राज्य तलाठी संघाच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाही तर महसुली कामाव्यतिरिक्त अन्य कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर तलाठी संघाने बुधवारी निदर्शने केली. तलाठी, पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या १५ मागण्या प्रलंबित आहेत. शेतजमिनीची फेरमोजणी, फेरजमाबंदी, तलाठी सज्जांची पुनर्रचना, कृषी पर्यवेक्षकाप्रमाणे वेतननिश्चिती, कार्यालय, संगणक व लॅपटॉपची सोय, ग्रामीण पातळीवर तलाठी हे पद मुख्य प्रशासक म्हणून घोषित करणे यांसह १५६(३) या कलमांचा गैरवापर या विविध मागण्यांच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सूचना केलेल्या होत्या. याची अंमलबजावणी न झाल्याने निदर्शने करण्यात येत असल्याचे औरंगाबाद जिल्हा तलाठी संघाचे अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.