|| वेदवती चिपळूणकर

भारतात नावाजल्या जाणाऱ्या फॅशनसोहोळ्यांमधलं एक मुख्य नाव म्हणजे ‘लॅक्मे फॅशनवीक’! वर्षांतून दोन वेळा होणाऱ्या या फॅशन वीकचा २०१९चा ‘विंटर फेस्टिव सीझन’ २१ ऑगस्टपासून सुरू झाला असून २५ ऑगस्टपर्यंत फॅशन विश्वातील हा रंगतदार सोहळा सुरू राहणार आहे. ‘लॅक्मे फॅशनवीक’च्या फिटिंग्जपासूनच या वीकमध्ये काय असेल?, याबद्दलची उत्सुकता दिवसागणिक वाढत जाते. तरुणाईचं आणि अवघ्या फॅशनविश्वाचं लक्ष वेधून घेतलेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये यंदा काय काय पाहायला मिळेल याची ही एक झलक..

फॅशन ही संकल्पना खूप ‘डायनॅमिक’ आहे. फॅशन विश्वातआज जी गोष्ट ट्रेण्डमध्ये आहे, ती गोष्ट अगदी उद्या जुनी झालेली असेल. भराभर बदलणाऱ्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये भारतातले टेक्स्टाइल्स तेवढे तग धरून राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय डिझाइनर्सनी आपले फॅब्रिक्स वापरले म्हणजेच आपल्या फॅ ब्रिकला किंमत आहे, असं मानण्याचा जमाना मागे पडला आहे. आता परदेशी लोकांनी आपल्या फॅ ब्रिकचं महत्त्व आपल्याला दामदुप्पट किंमत घेऊन समजावून सांगावं यापेक्षा आपणचआपल्याकडचे फॅब्रिक समजून घेऊन त्याचा फॅशनेबल, आरामदायी वापर कसा करता येईल, याला महत्त्व दिले पाहिजे हा विचार मूळ धरू लागला आहे. याचीच प्रचीती यंदाच्या ‘लॅक्मे फॅशनवीक’च्या डिझाइन्समधून येते आहे. आपल्याकडील पारंपरिक बांधणी कापड, पैठणी साडी, हॅन्ड एम्ब्रॉयडरी यांना नवीन टच देऊन आणि वेगवेगळ्या फॅ ब्रिक्ससोबत पेअर करून यंदाची बहुतांश वेडिंग डिझाइन्स आकाराला आलेली या वीकमध्ये पाहायला मिळतायेत.

अनेक डिझानर्सच्या वेडिंग कलेक्शनमध्ये बांधणीला ब्रोकेड किंवा क्रेप अशा फॅब्रिक्ससोबत पेअर के लं गेलं आहे. एरव्ही टिपिकल आणि साधीशी दिसणारी बांधणी आता कॉटनवरून सिल्कमध्ये आणली आहे, जेणेकरून त्याचा साधेपणा जाऊन कपडय़ांना फे स्टिव लुक प्राप्त झाला आहे. बांधणी सिल्कची साडी आणि ब्रोकेडवर नाजूक हॅन्ड एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊ ज, त्याच हॅन्ड एम्ब्रॉयडरीचा अगदी स्लिक वेस्टबेल्ट अशा गोष्टी एकत्र पेअर केल्या गेल्या आहेत. यातून नवीन स्टायलिश लुकही मिळतो आहे. बांधणीचा ब्लाऊज आणि जॉर्जेटची किंवा नेटची साडी अशा कॉम्बिनेशनमध्येही अनेक वेडिंग डिझाइन्स केली गेली आहेत. पारंपरिक फॅब्रिकच्या डिझाइन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या गौरांग शाहने पैठणीसोबत बांधणीचा ब्लाऊज तर रॉ सिल्कच्या लेहंग्यासोबत बांधणी सिल्कचा दुपट्टा पेअर केला आहे. मेन्सवेअरमध्येही त्याने पैठणीचा मोजका पण सुंदररीत्या वापर केला आहे. एखाद्या फॅब्रिकसोबत दुसऱ्या कोणत्या फॅ ब्रिकचं कॉम्बिनेशन शोभून दिसेल याचा सखोल अभ्यास करून ही डिझाइन्स तयार केली गेली आहेत. ‘शिबोरी प्रिंट्स’ हा प्रकार मूलत: भारतातला नाही. मात्र आपल्या बांधणीशी साधम्र्य साधणारा असल्याने भारतात हे जपानी शिबोरी प्रिंट्स पटकन स्वीकारले गेले आहेत. या शिबोरीचा वापर केवळ स्त्रियांच्या कपडय़ांसाठी न करता मेन्सवेअरलाही त्यात अनेकदा समाविष्ट करून घेतलं जातं. यंदाच्या ‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये शिबोरीच्या पद्धतीने तयार झालेले स्काफ्र्स, दुपट्टे आणि मेन्स जॅकेट्स विशेष लक्ष वेधून घेतायेत.

