News Flash

३ लाख ९० हजारांचा गुटखा परभणीत जप्त

येथील युसूफ कॉलनीत पोलिसांनी ३ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा शनिवारी ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री माहिती मिळाल्यानुसार युसूफ

| April 21, 2013 01:40 am

येथील युसूफ कॉलनीत पोलिसांनी ३ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा शनिवारी ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली.
शुक्रवारी रात्री माहिती मिळाल्यानुसार युसूफ कॉलनी येथे वाहनातून (एमएच २३ डब्ल्यू ८८६) म. कलीम म. युसूफ हा गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वाहनासह त्याला पकडले. त्याच्याकडे ११ मोठय़ा पांढऱ्या बॅग आढळून आल्या. या बॅगमध्ये १ हजार गुटख्याचे पॅकबंद पुडे सापडले. ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा हा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:40 am

Web Title: 3 lakh 90 thousand gutkha seized in parbhani
टॅग : Gutkha,Seize
Next Stories
1 औरंगाबादची श्रद्धा जोशी आयडिया रॉक्सची विजेती
2 ‘असा घडला भारत’ ग्रंथावर आज परिसंवाद
3 ‘.. तरीही निलंबन होत असल्यास काम करायचे कसे?’
Just Now!
X