रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
भात खाल्ल्यामुळे माणसाच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असा गैरसमज आहे, पण यातील महत्त्वाची बाब कुणीच लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण होतो. भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते हे मात्र नक्की खरे, यामुळे माणसाच्या आतील उत्साह वाढीस लागतो. भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही, कारण आपण नुसता भात कधीच खात नाही. भाताबरोबर, भाजी, वरण, दही, दूध, आमटी असे पदार्थ घेत असतो. त्यामुळे आपल्याला कोणताही अपाय होत नाही.
कोकणात प्रमुख अन्न भात व मासे आहे. कोकणी माणूस आपल्याला नेहमीच उत्साहात दिसतो. त्याचं कारणही जवळपास हेच आहे. कारण तो दररोज भात खात असतो. जेवण पोटभर आणि समाधानकारक झाले, तर त्याचे मन प्रसन्न राहते. भात किंवा इतर पदार्थ शिजविण्याची आपली महाराष्ट्रीय पद्घत चांगली असून आपण ती कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे आपणास अधिक आनंद मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्विटकॉर्न चीज राइस
साहित्य : तयार भात २ वाटा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, मिक्स हर्ब्स अर्धा चमचा, टोमॅटो प्युरी २ वाटी, मीठ, साखर, तिखट चवीनुसार, चीज अर्धा वाटी, लोणी २ चमचे, स्वीट कॉर्न अर्धा वाटी
कृती : फ्राय पॅनमध्ये लोणी घालून लसूण परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी, स्वीट कॉर्न, मिक्स हर्ब्स, तिखट, मीठ, साखर घालून परतावे. नंतर तयार शिजवलेला भात व चीज टाकून एक वाफ येऊ द्यावी. कोथिंबीर टाकून गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

More Stories onतांदूळRice
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnus menu card reciepe of different types of rice
First published on: 12-07-2013 at 01:05 IST