‘लॅक्मे फॅशनवीक’चा वर्षांतला दुसरा सीझन हा केवळ फेस्टिव नसून तो विंटर फेस्टिव असतो. त्यामुळे याच सीझनमध्ये विंटर कलेक्शन्सही सादर केली जातात. ‘लॅक्मे फॅशनवीक’ हा नेहमीच येणाऱ्या सीझनचा ट्रेण्डसेटर म्हणून ओळखला जातो. यंदा या वीकमध्ये जे विंटर कलेक्शन सादर केले गेले, त्यात दोन गोष्टींची प्रामुख्याने चलती दिसून येते आहे, एक म्हणजे स्काफ्र्स आणि दुसरं म्हणजे मोठय़ा किंवा ओव्हरसाइज कॉलर्स! स्काफ्र्स आणि कॉलर्स या दोन्ही गोष्टी ‘जेंडर न्यूट्रल’ आहेत. अर्थातच, या दोन्ही गोष्टी मेन्सवेअरमध्येही आहेत आणि वूमेन्स वेअरमध्येही आहेत. स्काफ्र्स वापरायला खरं तर कोणत्याच सीझनचं बंधन नाही. या विंटर कलेक्शनमध्ये असणाऱ्या स्काफ्र्सना फॅब्रिकची मर्यादा दिसत नाही. शिबोरी, बांधणी, जॉर्जेट, कॉटन, क्रेप अशा जवळपास सगळ्याच फॅब्रिक्समध्ये यंदा स्काफ्र्स डिझाइन केले गेले आहेत. रफल्ड, क्रश्ड अशा सगळ्याच प्रकारांत आणि स्ट्राइप्ड, प्लेन, डय़ुएल टोन, प्रिंटेड अशा सगळ्याच डिझाइन्समध्ये यंदा स्काफ्र्स दिसून येतायेत. केवळ विंटर नव्हे तर फेस्टिव आउटफिट्ससोबतही स्काफ्र्स पेअर केले गेले आहेत. त्याच प्रकारे मोठे कॉलर्स हे फीचरदेखील केवळ विंटर सीझनमधील सोय या दृष्टीने न पाहता त्याचा वापर प्रामुख्याने फेस्टिव डिझाइन्समध्येही केला गेला आहे. कॉटन किंवा सिल्कच्या फु ल लेंग्थ गाउन्सनाही मोठे कॉलर्स देण्यात आले आहेत आणि सोबतच विंटरसाठीच्या वेल्वेट कोट्सनाही ओव्हरसाइज कॉलर्स देण्यात आल्या आहेत.

कपडय़ांप्रमाणे अ‍ॅक्सेसरीज बदलतात. त्यामुळे या वर्षी अ‍ॅक्सेसरीजमध्ये विशेषत्वाने मोठय़ा इअररिंग्ज किंवा फेस्टिवसाठी मोठे झुमके  ट्रेण्डमध्ये दिसून येतायेत. फे स्टिव म्हणजे चकाकून डोळे दिपवणारी हाय हिल्स ही संकल्पना आता बाद झाली आहे. त्याऐवजी फॅ ब्रिकच्याच फ्लॅट चप्पल्स, हॅन्ड एम्ब्रॉयडरीच्या मोजडी, कलमकारीच्या बॉक्स हिल्स कलेक्शनमध्ये पाहायला मिळतायेत. हाही एक उल्लेखनीय बदल म्हटला पाहिजे. यंदा ‘लॅक्मे फॅशनवीक’चं विसावं र्वष असल्यामुळे कदाचित, पण भारतीय टेक्स्टाइल्सचा मोठय़ा प्रमाणावर समावेश या विंटर फेस्टिव सीझनमध्ये दिसून येतो आहे. अर्थात, हा फॅशन वीक पूर्ण होईपर्यंत आणखी नवनव्या कलेक्शनची बाजारातील वाट मोकळी होईल. मात्र तोवर विंटरमध्ये काय करता येईल, याचा विचार ‘लॅक्मे फॅशन वीक’ची ही झलक पाहून नक्कीच करता येईल!

viva@expressindia.com