News Flash

चाळे करणारे प्रेमी थेट गजाआड होणार

गुलाबाच्या लाल व पिवळ्या फुलांना ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे चांगली मागणी आहे. फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. आज वीस नगाच्या

| February 14, 2013 02:05 am

गुलाबाचे फुले महागली
गुलाबाच्या लाल व पिवळ्या फुलांना ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे चांगली मागणी आहे. फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. आज वीस नगाच्या डच गुलाबाचा दर साठ रुपयांपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत तर गुलाब गड्डीचा (बारा नग) दर सहा ते दहा रुपये इतका होता. डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर होता. साधी गुलाब गड्डी (१० ते १२ फुले)चा दर ८ ते १५ रुपये इतका होता. बोडरे, ट्रॉजिकल, प्रेसिडेंट, गोल्डन स्ट्राईक अशा वेगवेगळ्या जातींच्या गुलाबांची बाजारात आवक झाली. शहरातील विविध फुल बाजारात आज डच गुलाबांची तळेगाव येथून सर्वाधिक आवक झाली असून याशिवाय मंचर, पिरंगुट, शिरवळ, माण, हिंजवडी, तळेगाव, मावळ, पेढ येथूनही गुलाबाची आवक झाली. डच गुलाबांच्या (२० नग) आठ हजार आठशे साठ गड्डींची आवक बाजारात झाली तर गुलाब गेलिंटरची चार हजार गड्डींची, साध्या गुलाबाची पाचशे तीस गड्डींची आवक झाली. ‘दोन-तीन आठवडय़ांपासून गुलाबांना चांगला भाव होता. पण, आता व्हॅलेंटाईनमुळे फुले बाजारातील दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. मागील वर्षी डच गुलाबाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत गेला होता’, असे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. गुलाबाला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी दहा ते वीस टक्के अधिक दर मिळाला आहे. चाळीस ते पन्नास सेंटीमीटरच्या फुलांनाही चांगली मागणी आहे.

प्रेमाच्या नावाखाली चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांनो सावधान.. चाळे करीत असाल तर साध्या वेषातील पोलिसांची नजर पडेल आणि गजाआड व्हावे लागेल. ‘प्रेम करा, पण जपून’ असा  सल्ला देत शांतता भंग करणारे कुणीही असो, त्यांना गजाआड केले जाईल, असा सक्त इशारा पोलिसांनी दिला आहे. कधी नव्हे ते चक्क बागेत गणवेषातील पोलिसांसह साध्या वेषातील पोलीसही दिसतील.
व्हॅलेंटाईन डे.. प्रेम दिवस, प्रेमी युगुलांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रेम दिनाच्या नावाखाली हिडीस प्रकारांना ऊत आला. प्रेमाच्या नावाखाली पाटर्य़ा झडतात. प्रेमाच्या नावाखाली उघडय़ावर युगुलांचा चाळा सुरू असल्याचे दृश्य बहुतांश ठिकाणी दिसते. बागेत कुटुंबासह फिरणेही मुश्किल झाले आहे. उघडय़ावर चाळे करणाऱ्या युगुलांच्या विरोधात बजरंग दल, शिवसेनाप्रणीत विद्यार्थी सेना आदी अनेक संघटनांनी विरोध दर्शविला. देशभरात अनेक ठिकाणी चाळे करणाऱ्या युगुलांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. त्यातच काही संघटना प्रेमी युगुलांच्या समर्थनार्थ पुढे आल्या. या दोन्ही  संघटनांचे कार्यकर्ते भिडल्याचे प्रसंगही दरवर्षीच उद्भवतात.
यंदा प्रेम दिनी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस अधिक सज्ज राहणार आहेत. शहरातील निवडक ठिकाणी सकाळपासूनच गस्त वाढवण्यात आली आहे. उद्या, गुरुवारी सकाळी फुटाळा तलाव, वनस्पतीशास्त्र उद्यान, तेलंखेडी उद्यान, अंबाझरी उद्यान, सेमिनरी हिल्स, महाराजबाग, गोरेवाडा तलाव, सक्करदरा उद्यानासह प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या बागांमध्ये साध्या वेषातील महिला व पुरुष पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गणवेषातील पोलीसही राहतील. याशिवाय सामाजिक सुरक्षा शाखेचे पथकही शहरात गस्त घालणार आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत पोलीस येथे तैनात राहतील. एका जागी बसून राहण्यापेक्षा सतत फिरत राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. बागांमध्ये झुडपाआड चाळे करणारे दिसतील तर त्यांना ताब्यात घेतले जाईल.
बागेत बसून तरुण- तरुणी बोलत असेल तर त्यास आक्षेप असण्याचेही कारण नाही. मात्र, त्याआड चालणारे चाळे मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. प्रेमी युगुलांना मारहाणीचे प्रकारही खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. शांतता भंग करणारे कुणीही असो, त्यांना गजाआड केले जाईल, असा इशारा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे यांनी दिला आहे.
ग्रामीण भागातही पोलिसांची करडी नजर आहे. शहरात पोलिसांची कारवाई असल्याने अनेक तरुण-तरुणींनी ग्रामीण भागाकडे धाव घेतली. शिकवणीला जात असल्याचे घरी सांगून ग्रामीण भागातील हॉटेल्स व निर्जनस्थळी चाळे करणाऱ्यांची संख्या वाढली.  प्रेमाच्या आड चाळे खपवून घेतले जाणार नाही, पोलीस कारवाई करतील. दोन दिवस विविध हॉटेल्सची तपासणी केली जाईल

