डोंबिवलीची भाग्यरेषा ठरलेल्या लोकलगाडीनं अनेकांना एकत्र आणलं.. १९५० च्या दशकात शं. ना. नवरे, कल्याणला राहणारे वि. आ. बुवा आणि डोंबिवली पश्चिमेला राहणारे प्रभाकर अत्रे यांसारखे, तीन निरनिराळय़ा प्रकृतीचे साहित्यिक भेटले ते ‘नऊ एक’च्या लोकलगाडीत! त्यांना दामोदर बहिरटांसारख्या मित्रांची साथ मिळाली आणि लोकलमधल्या हास्यविनोदांच्या आणि गरमागरम राजकीय- सामाजिक चर्चाच्या पलीकडे जाणारी एक संस्थाच उभी राहिली.. हेच ते ‘नऊ एकचं अस्वस्थ मित्र मंडळ’!