी उर्दू आणि हिंदी भाषेचा मिलाफ करत सुंदरपणे लिहिलेली असतात. आपल्याला जे आपल्या प्रियजनांना सांगायचे आहे ते या विविध पत्रांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. म्हणून हा पॉडकास्ट ऐकताना नेहमीच खूप भावूक व्हायला होते. आणि या भागात आपली वेगळी वाट निर्माण करणाऱ्या जिज्ञासू. जिद्दी मुलीच्या स्वप्नांबद्दलचा आशय मांडला आहे, त्यामुळे हा भाग मला अधिक आवडला.  – मनाली बडदे (बीए विद्यार्थी)