प्रेमी युगुलांना पिटाळून लावले
तेलंखेडीसह विविध उद्यानात बुधवारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांना उठाबशा काढायला लावून पिटाळून लावले. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आयनॉक्ससमोर गाढवांचे लग्न लावले.
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे सुबोध आचार्य यांच्या नेतृत्वाखाली धंतोली परिसरातील गोरक्षण सभेतून दुपारी ‘इशारा मिरवणूक’ काढण्यात आली. लक्ष्मीनगर, शंकरनगर, लॉ कॉलेज, फुटाळा तलाव, जीपीओ चौक, महाराजबाग, व्हरायटी चौक या मार्गाने फिरून सीताबर्डीतील मुंजे चौकात समारोप झाला. शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेना तसेच युवा सेनेचे कार्यकर्ते अंबाझरी, बॉटनिकल गार्डन, फुटाळा तलाव तसेच तेलंखेडी उद्यानात गेले. तेथे शुभेच्छापत्रे जाळण्यात आली. युवा सेनेचे कार्यकर्ते युगुलाचे लग्न लावून देण्याच्या प्रयत्नात होते. युगुलांना देण्यासाठी महिलांनी खण-नारळ, साडी वगैरे घेऊन गेल्या होत्या. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आयनॉक्ससमोर गाढवांचे लग्न लावले. भाजयुमोचे पूर्व नागपूर अध्यक्ष बाल्या रारोकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष सुभाष कोटेचा, नगरसेवक प्रदीप पोहाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते याप्रसंगी हजर होते.

प्राण्यांसाठी संदेश
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’ व ‘सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्झव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च’ या दोन स्वयंसेवी संस्थेने दिला आहे. पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स ही स्वयंसेवी संस्था अनेक वर्षांपासून प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असून पशू क्रूरता निवारणासाठी योगदान देत आहे, तर सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्झव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च ही निसर्ग संस्था गेली कित्येक वर्षे वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त गुरुवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत फुटाळा तलाव येथे ही संस्था वन्यजीवांना वाचवणे, त्यावर प्रेम करणे व त्यांचे संवर्धन करणारा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाद्वारे प्राणीदेखील आपले खास व्हॅलेंटाईन होऊ शकतात, हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स संस्थेच्या करिष्मा गलानी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 2:05 am

Web Title: action on lovers that who missbehave with girl
टॅग : Lovers,Valentine Day
Next Stories
1 वीज निर्मितीत घट, भारनियमन वाढणार
2 पृथ्वीराजबाबांनी दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पुसली पाने
3 ‘तृप्ती’च्या चंदा वानखडे यांना जिल्हा उद्योग पुरस्कार
Just Now!
X