पूर्वी एक जाहिरात लागायची. एक बाळ दाखवायचे. त्याच्या उपयुक्त गोष्टींच्या ब्रॅण्ड्सची लेबल्स त्याच्यावर लावलेली दाखवली जायची. तेव्हा वाटायचं काहीतरीच काय.. कसं शक्य आहे? अभी बदलते जमाने के साथ सब कुछ बदला हैं भाई.. ‘ब्रॅण्डेड लाइफस्टाइल’ हा आजच्या तरुणाईचा मूलमंत्र झाली आहे. त्याचीच दखल घेत गेल्या आठवडय़ात व्हिवानं वर्धापनदिन विशेषांकात हा विषय मांडला. आता ‘टॉप टू बॉटम’ सगळ्या गोष्टी ब्रॅण्डेड घेणं यात काहीही वेगळेपण उरलेलं नाही. ब्रॅण्डेड गोष्टी सगळेच जण वापरताहेत. फक्त प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे ब्रॅण्ड्स वापरले जातात इतकंच. फार तर त्यातलेही काही ब्रॅण्ड अत्यंत महागडे असल्याने ते फक्त खास ऑकेजन्सच्या वेळी वापरले जातात.
ब्रॅण्डेड गोष्टी वापरल्या जातात त्या त्यांच्या गुणवत्ता, उपयुक्तता, टिकाऊपणा, आरामदायीपणा नि त्याबद्दल वाटणाऱ्या खात्रीमुळे. ते ‘ब्रॅण्डनेम’ वापरताना आपसूकच वापरणाऱ्याचे स्टेटस उंचावते, असे व्हिवाशी बोलताना तरुणाईने सांगितले. चांगल्या प्रतीच्या गोष्टी वापरताना मनाला एक आनंद मिळतो नि पसा वसूल झाल्याचे समाधानही मिळते. विविध ब्रॅण्डेड गोष्टी वापरणाऱ्या काहींनी त्यांचे आवडते ब्रॅण्ड्स नि अनुभव ‘व्हिवा’सोबत शेअर केलेत.

अमित मराठे
ब्रॅण्डेड वस्तूंची क्वालिटी ही सुपिरिअर असते. दिसायला त्यांची किंमत जास्त दिसते, पण त्या चांगल्या टिकतात. त्याउलट अनब्रॅण्डेड वस्तू घेतल्या तर त्या फारशा न टिकल्याने पुन्हा लगेचच घ्याव्या लागतात, त्यांना तितकी गुणवत्ता नसते नि पसे तर तेवढेच खर्च होतात. म्हणूनच मी कायम ब्रॅण्डेड वस्तू घेतो. मी ‘नाईके’, ‘आदिदास’चे शूज वापरतो. स्पोर्टस् वेअर ‘नाईके’, ‘प्युमा’, आदिदास’चं वापरतो. कॅज्युअल वेअरमध्ये ‘ली कूपर’, ‘जॅक अ‍ॅण्ड जोन्स’, ‘फ्लाइंग मशीन’ हे ब्रॅण्ड अधिक आवडतात. त्याखेरीज ‘लिव्हाइस’, रँग्लर, ‘विल्स लाइफस्टाइल’चे शर्टस् वापरायला आवडतात. डोळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने ‘रेबॅन’, ‘फास्टट्रॅक’, ‘ओपिअम’, ‘आयडी’चे गॉगल्स निवडतो.

समीर नाईक
‘सॅमसंग’च्या मोबाइलची रिलायबिलिटी मला आवडते. ‘नोकिया’च्या ब्लूटूथ हेडसेटशिवाय माझे पानही हलत नाही. सुपर्ब साऊंडचे ‘सोनी’ वॉकमन हेडफोन्स वापरणे मी प्रिफर करतो. कम्फर्ट, स्टाइल नि डोळ्यांच्या काळजीच्या दृष्टीने मला ‘रेबॅन’चे गॉगल्स चांगले वाटतात. स्पेशल ऑकेजनच्या वेळी मी ‘राल्फ लॉरेन’च्या ग्लासेस वापरतो. कम्फर्ट नि लाइटवेट म्हणून ‘कोस्टर्स’चे शूज वापरतो. डेली वेअरसाठी बऱ्याचदा ‘केिम्ब्रज’चे शर्ट घेणे प्रिफर करतो. काही वेळा ‘वॅन हुसेन’, ‘लुई फिलिप’ची शर्टसची स्पेशल एडिशन आवडीनं घेतो. कॅज्युअल्स ‘नाईके’ नि ‘रिबॉक’ वापरतो. ‘अमेरिकन टुरिस्टर’च्या ट्रॅव्हल हॅण्डबॅगसकट मी खूप भटकंती केली आहे. एकूणच सगळ्या ब्रॅण्डेड गोष्टींची क्लालिटी, त्यांची उपयुक्तता, त्यांचा भरवसा नि त्यामुळे त्यांना कायमच मिळणारी भरभरून दाद या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.

