News Flash

‘टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय नाही’

जिल्ह्य़ातील टंचाईचा मुकाबला करण्यास यंत्रणेने सज्ज राहावे. टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

| February 14, 2013 12:40 pm

जिल्ह्य़ातील टंचाईचा मुकाबला करण्यास यंत्रणेने सज्ज राहावे. टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.
हिंगोली पंचायत समितीच्या पाणीटंचाई, घरकूल योजना व करवसुली आदी कामांविषयी बुधवारी आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ. विलास राठोड, ग्रामस्वच्छता प्रमुख साहेबराव कांबळे व विविध विभागांचे गटप्रमुख उपस्थित होते. बैठकीत इंदिरा आवास, रमाई, बबूल क्षेत्रीय घरकुल योजनेच्या कामांविषयी सिंघल यांनी नाराजी व्यक्त केली. घरकुलाच्या कामासंबंधी त्यांनी सूचना केल्या, भारत अभियान, करवसुली, बांधकाम, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:40 pm

Web Title: action will taken on who is responsible for shortage
टॅग : Hingoli
Next Stories
1 देशव्यापी संपात औरंगाबादच्या तीन लाख कामगारांचा सहभाग
2 सराफांकडे गहाण ठेवलेले चोरीचे ३४ तोळे सोने जप्त
3 ‘फूट पाडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’
Just Now!
X