News Flash

बदलापूर बलात्कार प्रकरण: संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची सेनेची मागणी

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बस क्लिनरने केलेल्या बलात्कारप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बदलापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

| September 20, 2013 06:38 am

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बस क्लिनरने केलेल्या बलात्कारप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बदलापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुलीवर झालेल्या बलात्काराची कल्पना संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना होती. मात्र शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण त्यांनी लपविण्याचा प्रयत्न केला, असा शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  बदलापूरच्या डॉन बास्को शाळेत बसने जाणाऱ्या मुलीवर ६ सप्टेंबर रोजी घरी सोडताना बस क्लिनर संदीप किरवे याने बलात्कार केला होता. मुलीने पालकांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाला याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली होती. शिवाय पोलिसांकडेही तक्रार केली होती. मात्र या प्रकरणातून शाळेची बदनामी होईल म्हणून हे प्रकरण लपवण्यासाठी संस्थाचालकांकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे या प्रकरणात ही मंडळीही दोषी असून त्यांच्या विरोधतदेखील गुन्हा नोंदवावा, अशी मागणी बदलापूर शिवसेनेने पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्याकडे बुधवारी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 6:38 am

Web Title: badlapur rape case
टॅग : Badlapur
Next Stories
1 ‘सुभेदार वाडा’ गणपतीचे जल्लोषात विसर्जन
2 टीएमटीच्या ताफ्यात ३०० नव्या बसेस
3 गोधनातून आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन!
Just Now!
X