मिता गणपुले
मी ‘केमिस्ट्री’, ‘फॉरएव्हर २१’, ‘अ‍ॅण्ड’, ‘अ‍ॅलन सोली’, ‘व्हॅन ह्य़ुसेन’, ‘वेरो मेडा’, ‘ओन्ली’, ‘लॅटिन क्वार्टर्स’ हे ब्रॅण्ड्स वापरते. ब्रॅण्डेड क्लोद्स युनिक, चांगल्या क्वालिटीचे असल्याने आपला वॉर्डरोब आपसूकच एक्सक्लुझिव्ह होतो. पर्स किंवा बॅग्जमध्ये मला ‘बँगिट’, ‘पीसेस’, ‘कॉलेट हेमन’, ‘टॉमी हिलफिगर’ हे ब्रॅण्ड आवडतात. ‘बॅगिट’च्या बॅग्ज त्यांच्या रंग नि डिझाइनमुळे फॉर्मल नि कॅज्युअल वेअरवरही चालतात. ऑस्ट्रेलियन ब्रॅण्ड ‘कॉलेट हेमन’च्या बॅग्ज अलीकडेच आपल्याकडे आल्या असून त्यांचे हँडल अ‍ॅडव्हान्स आहे. या ब्रॅण्डेड बॅग्जमुळे पसे खूप खर्च झाले तरी आरामही तेवढाच मिळतो. ‘टॉमी हिलफिगर’, ‘डिझेल’, ‘फ्रेंच कनेक्शन’ची वॉचेस मी घेते. ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये ‘लॅक्मे’चे फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट, काजल घेते. ‘फेसेस’च्या नॅचरल शेडच्या लिपस्टिक नि रंगांची व्हरायटी असणारे नेलपेंट घेते. ‘अ‍ॅम्वे’चा सटॅनिक श्ॉम्पू वापरते. ‘फॉरएव्हर२१’, ‘वेरो मोडा’ची ज्वेलरी घेते. ‘झारा’, ‘वेमोर’, ‘फॉरएव्हर२१’, ‘मेट्रो’चे शूज वापरते.

शिल्पा बेलसरे
मी कपडय़ांच्या बाबतीत खूपच ब्रॅण्ड कॉन्शिअस आहे. त्यामुळे मी फॉर्मल वेअरसाठी ‘अ‍ॅण्ड’, ‘विल्स लाइफस्टाइल, ‘अ‍ॅलन सोली’, ‘ग्लोबल देसी’ हे ब्रॅण्ड्स निवडते. आयकेअरसाठी ‘रेबॅन’चं आयवेअर वापरते. ‘टायटन’ नि ‘फास्टट्रॅक’चे वॉचेस मला आवडतात. ‘मेबलिन’ नि ‘द बॉडी शॉप’ या ब्रॅण्ड्सची ब्युटी प्रॉडक्टस वापरते. ‘मेट्रो’, ‘हश पपीज’चं फुटवेअर घालते. ‘बॅगिट’च्या बॅग्जची डिझाइन्स युनिक नि अपील होणारी असल्याने मी त्याच वापरते. एकाच वेळी या बॅग्ज स्टायलिश दिसतात नि त्यांचा वापरही उपयुक्त ठरतो. ‘सिया आर्ट’ नि ‘झवेरी पर्ल्स’ची ज्वेलरी मला आवडते. ब्रॅण्डनेम हे अतिशय महत्त्वाचे ठरते. ब्रॅण्डेड वस्तू वापरल्याने त्यांचा फायदा निश्चितच होतो. त्या वस्तूंची क्वालिटी नि फीलमुळे पसे सत्कारणी लागतात. मी जास्तीत जास्त ब्रॅण्डेड वस्तू वापरायचा प्रयत्न करते.  

इस्थर बोर्डे
मी ‘किलर’, ‘लिवाईस’, ‘ग्लोबस’, ‘फॉरएव्हर२१’चे कपडे वापरते. ‘आयडी’, ‘फास्टट्रॅक’, ‘रेबॅन’चं आयवेअर वापरते. ‘हायडिझाइन’ नि ‘फास्टट्रॅक’च्या बॅग्ज वापरायला मला आवडतात. परफ्युम्सचे ‘एलिझाबेथ आर्डेन’, ‘टेम्टेशन’ वगरे इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स वापरते. ‘लँक्मे’, ‘मेबलिन’, ‘लॉरिअल’, ‘एल१८’ वगरे ब्रॅण्ड्सची कॉस्मेटिक्स वापरते. ‘मेट्रो’, ‘मोची’, ‘कॅटवॉक’चे शूज वापरते. ‘टायटन’ नि ‘फास्टट्रॅक’ची वॉचेस वापरते. ब्रॅण्डेड वस्तूंच्या उत्तम क्वालिटीमुळे त्या वापरल्याचे समाधान होतो. त्यांच्या उपयुक्ततेमुळे त्या वापरताना आनंद मिळतो.

पल्लवी सुर्वे वगळ
मी आयकेअरसाठी ‘आयडी’, ‘फास्टट्रॅक’, ‘रेबॅन’चे गॉगल्स वापरते. ‘लिव्हाइस’, ‘स्पायकर’चे क्लोथ्स् वापरते. ‘सॅमसोनाइट’ची लॅपटॉप बॅग नि ट्रॅव्हल साइडबॅग वापरते. परफ्युम्समध्ये मला ‘रॉयल मिराज’ वगरे ब्रॅण्ड्स आवडतात. ‘मेट्रो’, ‘कॅटवॉक’, ‘रिबॉक’चे फुटवेअर वापरते. ‘बॉस’, ‘अमेरिकन एक्सचेंज’, ‘फॉस्सिल’, ‘फास्टट्रॅक’, ‘क्रूझर’, ‘अस्पेन’ची वॉचेस वापरते. ‘ग्लोबल देसी’, ‘लाइफस्टाइल’ नि ‘सिया आर्ट’ ज्वेलरी वापरायला मला आवडते. ब्रॅण्डेड गोष्टींची क्वालिटी, त्यांचा युनिकनेस नि त्यांचा उपयुक्तपणा यामुळे मी कायम ब्रॅण्डेड गोष्टीच वापरण्याला प्राधान्य देते.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com  सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.